Friday, June 4, 2010

श्लोक २३

II श्रीराम समर्थ II

न बोले मना राघवेवीण  कांही |
जनी वाउगे बोलता सुख नाही||
घडीने घडी काळ आयुष्य नेतो|
देहांती तुला कोण सोडूं पाहतो || २३||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

suvarna lele said...

ज्या रामभक्त हनुमंताने आपले सारे जीवन रामभक्तीत अर्पण करून जीवनाची सार्थकता मानली त्याच श्रीरामांच्या नामाशिवाय दुसरे कोणतेही नाव घेऊ नकोस ,दुस-या कोणाचाही विचार करू नकोस .राघवाची किर्तीच गा ,त्याचेच नाम घे ,तरच तुझे हित आहे .नुसत्या वायफळ गप्पा मारून ,दुस-याची निंदा नालस्ती करून तुझे हित साधणार नाही .त्यातून तुला सुख लाभणार नाही .दु :खच पदरात पडेल .म्हणून हे मना ,फक्त राघवाचेच नाम घे .नाम घेण्यासाठी म्हातारपण होण्याची वाट बघू नकोस .क्षणा क्षणाला आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे .तेव्हा वेळ करू नकोस . अंतकाळी तुझ्या तोंडात राघवाचेच नाम येण्यासाठी आतापासूनच नाम घ्यायला सुरुवात कर .मनाला नाम घेण्याची सवय असेल तरच अंतकाळी तोंडात नाम येईल .गेलेला क्षण परत येणार नाही . समर्थ म्हणतात :संसार म्हणिजे सवेची स्वार | नाही मरणास उधार | मापी लागले शरीर |घडीने घडी ||दा .३-९-१ || दुस-या क्षणी काय होणार आहे ते आपल्याला कळत नाही .तेव्हा राघवाचे नाम घे .नामातच सर्व कामे कर .चालता बोलता कामे करता नाम घे .

Dr.Madhavi Mahajan said...

हे मना राघवावीण इतर काही बोलण्याचा मोह नको...सदॆव त्याचेच नाम मुखात राहु दे ...त्याच्या नामाचा संगतीत मन नेहमीच चांगला विचार करण्यास प्रवृत्त होते....यासाठी समर्थ याठिकाणी मनाला राघवाशिवाय कशाचा विचार करु नको असे सांगतात...वास्तवात मात्र मानवी मन इतरांच्या दोषांचे चर्वण करण्यात आणि त्यांची निंदा करण्यातच अधिक रमते....त्याच्या यावृत्ती पासुन त्याला परावृत्त करण्यासाठी समर्थ त्याला याठिकाणी नामाचे महत्त्व समजावून सांगतात ...त्याच बरोबर वेळेचे महत्त्व आणि काळाची जाणिव देखील करुन देतात...मानवी जीवनातील वेळेचे महत्त्व लक्षात घेउन यासाठी समर्थ सांगतात की वाउगे म्हणजे व्यर्थ बडबड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन घे... सामन्यपणे भौतिक जगात घडणा-या अशा अनेक घटना असतात की ज्याविषयी चर्चा करण्यार आपण आपला बराचसा वेळ वाया घालवित असतो...निरर्थक चर्चा, वादविवाद यामधुन स्वत:चे मन:स्वास्थ्य घालवुन घेत असतो.......या वायफ़ळ चर्चेने फ़क्त मनस्तापच मिळतो....पण नामाच्या संगतीत राहणा-यांना मात्र मन:शांती प्राप्त होते...समाधान प्राप्त होते....आयुष्यातील वाया घालविलेले क्षण काळाच्या उदरात गडप होतात....गेलेला क्षण, गेलेली वेळ कितीही प्रयत्त्न केला तरी पुन्हा येत नाही...याठिकाणी समर्थांनी पुन्हा एकदा मृत्यूचे स्मरण करुन दिले आहे... काळ हा असा आहे की तो कधी झडप घालेल सांगता येत नाही....यातुन सुटण्याची कितीही धडपड केली तरी त्यापासून आपले जिवलग देखील अशा वेळी उपयोगी पडत नाहीत ....
होतां मृत्याची आटाटी| कोणी घालूं न सकती पाठीं |
सर्वत्रांस कुटाकुटी| मागेंपुढें होतसे ||दास.३.९.५||
मृत्युकाळ काठी निकी| बैसे बळियाचे मस्तकीं |
महाराजे बळिये लोकीं| राहों न सकती ||दास.३.९.६||
या शेवटच्या क्षणी माणसाला जाणीव होते या जगात आपले असे कोणीच नाही...खुप काही मिळविले पण मनाला शांती देणारे असे काहीच मिळविले नाही.....शेवटच्या क्षणा पर्यंत शांती प्राप्त करुन घेण्यासाठी समर्थ याठिकाणी मनाला रामनामाच्या संगतीत मनाला रमण्यास सांगतात..

जय जय रघुवीर समर्थ....

Gandhali said...

श्लोक 23
" हे मना , एका भगवंतावाचून इतर कशाबद्दल हि बोलू नये.इतर वायफळ बडबड निरुपयोगी
असते ती सुखाचे , हिताचे होत नाही. क्षणोक्षणी काळ आपले आयुष्य संपवत आहे .अंतकाळ येऊन ठेपल्यावर जीवाला एका भगवंतावाचून कोणीही मदत करू शकत नाही."
रघूनायका दृढ चित्ती धरावे असे मागील श्लोकात समर्थ सांगतात ते कसे करावे त्यासाठी काय करावे हे या श्लोकात सांगितले आहे. " न बोले मना राघवेवीण काही ....." कोणतेही उत्तम ध्येय पदरात पाडण्यासाठी त्याचा ध्यास लागणे आवश्यक आहे .बोलता,चालता,उठता,बसता,त्याचेच चिंतन घडणे म्हणजे ध्यास लागणे. इतर कोणत्याही गोष्टीत मन ना जाणे.जसे कौरव पांडवाना धनुर्विद्या शिकवताना गुरु विचारतात नेम धरताना तुम्हाला काय दिसते ? कोणाला झाड,कोणाला पाने,कोणाला पक्षी ,इ.... पण अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो हा जो ध्यास ती दृढ धरण्याची पहिली पायरी.असा रामनामाचा ध्यास लागला पाहिजे. आपण ज्या बद्दल बोलतो त्याच विषयाचे आपोआप चिंतन होते म्हणून भगवंतावाचून इतर विषयाबद्दल उगाच बोलणे टाळावे.आवश्यक ते बोलणे कामापुरते बोलणे टाळता येत नाही , टाळूही नाही पण माणूस दिवसभर जे बोलतो ते आवश्यक आणि कामाचेच असते काय ? इतरांचे दोष काढणे , स्वत:ची स्तुती करणे , इतरांच्या गुणदोषांची चीकीत्स्ता करणे, आपण त्यातले कसे नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वत:बद्दल बोलणे,वर्तमानपत्रातल्या बातम्या,राजकारणे,आप्तेष्टांची वागणूक,महागाई,तरुणमुले,वृद्ध माणसे यांची वागणूक,नटनट्या ,चित्रपट,नाटके या बाबतीत वेळेचे भान न ठेवता माणसे जे बोलत असतात त्यातील किती टक्के भाग महत्वाचा असतो,आवश्यक ठरतो,उपयोगी असतो ? याचा विचार केला तर बहुतेक वेळ वायाच गेला हे लक्षात येईल.

सतत भगवान स्मरण ,वाचन ,चिंतन, मनन या साठी तो काळ वापरावा . व्यावहारिक जगात मोकळा वेळ आपल्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे ,जो आपला व्यवसाय आहे त्याचा सखोल अभ्यास करून त्यात प्रभुत्व संपादन करण्यासाठी वापरावा .ज्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल त्यांना मार्गदर्शन करावे इतरांच्या उपयोगी पडावे असा सत्कारणी वेळ घालवावा . अन या देहापलीकाडे काही आहे ते सध्या करण्या साठी स्वतःचा उद्धार करुन घेण्यासाठी रामाशिवाय काही बोलू नये.
" आता जरी वैराग्य ठाकेना ! आणि प्रपंचा हा सुटेना !
तरी प्रपंची असोनी वासना ! परमार्थाकडे ओढावी !!"
मानवी आयुष्य अतिशय महत्वाचे आहे .प्रत्येक क्षण फार मोलाचा आहे. गेलेला कोणताही क्षण कितीही मुल्य दिले तरी पुन्हा परत आणता येत नाही .
"संसार म्हणजे सवेच स्वार ! नाही मरणास उधार
मापी लागले शरीर ! घडी ने घडी !!"
आयुष्य संपण्याचा क्षण, मृत्यूचा क्षण जवळ-जवळ येत असतो.कुणी हि केवढा हि अधिकारी असला तरी यातून सुटका नाही आणि ज्यांच्या साठी आपण हे क्षण वापरलेले असतात त्या आप्तेष्टांपैकी कोणी हि त्या वेळी वाचवू शकत नाही .
संत तुकाराम म्हणतात .......
" नको नको मना गुंतू मायाजाळी !
काल आला जवळी ग्रासावया !
काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा !
सोडवीना तेंव्हा बापमाय !! "
माणसाचे मरण हि त्याची परीक्षा असते आयुष्यभर केलेल्या वर्तनाचा ,कर्माचा हिशोब असतो. अध्यात्मदृष्ट्या वरच्या पायरी वर जाण्याची संधी मरण काळी मिळते.परंतु जन्मभर जी उपासना घडली असेल तिचाच त्या वेळी उपयोग होतो इतर साऱ्या गोष्टी जागच्या जागीच राहतात म्हणून हे मना वेळ वाया दवडू नकोस ,सतत रामनाम घे !
" शिंका जांभई खोकला ! तितुका काळ व्यर्थ गेला !
आता ऐसे न करावे ! नाम जीवी ते धरावे !! "


" जय जय रघुवीर समर्थ "

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate (Gwaliar)....
श्लोक २३..
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! दूसरों को कष्ट देने वाली भाषा का प्रयोग नही करना चाहिये| उससे जीवन में मानव को कभी भी सुख नही मिलता है| इसलिये हे मनुष्य ! बोलतो समय सदैव अच्छी भाषा का प्रयोग होना चाहिये तथा रामनाम कहते रहना चाहिये | प्रत्येक क्षण पश्चात् अर्थात् अगले ही क्षण आयु कम हो जाती है| अत: अंतकाल के बाद हमारे साथ कोई नही रहता | सभी साथ छोड देते है| इसलिये श्रीराम का नाम ही जीवन सार्थक करने का पथ है| अत: सदैव श्रीराम कहते रहना चाहिये|.

lochan kate said...

[हिन्दी मे]
न बोलो अरे मन राघव के अलावा|
जनो मे नही सुख वाचालता से मिलता||
क्षण-क्षण को काल आयुष्य है लेता|
अंत समय पर है कौन काम आता||23||