Friday, July 2, 2010

श्लोक २७

II श्रीराम समर्थ II

भवाच्या भये काय भितोस लंडी|
धरी रे मना धीर  धाकासी सांडी||
रघूनायका सारीखा स्वामि शिरी|
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||२७||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

 जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar)...प्रसंग....... इस नश्वर संसार के भवसागर में मनुष्य को डर लगता है उसपर ..... अर्थ.....श्री राम दासजी कहते है कि हे मानव ! संसार की बातों से भय क्यों लगता है? क्यो डरपोक बनते हो? अपने मन में धैर्य बनाये रखो| मन के डर को बाहर निकाल दो| श्री रामचन्द्रजी जैसे स्वामी का सिर पर आशिर्वाद है फ़िर भी काल का दण्ड प्राप्त होने पर डरने की कोई आवश्यक्ता नही है, क्योकि श्रीरामचन्द्र जी भगवान अपने दास की अपने भक्त की कभी भी उपेक्षा नही करते|.

Prof. Limaye said...

श्लोक २७
II श्रीराम II
हे मानवा ! तू किती भेकड आहेस , संसाराची काय भीती बाळगतोस ? कारण आद्य शंकराचार्यांनी म्हंटले आहे " ब्रम्ह सत्यं जगन मिथ्या I " मिथ्या - भ्रामक,खोट्या जगाला काय घाबरायचे ? कारण ब्रम्ह हेच सत्य आहे .संपूर्ण ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी देहीची ब्र्म्हत्व कसे पावता येईल हेच सांगितले आहे किंबहुना ज्ञानेश्वरी लिहिण्याचा हाच उद्देश ज्ञानेश्वरांचा असावा असे वाटते .
' देहीच ब्रह्मत्व पावणे' ही काही सोपी गोष्ट नाही त्या साठी मार्गदर्शक किंवा गुरु तेवढ्याच ताकदीचा हवा.सदैव दक्ष,शिष्याच्या या मार्गात येणाऱ्या कोणत्याही संकटाचा समर्थपणे प्रतिकार करू शकणारा हवा.अन भक्तरक्षणाच्या कामी सदैव दक्ष,धनुष्यबाण हातात घेतलेला सर्वांचा स्वामी प्रभू रामचंद्र तुझ्या पाठीशी उभा आहे.आपल्या भक्तावर संकट आणणाऱ्याच्या बाबतीत तो फार फार रागीट आहे.तेंव्हा आता संसाराचे भय बाळगण्याचे कोणालाही कारण नाही असा दिलासा समर्थ देतात.

suvarna lele said...

समर्थ मनाला सांगतात ,या भवसागरात का घाबरतोस ?अरे तुझ्या डोक्यावर श्रीरामांची कृपा आहे
ना ? तरी तुला का भीती वाटते ?तू श्रीरामांची भक्ती करतोस ना ?मग भीती कसली ?भीती वाटते कारण रामावर तुझी गाढ निष्ठा नाही .तू अजून स्वत : सगळं करतोस असं तुला वाटते , राम कर्ता आहे असे तू अजून मानत नाहीस .जे घडते ते राम कृपेने अशी तुझी अजून खात्री नाही .तर आता एक काम कर .श्री रामांवर पूर्ण विश्वास ठेव .दुसरी गोष्ट अशी की या भवसागरात आशा ,माया ,मोह अशा गोष्टी भक्तालाही भयभीत करतात.सुख -दु:ख ,पाप पुण्य ,जन्म मृत्यू अशा द्वंद्वानी भरलेला भवसागर भक्ताला सुध्दा भिववतो. समर्थ म्हणतात की घाबरू नकोस देव भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही .तुझ्या प्रापंचिक आडचणींना कधीच घाबरू नकोस .लक्षात ठेव ,तुझा श्रीराम सतत तुझ्या जवळ आहे .तो तुला नक्कीच तारून नेईल .
म्हणून पुढच्या चरणात समर्थ म्हणतात _नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी |दंडधारी म्हणजे काळ किंवा यमराज ! काळ जरी तुझ्या अंगावर धावून आला तरी रघुराज म्हणजे श्रीराम तुझ्या रक्षणासाठी काळावर धावून जाईल .
काही वेळेस तुझ्या कर्मा प्रमाणे तुला संकटांना तुला तोंड द्यावे लागेल .जसे वडील मुलाला त्याच्या भल्यासाठी रागावतात त्याप्रमाणे श्रीराम सुध्दा तुझ्या भल्यासाठी तुझ्या पुढे संकटे निर्माण
करतात . ज्याप्रमाणे अग्नी मध्ये सोन्याची झळाळी वाढते तशी भक्ताची परीक्षा भगवंत घेतात आणि भक्ताची प्रतिष्ठा वाढवतात .भक्तात वैराग्य उत्पन्न करतात .

Gandhali said...

श्लोक २७
अरे मना ! हा काय भ्याडपणा,संसाराच्या भयाने काय भीतोस ? तू ज्ञानी आहेस,जाणता आहेस.हा सारा संसार नश्वर आहे जो मुळातच खरा नाही त्याचे भय कशासाठी.हा एक प्रवास आहे त्यात चढ उतार,वळणे,वळसे,खाचखळगे लागणारच त्याला घाबरून कसे चालेल त्याप्रमाणेच संसारात अडचणी,अनेक आघात,संकटे येणारच पण तुला आत्ता पर्यंत सांगत आलो आहे तुझ्या विकारांवर ताबा ठेव अन श्रीरामाचे नित्यस्मरण ठेव.अरे शिष्याची तयारी करून घेण्यासाठी ही परीक्षाच असते.पोहताना,सायकल शिकताना शिकविणारे मध्ये मध्ये सोडून देतातच ना ? नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय,दोनतीनदा आपटी खाल्ल्याशिवाय आपण शिकू शकत नाही हे त्या प्रशिक्षकाला माहीत असते तसेच तो सद्गुरू श्रीराम आपणास तयार करतो आहे.हा ठाम विश्वास ठेव.
" देनेवाला रघुवीर I क्यो होय दिलगीर II "
कोणतेही संकट अगदी तो अक्राळविक्राळ काळरूपी यम जरी तुझ्यावर रागाने धावून आला तरी हा रघूनायक श्रीराम त्याला थोपवून धरेल हा विश्वास,हा धीर मनात ठेव.भक्ताच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या श्रीरामावर अढळ श्रद्धा ठेव.यमाच्या किंवा संसारातील संकटाच्या रूपाने तुला या संसारमायेचा उबग यावा,विरक्ती यावी अन या पुनरपि जन्म पुनरपि मरण यातून तुला बाहेर काढावे म्हणून तो भक्तवत्सल रामच मार्ग दाखवीत असतो.तो आपुली माउली आहे आपण केलेल्या बऱ्यावाईट कर्मांचा शासनकर्ता,फलदाता तोच आहे पण रागावली तरी आई आपल्या लेकरांची उपेक्षा कधीच करीत नाही तसेच श्रीराम कधीही आपल्या भक्ताला,लेकराला दूर करणार नाही .
" सुखमुर्ती राम सोडू नको कदा I तुज तो आपदा लागो नेदी II "
तेंव्हा हे मना ! असा दक्ष अन समर्थ स्वामी लाभला असता या भवसागराचे भय वाटायचे कारण काय ?

lochan kate said...

[हिन्दी मे]
डरपोक तु डरता भव सागर के भय से|
मन मे धैर्य रख छोड तु डर रे||
राघव के जैसा है स्वामी वो तेरा|
उपेक्षा ना करता न कभी कोप करता||२७||