II श्रीराम समर्थ II
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥ जय जय रघुवीर समर्थ !
// श्री राम // " प्रभाते मनी राम चिंतीत जावा " ही दिशा दाखवून समर्थ सतत भगवंताच्या स्मरणात राहण्याचे मार्गदर्शन करतात. नामस्मरण भक्तीवर समर्थ याठिकाणी भर देतात. नामस्मरण करताना 'स्मरण' हा शब्द महत्वाचा आहे. नामाच्या माध्यमातून सतत त्याचे स्मरण ठेवले तर मन आपोआपच त्याच्या चिंतनात राहणार आहे.हे समर्थ या ठिकाणी सांगतात. खरेतर ज्याचे विस्मरण होते; त्याचेच स्मरण केले जाते! मायेच्या प्रभावाखाली भौतिक जगतावर प्रेम करणाऱ्या जीवाला सतत भगवंताचे विस्मरण होते. पण सतत त्याचे स्मरण हा जीवन ध्यास घेतला पाहिजे. पाप आणि पुण्य ही संकल्पना मांडताना संतानी भगवंताचे विस्मरण ते पाप आणि त्याचे स्मरण म्हणजे पुण्य असे स्पष्ट म्हंटले आहे . सतत भगवंताच्या स्मरणात दंग असणाऱ्या संतांनी आपले प्रत्येक कर्म, आपला प्रत्येक श्वास भगवंताला अर्पण केला आहे. संत चोखामेळा यांनी आपले सारे जीवन परमेश्वर चिंतनात व्यतीत केले, त्यामुळे त्यांच्या मृत्युनंतर देखील त्यांच्या अस्थीमधून विठ्ठलाच्या नामाचा गजर ऐकू येत होता !
// श्रीराम समर्थ // सदाचाराचे महत्व आजच्या काळातही किती आहे हे नव्याने सांगायला नको ! सत्यमची (रामलिंग राजू ) लबाडी बाहेर आल्यावर त्याचे महत्व कळते . सदाचार हा फक्त अध्यात्मातच आवश्यक नसून अगदी कार्पोरेट संस्कृतीतही अत्यंत आवश्यक आहे .सदाचाराचे कार्पोरेट जगतातील नाव म्हणजे -Compliance ! या सदाचाराचे मूळ मनातील विचारांच्यापाशी आहे. watch your thoughts they become your words Wtch your words they become your actions Watch your actions that become your destiny ! आणि म्हणून मनातील विचारांचा आणि आपल्या sadacharacha जवळचा संबंध आहे. मनाला चांगले वळण लावले तर आपोआप सदाचार घडेल ! म्हणून समर्थ म्हणतात , रामाचे नाव घे आपोआप सदाचार घडेल. जय जय रघुवीर समर्थ !
//श्रीराम समर्थ // एक पळभर देखील त्या भगवंताचे विस्मरण होऊ नये असे संतांचे कळवळून सांगणे आहे. समर्थ म्हणतात, चालता बोलता धंदा करिता! खाता जेवता सुखी होता ! नाना उपभोग भोगिता ! नाम विसरू नये !! रोजचा व्यवहार करीत असताना सतत त्याचे स्मरण असावे असे त्यांचे सांगणे आहे पण अशी स्थिती कधी प्राप्त होईल ? तर मनाला सतत नाम घेण्याची सवय लागली तरच!.पण यासाठी साधनेची बैठक देखील तितकीच आवश्यक आहे. म्हणूनच समर्थ या ठिकाणी, "प्रभाते मनी राम चिंतीत जावा" असे सांगतात. ज्या गोष्टीचे सतत चिंतन चालते त्याचेच नित्य स्मरण आपल्याला राहते हा आपला सर्वांचा अनुभव आहे .. सकाळी उठल्यानंतर जे विचार आपण करतो , दिवसभर त्याचाच पाठपुरावा आपण करत असतो .. म्हणून समर्थ या ठिकाणी दिवसाची सुरुवात भगवंत चिंतनाने करण्यास सांगतात. पहाटेची वेळ अशी आहे कि ज्यावेळी बाह्य परिस्थिती शांत असते .तसेच आपल्या अंत:करणामध्येदेखील शांतता असते...विचाराचे कुठलेही तरंग मनावर उमटलेले नसतात. अशा या शांत प्रहरी समर्थ भगवंताचे चिंतन करायला सांगतात आणि दिवसभरामध्ये कर्म करत असताना सतत भगवंताचे स्मरण करायला सांगतात .......
// श्रीराम समर्थ // ज्यांनी भक्तिपंथ स्वीकारला आहे त्यांचे आचरण कसे असावे याचे मार्गदर्शन समर्थ करतात. भक्ती आणि सदाचार या विषयी समर्थ या श्लोकामध्ये मार्गदर्शन करतात भक्तीपंथावर वाटचाल करताना सदाचाराचे महत्व देखील तेवढेच आहे ...शुद्ध आचरण हा परमार्थमार्गाचा पाया आहे. पहिले २६ श्लोक पहिले तर समर्थ कर्मयोगावर भर देताना दिसतात. आपले आचरण कसे असावे, सदाचाराची वागणूक कशी असावी, आपली वाणी कशी असावी याविषयी ते मार्गदर्शन करतात. सदाचार-उत्तम आचारण आणि सतत भगवंताचे चिंतन आणि स्मरण यामुळे माणसाच्या वृत्ती शांत होतात, बुद्धि स्थिर होते. यासाठीच समर्थ याठिकाणी भगवंत चिंतन- मनन आणि स्मरणावर भर देऊन सदाचाराचा पाठपुरावा करायला सांगतात . भगवंताचे सतत चिंतन करणारे ज्या देहात वास्तव्य करते तो देह पवित्र असला पाहिजे. संतस्तवनात समर्थ म्हणतात, " संत स्वरूपाचे सत्पात्र " संतांचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम पात्र ! अशा पावोत्र देहात वास्तव्य करायला भगवंताला अधिक आवडते. भक्ती आणि सदाचाराची सांगड घालून जीवन व्यतीत करण्यानेच जीवन धन्य होते असे त्यांचे सांगणे आहे.
As stated by Lochan Kate ( Gwaliar ) श्लोक ३ ... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! प्रात: समय मे श्रीराम का ही चिंतन करते रहना चाहिए| सदैव सदाचार का आचरण रखना चाहिए| वाणी से प्रथम श्रीराम कहो तब घर -संसार के अर्थात् प्रपंच के कार्य प्रारंभ करना चाहिए| सदाचार का आचरण रखना सदैव महानता का लक्षण है| उसका जो पालन करेगा वही मानव जीवन मे धन्य तथा वंदनीय होगा|
प्रभात म्हणजे सकाळी ४|| ते ६ ची वेळ .या काळात प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे ,मनन करावे ,त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी , त्यांचे गुण आठवावे ,त्यांनी केलेल्या लीला आठवाव्या .नंतर वैखरीने आपल्याला ऐकू येईल असे मोठ्याने नाम घ्यावे . नाम चार प्रकाराने घेता येते : स्मरण म्हणजे जे मुखी नाम उच्चारावे | चिंतन ते निज अंतरीच स्मरावे | अनुसंधान ते चालतसे स्वभावे | इडा पिंगला स्वभावे | चौथे निजध्यासन म्हणिजे एकात्मता | नाहं पणे सहज स्थिती ब्रह्मी ऐक्यता | | पहाटे नाम स्मरावे ,त्यावेळेस वृत्ती शांत असतात ,बाहेरही शांतता असते त्यामुळे मन एकाग्र होते . चिंतना नंतर वाणीने नाम घ्यावे .सदाचार थोर आहे ,तो सोडू नये असे समर्थ म्हणतात . विचाराचार संयोगा |सदाचार : स उच्यते | विचार आणि आचाराचा संयोग म्हणजे सदाचार ! समर्थ म्हणतात : विवेके क्रिया आपुली पालटावी |अति आदरे शुध्द क्रिया धरावी | असा सदाचारी माणूसच 'जनी तोची तो मानवी धन्य होतो .
Its the that time when you realised that there is God within me, in ourselves as the soul or atma, At that time is the Prabhat kal for us, At its since that time we are to Continue the constant chanting the name of the Lord 'Sri Ram' thus to transform our mind or control the mind to make it perform the actions that our soul tells us to do.
श्लोक [३]... प्रभाती समय मे, श्रीराम को ध्याओ| मुख से प्रथम राम ,शब्द निकालो|| सदाचार महान है कभी छोडो इसे न| वही जन मे मानव होता रे धन्य||श्रीराम३|| अर्थ....... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! प्रात: समय मे मुख से श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये | सदैव सदाचार का आचरण रखना चाहिये| वाणी से प्रथम श्रीराम कहो, तब घर संसार अर्थत् प्रपंच का कार्य प्रारंभ करना चाहिये| सदाचार का आचरण रखना सदैव महानता का लक्षण है|उसका जो पालन करेगा वही मानव जीवन मे धन्य तथा वंदनीय है||३||
9 comments:
// श्री राम //
" प्रभाते मनी राम चिंतीत जावा " ही दिशा दाखवून समर्थ सतत भगवंताच्या स्मरणात राहण्याचे मार्गदर्शन करतात. नामस्मरण भक्तीवर समर्थ याठिकाणी भर देतात.
नामस्मरण करताना 'स्मरण' हा शब्द महत्वाचा आहे. नामाच्या माध्यमातून सतत त्याचे स्मरण ठेवले तर मन आपोआपच त्याच्या चिंतनात राहणार आहे.हे समर्थ या ठिकाणी सांगतात.
खरेतर ज्याचे विस्मरण होते; त्याचेच स्मरण केले जाते! मायेच्या प्रभावाखाली भौतिक जगतावर प्रेम करणाऱ्या जीवाला सतत भगवंताचे विस्मरण होते. पण सतत त्याचे स्मरण हा जीवन ध्यास घेतला पाहिजे.
पाप आणि पुण्य ही संकल्पना मांडताना संतानी भगवंताचे विस्मरण ते पाप आणि त्याचे स्मरण म्हणजे पुण्य असे स्पष्ट म्हंटले आहे .
सतत भगवंताच्या स्मरणात दंग असणाऱ्या संतांनी आपले प्रत्येक कर्म, आपला प्रत्येक श्वास भगवंताला अर्पण केला आहे. संत चोखामेळा यांनी आपले सारे जीवन परमेश्वर चिंतनात व्यतीत केले, त्यामुळे त्यांच्या मृत्युनंतर देखील त्यांच्या अस्थीमधून विठ्ठलाच्या नामाचा गजर ऐकू येत होता !
जय जय रघुवीर समर्थ !
--
// श्रीराम समर्थ //
सदाचाराचे महत्व आजच्या काळातही किती आहे हे नव्याने सांगायला नको ! सत्यमची (रामलिंग राजू ) लबाडी बाहेर आल्यावर त्याचे महत्व कळते . सदाचार हा फक्त अध्यात्मातच आवश्यक नसून अगदी कार्पोरेट संस्कृतीतही अत्यंत आवश्यक आहे .सदाचाराचे कार्पोरेट जगतातील नाव म्हणजे -Compliance !
या सदाचाराचे मूळ मनातील विचारांच्यापाशी आहे.
watch your thoughts they become your words
Wtch your words they become your actions
Watch your actions that become your destiny !
आणि म्हणून मनातील विचारांचा आणि आपल्या sadacharacha जवळचा संबंध आहे.
मनाला चांगले वळण लावले तर आपोआप सदाचार घडेल !
म्हणून समर्थ म्हणतात , रामाचे नाव घे आपोआप सदाचार घडेल.
जय जय रघुवीर समर्थ !
//श्रीराम समर्थ //
एक पळभर देखील त्या भगवंताचे विस्मरण होऊ नये असे संतांचे कळवळून सांगणे आहे.
समर्थ म्हणतात,
चालता बोलता धंदा करिता! खाता जेवता सुखी होता !
नाना उपभोग भोगिता ! नाम विसरू नये !!
रोजचा व्यवहार करीत असताना सतत त्याचे स्मरण असावे असे त्यांचे सांगणे आहे
पण अशी स्थिती कधी प्राप्त होईल ? तर मनाला सतत नाम घेण्याची सवय लागली तरच!.पण यासाठी साधनेची बैठक देखील तितकीच आवश्यक आहे. म्हणूनच समर्थ या ठिकाणी, "प्रभाते मनी राम चिंतीत जावा" असे सांगतात.
ज्या गोष्टीचे सतत चिंतन चालते त्याचेच नित्य स्मरण आपल्याला राहते हा आपला सर्वांचा अनुभव आहे .. सकाळी उठल्यानंतर जे विचार आपण करतो , दिवसभर त्याचाच पाठपुरावा आपण करत असतो .. म्हणून समर्थ या ठिकाणी दिवसाची सुरुवात भगवंत चिंतनाने करण्यास सांगतात.
पहाटेची वेळ अशी आहे कि ज्यावेळी बाह्य परिस्थिती शांत असते .तसेच आपल्या अंत:करणामध्येदेखील शांतता असते...विचाराचे कुठलेही तरंग मनावर उमटलेले नसतात. अशा या शांत प्रहरी समर्थ भगवंताचे चिंतन करायला सांगतात आणि दिवसभरामध्ये कर्म करत असताना सतत भगवंताचे स्मरण करायला सांगतात .......
जय जय रघुवीर समर्थ !
// श्रीराम समर्थ //
ज्यांनी भक्तिपंथ स्वीकारला आहे त्यांचे आचरण कसे असावे याचे मार्गदर्शन समर्थ करतात.
भक्ती आणि सदाचार या विषयी समर्थ या श्लोकामध्ये मार्गदर्शन करतात भक्तीपंथावर वाटचाल करताना सदाचाराचे महत्व देखील तेवढेच आहे ...शुद्ध आचरण हा परमार्थमार्गाचा पाया आहे.
पहिले २६ श्लोक पहिले तर समर्थ कर्मयोगावर भर देताना दिसतात. आपले आचरण कसे असावे, सदाचाराची वागणूक कशी असावी, आपली वाणी कशी असावी याविषयी ते मार्गदर्शन करतात.
सदाचार-उत्तम आचारण आणि सतत भगवंताचे चिंतन आणि स्मरण यामुळे माणसाच्या वृत्ती शांत होतात, बुद्धि स्थिर होते. यासाठीच समर्थ याठिकाणी भगवंत चिंतन- मनन आणि स्मरणावर भर देऊन सदाचाराचा पाठपुरावा करायला सांगतात .
भगवंताचे सतत चिंतन करणारे ज्या देहात वास्तव्य करते तो देह पवित्र असला पाहिजे.
संतस्तवनात समर्थ म्हणतात, " संत स्वरूपाचे सत्पात्र " संतांचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम पात्र !
अशा पावोत्र देहात वास्तव्य करायला भगवंताला अधिक आवडते. भक्ती आणि सदाचाराची सांगड घालून जीवन व्यतीत करण्यानेच जीवन धन्य होते असे त्यांचे सांगणे आहे.
जय जय रघुवीर समर्थ !
जय जय रघुवीर समर्थ !
As stated by Lochan Kate ( Gwaliar )
श्लोक ३ ...
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! प्रात: समय मे श्रीराम का ही चिंतन करते रहना चाहिए| सदैव सदाचार का आचरण रखना चाहिए| वाणी से प्रथम श्रीराम कहो तब घर -संसार के अर्थात् प्रपंच के कार्य प्रारंभ करना चाहिए| सदाचार का आचरण रखना सदैव महानता का लक्षण है| उसका जो पालन करेगा वही मानव जीवन मे धन्य तथा वंदनीय होगा|
प्रभात म्हणजे सकाळी ४|| ते ६ ची वेळ .या काळात प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे ,मनन करावे ,त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी ,
त्यांचे गुण आठवावे ,त्यांनी केलेल्या लीला आठवाव्या .नंतर वैखरीने आपल्याला ऐकू येईल असे मोठ्याने नाम घ्यावे .
नाम चार प्रकाराने घेता येते :
स्मरण म्हणजे जे मुखी नाम उच्चारावे | चिंतन ते निज अंतरीच स्मरावे |
अनुसंधान ते चालतसे स्वभावे | इडा पिंगला स्वभावे |
चौथे निजध्यासन म्हणिजे एकात्मता | नाहं पणे सहज स्थिती ब्रह्मी ऐक्यता | |
पहाटे नाम स्मरावे ,त्यावेळेस वृत्ती शांत असतात ,बाहेरही शांतता असते त्यामुळे मन एकाग्र होते .
चिंतना नंतर वाणीने नाम घ्यावे .सदाचार थोर आहे ,तो सोडू नये असे समर्थ म्हणतात .
विचाराचार संयोगा |सदाचार : स उच्यते |
विचार आणि आचाराचा संयोग म्हणजे सदाचार !
समर्थ म्हणतात : विवेके क्रिया आपुली पालटावी |अति आदरे शुध्द क्रिया धरावी |
असा सदाचारी माणूसच 'जनी तोची तो मानवी धन्य होतो .
Its the that time when you realised that there is God within me, in ourselves as the soul or atma, At that time is the Prabhat kal for us, At its since that time we are to Continue the constant chanting the name of the Lord 'Sri Ram' thus to transform our mind or control the mind to make it perform the actions that our soul tells us to do.
श्लोक [३]...
प्रभाती समय मे, श्रीराम को ध्याओ|
मुख से प्रथम राम ,शब्द निकालो||
सदाचार महान है कभी छोडो इसे न|
वही जन मे मानव होता रे धन्य||श्रीराम३||
अर्थ....... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! प्रात: समय मे मुख से श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये | सदैव सदाचार का आचरण रखना चाहिये| वाणी से प्रथम श्रीराम कहो, तब घर संसार अर्थत् प्रपंच का कार्य प्रारंभ करना चाहिये| सदाचार का आचरण रखना सदैव महानता का लक्षण है|उसका जो पालन करेगा वही मानव जीवन मे धन्य तथा वंदनीय है||३||
Post a Comment