II श्रीराम समर्थ II
मना पापसंकल्प सोडुनी द्यावा !
मना सत्यसंकल्प जीवी धरावा !!
मना कल्पना ते नको वीषयांची!
वीकारे घड़े हो जनि सर्व ची ची !!५!! जय जय रघुवीर समर्थ !
आधीच्या श्लोकात समर्थ मनाला निन्द्यनीय गोष्टींचा त्याग करायला सांगतात आणि वंदनीय गोष्टींचा स्वीकार करायला सांगतात . या श्लोकामध्ये समर्थ पापसंकल्प सोडून देऊन सत्यसंकल्प चित्तात धरावा असे सांगतात.दासबोधामध्ये समर्थांनी या विषयी विस्ताराने सांगितले आहे ... सत्य ब्रह्माचा संकल्प ! मिथ्या मायेचा विकल्प !! दास ७.५.४!! ब्रह्माचा संकल्प म्हणजे सत्य संकल्प आणि संसाराचा किंवा विषयांचा संकल्प म्हणजे पापसंकल्पना ..... असत्य म्हणजे तेची पाप ! सत्य जाणावे स्वरूप!! दास १८.५.२६ !! हे संकल्प आणि विकल्पच बंधनाला आणि मोक्षाला कारण होतात!
/Sreeram Samarth/ Before stating what needs to be done , Samarth has also stated what need not to be done...! Normally Samarth goes by "rule of elimination"! Before ' Satvagun' He will tell 'Tamogun' & then 'Rajogun'! He will also tell 'Murkha Lakshan' & 'Padhat-Murkha Lakshan' ! He is an excellent teacher! Like a teacher , He will first explain what is NOT good and for a common man he will get in to the common examples! In this shloka also he tells first to go away from " Pap Sankalpa" and then get to " Satya Sankalpa" Further He explains the consequences of 'Pap-Sankalpa' , They will lead to ' Vikar' which will further lead to 'Vishaya Vasana' Under influence of Vasana, one will loose the 'Vivek'! In the absence of Vivek , you are bound to make the blunders! And the people will shame on you! For a man, the biggest fear is the death and after that "Aapkirti" ! 'Aapkirti is at a times , worst than death ! So Samarth is explaining here the consequences of papsankalp is " Chi Chi = Insult / Bad name " So be away from that !
// श्रीराम समर्थ // मी म्हणजे देह हीच स्वत: ची ओळख असणारे जीव सतत विषय चिंतनात रमतो आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो .... मन हे चंचल आहे ते जास्तीत जास्त कल्पनेमध्ये रमत असते .. ज्या ज्या कल्पना ते करते ते प्राप्त करून घेण्यासाठी ते सतत धडपडत राहते आणि ती गोष्ट प्राप्त झाली नाही कि दु:खी होते .... जीव जोपर्यंत देह्बुद्धीमध्ये अडकला आहे तोपर्यंत त्याला परमार्थ साधता येणारा नाही ... देह्बुद्धीमध्ये विलक्षण सामर्थ्य असते.. योगी लोकांना देखील देहबुद्धी त्रास देते ! म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी ही झडे/ तरीच परमार्थ घडे / देहबुद्धीने बिघडे / ऐक्यता ब्रह्मीची // दास ७-२-३९ // सत्यसंकल्प- साठी देहबुद्धी ते आत्मबुद्धि करावी असे समर्थांचे सांगणे आहे. जय जय रघुवीर समर्थ
सत्यसंकल्पाची कास धरायची असेल तर हे मना, विषयांच्या चिंतनात रमू नको.... ज्याचे चिंतन चालते तेच प्राप्त करून घेण्याची मनाला ओढ लागते विवेकी मनुष्य आपले मन भगवंताच्या चिंतनात रमवतो पण अविवेकी माणसे मात्र सतत सुखाच्या शोधात फिरत राहतात ... समर्थ म्हणतात....
ज्यास वाटे सीण व्हावा / त्याने विषय चिंतीत जावा// विषयो न मिळता जीवा/ तगबग सुटे // दास ३-१०-६१//
विषयी माणसाची अवस्था समर्थ स्पष्ट करतात .. विषय चिंतनाने जीवाला केवळ असमाधान, अतृप्तीच प्राप्त होते ....देहाच्या माध्यमातून जे जे सुख प्राप्त होते त्याने अखेरीस दु:खच पदरात पडते .. सुरुवातीला सर्वच विषय- सुखामध्ये गोडी वाटते पण नंतर दु:खापलीकडे काहीच मिळत नाही .. जसे गळाला लागलेल्या खाद्यासाठी मासा धाव घेतो, सुरुवातीला त्याला त्याची गोडी वाटते पण नंतर जेव्हा तो त्यामध्ये अडकतो तेव्हा त्याची अवस्था दयनीय होते ...
तैसी विषयसुखाची गोडी / गोड वाटते परी ते कुडी // म्हणोनी आवडी/ रघुनाथी धरावी // दास. ३.१०.६७// जय जय रघुवीर समर्थ !
//श्रीराम समर्थ // मना ! पापसंकल्प सोडून सत्यसंकल्प चित्तात धरावा. विषयांची कल्पनाही मनात आणू नये.विकारांच्यामुळे मनुष्याची बदनामी होते .पापसंकल्प म्हणजे मिथ्या संसाराचा, विषयांचा संकल्प ! संत ज्ञानेश्वर माउलीने हरिपाठात सांगितलेच आहे . " लटिका व्यवहार सर्व हा संसार , वाया येरं -झारं हरिवीण ! " या पापसंकल्पा पासून निर्माण होणारा संसार खरा नसलेला उद्योग आहे . असत्याला खरे मानून माणसाची फरपट होते, सत्यावाचून, भगवंतावाचून जन्ममरणाची फुकट कंटाळवाणी ये-जा होते. त्यामुळे जीव बंधनात अडकतो. समर्थ म्हणतात, हा मायेचा संकल्प प्रत्यक्ष व्यवहारात विषयासक्ती रूपाने प्रकटतो. जीवाभोवती वासनेचे आवरण, त्यातून स्वार्थाचा उगम, त्यामुळे दुराचरण आणि त्यामुळे जगामध्ये छी थूच होते ! अविवेकी माणसे दृश्य भोगांच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात, ही वासना प्रथम सुख देते पण अंती दु:खात लोटते. समर्थ म्हणतात, " विषयजनित जे जे सुख! तेथेची होते परम दु:ख!! पूर्वी गोड ! अंती शोक नेमस्त आहे !!" सत्य संकल्प म्हणजे शाश्वताचा, सत्याचा, ब्रह्माचा संकल्प ! सत्याची कल्पना शंकांचे निरसन करून आपणही सत्यात मुरून जाते. त्यामुळे प्रपंचातील सुख -दु:खाच्या हेलाकाव्यानी मन विचलित होत नाही, अहंकार संपतो,सर्व जीवांबद्दल दया वाटते, परोपकारात आनंद वाटू लागतो, वागण्यात दया, क्षमा, शांती आणि भक्ती दिसू लागते .स्वत:चेच विस्मरण होऊन भगवंताचेठाई मन स्थिर होऊ लागते. यामुळे ज्ञान मार्गातील विवेक उत्पन्न होतो, सात्विक गुणाने भगवंताची भक्ती वा ज्ञानाची प्राप्ती होऊन मनुष्य आत्मज्ञानी होतो, संसार सागरातून तरुन जातो. म्हणून पापसंकल्प म्हणजे दृश्याची आवड न ठेवता सत्यसंकल्पाची म्हणजे श्रीरामाची आवड धरावी! जय जय रघुवीर समर्थ !
सांडून राम आनंदघना | ज्याचे मनी विषयचिंतना | त्यासी कैसे समाधान| लोलंगतासी || दास ३.१०.६२|| केवळ विषय वासानेमध्ये रमणाऱ्या जीवाची फजितीच होते. या वासनेमुळे न्मानामध्ये अनेक विकार उत्पन्न होतात आणि या वासना आणि विकारांमुळे जीवाचे अतोनात हाल होतात. ... समर्थ म्हणतात जेथे वासना झोंबोन पडे | तेणेचि अपाये दु:ख जडे | म्हणौनी विषयवासना मोडे| तो एक सुखी ||दास ३.१०.६४|| नरदेह प्राप्त झाल्यानंतर विषयांच्या मागे लागून दु:ख होण्यापेक्षा खऱ्या आनंदाचा शोध घेण्यास समर्थ सांगतात ... मानवी मनातील विकारांमुळे त्याचे अध: पतन होते ..विकार अनेक प्रकारचे आहेत पण त्यातील काम, क्रोध, लोभ, मद,मोह,मत्सर हे अत्यंत प्रभावी आहेत त्या पासून तू दूर राहा हे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत ......... जय जय रघुवीर समर्थ !
As stated by Lochan Kate ( Gwaliar)..श्लोक ५... श्रीरामदासजी का कहना है कि-- हे मनुष्य मन ! पाप कर्म करने का संकल्प छोड देना चाहिए बल्कि पाप कर्म का संकल्प करना ही नही चाहिए| मन को सदैव निर्मल एवं पवित्र होना चाहिए|सत्य के मार्ग का संकल्प सदैव करना चाहिए| मानसिकता मे विषयो के प्रति भावनाये नही होना चाहिए| अर्थात् बुराईयो की कल्पना से परे रहना चाहिए | नाना विषयो की कल्पना के कारण लोगो के मन मे विकार पैदा होते है| दूर्भावनाये और दुष्टता आती है| जिससे वह स्वयं का एवं समाज का नाश करता है|अत: सदैव सद् भावना से मनुष्य को अपने व्यक्तित्व मे निखार लाना चाहिए|.
समर्थ मनाला पाप संकल्प सोडून दे व सत्यसंकल्प स्वीकारायला सांगतात :पाप संकल्प याचा अर्थ काय असे बघायला गेल्यास पाप म्हनजे काय हे विचारात घ्यावे लागेल .देह आणि ईंद्रिय यांच्या बद्दल असलेले ममत्व हेच पाप ! देह म्हनजे मी असा संकल्प हेच पाप संकल्पाचे लक्षण् आहे .जरी मानूस माज़ा देह ,माझे मन म्हनतो तरी मी देहापासून वेगला आहे हे देह ईंद्रियांच्या तादात्म्याने ओलखता येत नाही .आणि तेच पाप असते .पाप यासाठी असते की त्याने विषया सक्ती वाधते .समर्थ म्हनतात : देह मी वाटे ज्या नरा | तो जाणावा आत्महत्यारा |देहा भिमाने येरझारा | भोगिल्याच भोगी | | समर्थ सांगतात अज्ञान ,देह्बुध्दी ,विषयासक्ती ,याचा अर्थ पाप .समर्थ या गोष्टी सोडून द्ययाला सांगतात . सत्य संकल्प मनी धरायला सांगतात .सोहं म्हनजे मी तोच आहे .मी ब्रह्माचा अंश आहे ,मी आत्मा आहे असा संकल्प करने हा सत्य संकल्प आहे .सोहं आत्मा स्वानंद घन |अजन्मा तो तूची जान |सुदृढ धरावे | मी देही ,जीव असा संस्कार आपल्यावर अनेक जन्मांचा असतो .पन ते सोडून मी आत्मा आहे याचा अभ्यास करायचा .सत्य संकल्पात मन गुंतल्याने आपले स्वरूप आपल्याला समजते . समर्थ म्हनतात की विषयांचा विचारही करू नका 'कारण कल्पना जीव गेला तरी वासनेच्या रूपाने शिल्लक राहते .आपल्या कल्पने प्रमाणे आपले आचार ,उच्चार वा विचार असतात .त्याप्रमाणे आपल्याला सुख दु :ख भोगायला लागते .विषय सेवन जेव्हडे जास्त तेव्हडे दु :ख जास्त प्रचीतीला येते .मन विकारी बनते .काम ,क्रोध ,मद , मत्सर लोभ मोह अशा शडरिपुंनी माणसाचे अध:पतन होते .विषये सेविता कोण तृप्त जाला |ईंधने निमाला अग्नी कोठे | असे म्हटले आहेच .म्हणून सत्य संकल्प मनी धरायला समर्थ सांगतात .
8 comments:
//श्रीराम समर्थ //
आधीच्या श्लोकात समर्थ मनाला निन्द्यनीय गोष्टींचा त्याग करायला सांगतात आणि वंदनीय गोष्टींचा स्वीकार करायला सांगतात . या श्लोकामध्ये समर्थ पापसंकल्प सोडून देऊन सत्यसंकल्प चित्तात धरावा असे सांगतात.दासबोधामध्ये समर्थांनी या विषयी विस्ताराने सांगितले आहे ...
सत्य ब्रह्माचा संकल्प ! मिथ्या मायेचा विकल्प !! दास ७.५.४!!
ब्रह्माचा संकल्प म्हणजे सत्य संकल्प आणि संसाराचा किंवा विषयांचा संकल्प म्हणजे पापसंकल्पना .....
असत्य म्हणजे तेची पाप ! सत्य जाणावे स्वरूप!! दास १८.५.२६ !!
हे संकल्प आणि विकल्पच बंधनाला आणि मोक्षाला कारण होतात!
जय जय रघुवीर समर्थ!
/Sreeram Samarth/
Before stating what needs to be done , Samarth has also stated what need not to be done...! Normally Samarth goes by "rule of elimination"! Before ' Satvagun' He will tell 'Tamogun' & then 'Rajogun'!
He will also tell 'Murkha Lakshan' & 'Padhat-Murkha Lakshan' !
He is an excellent teacher! Like a teacher , He will first explain what is NOT good and for a common man he will get in to the common examples!
In this shloka also he tells first to go away from " Pap Sankalpa" and then get to " Satya Sankalpa"
Further He explains the consequences of 'Pap-Sankalpa' , They will lead to ' Vikar' which will further lead to 'Vishaya Vasana'
Under influence of Vasana, one will loose the 'Vivek'! In the absence of Vivek , you are bound to make the blunders! And the people will shame on you!
For a man, the biggest fear is the death and after that "Aapkirti" !
'Aapkirti is at a times , worst than death !
So Samarth is explaining here the consequences of papsankalp is " Chi Chi = Insult / Bad name " So be away from that !
Jay Jay Raghuveer Samarth !
// श्रीराम समर्थ //
मी म्हणजे देह हीच स्वत: ची ओळख असणारे जीव सतत विषय चिंतनात रमतो आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो ....
मन हे चंचल आहे ते जास्तीत जास्त कल्पनेमध्ये रमत असते .. ज्या ज्या कल्पना ते करते ते प्राप्त करून घेण्यासाठी ते सतत धडपडत राहते आणि ती गोष्ट प्राप्त झाली नाही कि दु:खी होते ....
जीव जोपर्यंत देह्बुद्धीमध्ये अडकला आहे तोपर्यंत त्याला परमार्थ साधता येणारा नाही ... देह्बुद्धीमध्ये विलक्षण सामर्थ्य असते.. योगी लोकांना देखील देहबुद्धी त्रास देते !
म्हणून समर्थ म्हणतात,
देहबुद्धी ही झडे/ तरीच परमार्थ घडे /
देहबुद्धीने बिघडे / ऐक्यता ब्रह्मीची // दास ७-२-३९ //
सत्यसंकल्प- साठी देहबुद्धी ते आत्मबुद्धि करावी असे समर्थांचे सांगणे आहे.
जय जय रघुवीर समर्थ
सत्यसंकल्पाची कास धरायची असेल तर हे मना, विषयांच्या चिंतनात रमू नको....
ज्याचे चिंतन चालते तेच प्राप्त करून घेण्याची मनाला ओढ लागते विवेकी मनुष्य आपले मन भगवंताच्या चिंतनात रमवतो पण अविवेकी माणसे मात्र सतत सुखाच्या शोधात फिरत राहतात ... समर्थ म्हणतात....
ज्यास वाटे सीण व्हावा / त्याने विषय चिंतीत जावा//
विषयो न मिळता जीवा/ तगबग सुटे // दास ३-१०-६१//
विषयी माणसाची अवस्था समर्थ स्पष्ट करतात .. विषय चिंतनाने जीवाला केवळ असमाधान, अतृप्तीच प्राप्त होते ....देहाच्या माध्यमातून जे जे सुख प्राप्त होते त्याने अखेरीस दु:खच पदरात पडते ..
सुरुवातीला सर्वच विषय- सुखामध्ये गोडी वाटते पण नंतर दु:खापलीकडे काहीच मिळत नाही ..
जसे गळाला लागलेल्या खाद्यासाठी मासा धाव घेतो, सुरुवातीला त्याला त्याची गोडी वाटते पण नंतर जेव्हा तो त्यामध्ये अडकतो तेव्हा त्याची अवस्था दयनीय होते ...
तैसी विषयसुखाची गोडी / गोड वाटते परी ते कुडी //
म्हणोनी आवडी/ रघुनाथी धरावी // दास. ३.१०.६७//
जय जय रघुवीर समर्थ !
//श्रीराम समर्थ //
मना ! पापसंकल्प सोडून सत्यसंकल्प चित्तात धरावा. विषयांची कल्पनाही मनात आणू नये.विकारांच्यामुळे मनुष्याची बदनामी होते .पापसंकल्प म्हणजे मिथ्या संसाराचा, विषयांचा संकल्प ! संत ज्ञानेश्वर माउलीने हरिपाठात सांगितलेच आहे .
" लटिका व्यवहार सर्व हा संसार , वाया येरं -झारं हरिवीण ! "
या पापसंकल्पा पासून निर्माण होणारा संसार खरा नसलेला उद्योग आहे .
असत्याला खरे मानून माणसाची फरपट होते, सत्यावाचून, भगवंतावाचून जन्ममरणाची फुकट
कंटाळवाणी ये-जा होते. त्यामुळे जीव बंधनात अडकतो.
समर्थ म्हणतात, हा मायेचा संकल्प प्रत्यक्ष व्यवहारात विषयासक्ती रूपाने प्रकटतो. जीवाभोवती
वासनेचे आवरण, त्यातून स्वार्थाचा उगम, त्यामुळे दुराचरण आणि त्यामुळे जगामध्ये छी थूच होते !
अविवेकी माणसे दृश्य भोगांच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात, ही वासना प्रथम सुख देते पण अंती दु:खात लोटते.
समर्थ म्हणतात,
" विषयजनित जे जे सुख! तेथेची होते परम दु:ख!!
पूर्वी गोड ! अंती शोक नेमस्त आहे !!"
सत्य संकल्प म्हणजे शाश्वताचा, सत्याचा, ब्रह्माचा संकल्प !
सत्याची कल्पना शंकांचे निरसन करून आपणही सत्यात मुरून जाते.
त्यामुळे प्रपंचातील सुख -दु:खाच्या हेलाकाव्यानी मन विचलित होत नाही, अहंकार संपतो,सर्व जीवांबद्दल दया वाटते, परोपकारात आनंद वाटू लागतो, वागण्यात दया, क्षमा, शांती आणि भक्ती दिसू लागते .स्वत:चेच विस्मरण होऊन भगवंताचेठाई मन स्थिर होऊ लागते. यामुळे ज्ञान मार्गातील विवेक उत्पन्न होतो, सात्विक गुणाने भगवंताची भक्ती वा ज्ञानाची प्राप्ती होऊन मनुष्य आत्मज्ञानी होतो, संसार सागरातून तरुन जातो.
म्हणून पापसंकल्प म्हणजे दृश्याची आवड न ठेवता सत्यसंकल्पाची म्हणजे श्रीरामाची आवड धरावी!
जय जय रघुवीर समर्थ !
.
||श्रीराम समर्थ||
सांडून राम आनंदघना | ज्याचे मनी विषयचिंतना |
त्यासी कैसे समाधान| लोलंगतासी || दास ३.१०.६२||
केवळ विषय वासानेमध्ये रमणाऱ्या जीवाची फजितीच होते. या वासनेमुळे न्मानामध्ये अनेक विकार उत्पन्न होतात आणि या वासना आणि विकारांमुळे जीवाचे अतोनात हाल होतात. ... समर्थ म्हणतात
जेथे वासना झोंबोन पडे | तेणेचि अपाये दु:ख जडे |
म्हणौनी विषयवासना मोडे| तो एक सुखी ||दास ३.१०.६४||
नरदेह प्राप्त झाल्यानंतर विषयांच्या मागे लागून दु:ख होण्यापेक्षा खऱ्या आनंदाचा शोध घेण्यास समर्थ सांगतात ...
मानवी मनातील विकारांमुळे त्याचे अध: पतन होते ..विकार अनेक प्रकारचे आहेत पण त्यातील काम, क्रोध, लोभ, मद,मोह,मत्सर हे अत्यंत प्रभावी आहेत त्या पासून तू दूर राहा हे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत .........
जय जय रघुवीर समर्थ !
As stated by Lochan Kate ( Gwaliar)..श्लोक ५...
श्रीरामदासजी का कहना है कि-- हे मनुष्य मन ! पाप कर्म करने का संकल्प छोड देना चाहिए बल्कि पाप कर्म का संकल्प करना ही नही चाहिए| मन को सदैव निर्मल एवं पवित्र होना चाहिए|सत्य के मार्ग का संकल्प सदैव करना चाहिए| मानसिकता मे विषयो के प्रति भावनाये नही होना चाहिए| अर्थात् बुराईयो की कल्पना से परे रहना चाहिए | नाना विषयो की कल्पना के कारण लोगो के मन मे विकार पैदा होते है| दूर्भावनाये और दुष्टता आती है| जिससे वह स्वयं का एवं समाज का नाश करता है|अत: सदैव सद् भावना से मनुष्य को अपने व्यक्तित्व मे निखार लाना चाहिए|.
समर्थ मनाला पाप संकल्प सोडून दे व सत्यसंकल्प स्वीकारायला सांगतात :पाप संकल्प याचा अर्थ काय असे बघायला गेल्यास पाप म्हनजे काय हे विचारात घ्यावे लागेल .देह आणि ईंद्रिय यांच्या बद्दल असलेले ममत्व हेच पाप ! देह म्हनजे मी असा संकल्प हेच पाप संकल्पाचे लक्षण् आहे .जरी मानूस माज़ा देह ,माझे मन म्हनतो तरी मी देहापासून वेगला आहे हे देह ईंद्रियांच्या तादात्म्याने ओलखता येत नाही .आणि तेच पाप असते .पाप यासाठी असते की त्याने विषया सक्ती वाधते .समर्थ म्हनतात : देह मी वाटे ज्या नरा | तो जाणावा आत्महत्यारा |देहा भिमाने येरझारा | भोगिल्याच भोगी | | समर्थ सांगतात अज्ञान ,देह्बुध्दी ,विषयासक्ती ,याचा अर्थ पाप .समर्थ या गोष्टी सोडून द्ययाला सांगतात .
सत्य संकल्प मनी धरायला सांगतात .सोहं म्हनजे मी तोच आहे .मी ब्रह्माचा अंश आहे ,मी आत्मा आहे असा संकल्प करने हा सत्य संकल्प आहे .सोहं आत्मा स्वानंद घन |अजन्मा तो तूची जान |सुदृढ धरावे | मी देही ,जीव असा संस्कार आपल्यावर अनेक जन्मांचा असतो .पन ते सोडून मी आत्मा आहे याचा अभ्यास करायचा .सत्य संकल्पात मन गुंतल्याने आपले स्वरूप आपल्याला समजते .
समर्थ म्हनतात की विषयांचा विचारही करू नका 'कारण कल्पना जीव गेला तरी वासनेच्या रूपाने शिल्लक राहते .आपल्या कल्पने प्रमाणे आपले आचार ,उच्चार वा विचार असतात .त्याप्रमाणे आपल्याला सुख दु :ख भोगायला लागते .विषय सेवन जेव्हडे जास्त तेव्हडे दु :ख जास्त प्रचीतीला येते .मन विकारी बनते .काम ,क्रोध ,मद , मत्सर लोभ मोह अशा शडरिपुंनी माणसाचे अध:पतन होते .विषये सेविता कोण तृप्त जाला |ईंधने निमाला अग्नी कोठे | असे म्हटले आहेच .म्हणून सत्य संकल्प मनी धरायला समर्थ सांगतात .
Post a Comment