Friday, January 1, 2010

श्लोक १

//श्रीराम समर्थ //

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

जय जय रघुवीर समर्थ !

9 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

जय जय रघुवीर समर्थ
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वाड्मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे.या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे त्यांचे मनाचे श्लोक. प्रत्येक जीवाचे जीवन बदलवून टाकण्याचे सामर्थ्य या लाटेमध्ये आहे समर्थांचे मनाचे श्लोक आपल्याला आत्मा परीक्षण करायला शिकवतात .
" मन एवं मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो " . मानवी मन त्याच्या बंधनाला तसेच मोक्षाला कारणीभूत असते हे जाणूनच समर्थांनी मनाला उपदेश केला आहे.
या
श्लोकांना प्रारंभ गणेश आणि शारदा स्तवनाने झाली आहे

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम समर्थ //

संत साहित्यात स्तवनाला फार महत्व आहे, त्यायोगे संत आपल्याला नम्रता शिकवतात.
परमेश्वराने माणसाला अनेक दैवी गुण बहाल केले आहेत, त्या गुणांचा जर त्याने योग्य वापर केला तर त्याचे व्यक्तिमत्व निश्चितच प्रभावी होवू शकते.या दैवी गुणां पैकी एक म्हणजे आपल्याला प्राप्त झालेले बुद्धीचे सामर्थ्य!.
पहिल्या श्लोकात समर्थ गणेशाला वंदन करून विषयाला प्रारंभ करतात. मनामध्ये एखाद्या गोष्टीचे अनुमान करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो. यामध्ये अर्थाचे आकलन होण्यास मनुष्याला ज्ञान स्वरूप गणेशाची कृपा असणे आवश्यक असते. कारण त्याच्याच सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ती निर्माण होते.
मंगलमुर्ती सर्व विद्यांचे मूळ आरंभ स्थान आहे.त्याचा पासून सर्व विद्या उत्पन्न होतात. सर्व कर्तुत्वाचा उगम असणारा-श्री गणेश ,बुद्धीची देवता-श्री गणेश,अज्ञान दूर करून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देणारा- श्री गणेश...अनेक विघ्नं निर्माण झाली तर त्याचा नाश करणाऱ्या विघ्नहर्त्या श्री गणेशाला समर्थ वंदन करतात, श्री. गणेशाच्या दृपादृष्टीने या सामर्थ्याचा योग्य तो ऊपयोग केला जावा, या बुद्धीला विवेकाचे अधिष्ठान लाभावे अशीच प्रार्थना समर्थ या नमन द्वारे कताना दिसतात.

जय जय रघुवीर समर्थ !

Suhas said...

// श्रीराम समर्थ //
मनाचे श्लोक या विषयावर मा. सुषमाताई वाटावे यांची mp3 प्रवचने www.samarthramdas400.in येथे अपलोड केलेले आहे. या चर्चे सोबत, जिज्ञासूनी त्याचाही लाभ घ्यावा !

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम समर्थ //
मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. त्याला बुद्धीची सर्वात मोठी देणगी परमेश्वराने बहाल केली आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात,
बुद्धि देणे भगवंताचे / बुद्धिविण माणूस कांचे /
राज्य सांडून फुकाचे / भीक मांगे //दास. १५.१.१५//
या बुद्धीच्या जोरावर मनुष्य आपली प्रगती करून घेऊ शकतो तरी देखील असे काही जीव आहेत कि जे हे सामर्थ्य प्राप्त होऊन देखील त्याचा दुरुपयोग करतात. स्वत: कडे बुद्धीचे सामर्थ्य असून देखील जे त्याचा नीट उपयोग करत नाहीत अशा करंट्याना समर्थ म्हणतात कि बुद्धीचे ऐश्वर्य टाकून ते जणू भीक मागत फिरतात.
अशा करंट्याचा धी:कार करतात. बुद्धीबरोबरच मनुष्याला वाणीचे सामर्थ्य प्राप्त झाले .श्री शारदा हि ज्ञानाची तसेच वाणीची देवता आहे.
जे उठती शब्दांकुर / वादे वैखरी अपार//
जे शब्दांचे अभ्यंतर / उकळून दावी //दास. १.3.२.//
शारदा मातेच्या कृपाप्रसादामुळे प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य ओळखून समर्थांनी तिचे स्तवन केले आहे. शब्दांचे सामर्थ्य प्रचंड आहे . आपण मांडलेल्या ग्रंथप्रपंचा साठी उत्तम शब्दसामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून समर्थांनी तिचा आशीर्वाद मागून घेतला आहे.

जय जय रघुवीर समर्थ

Kalyan Swami said...

As stated by Dr. Madhavi Mahajan ..
// श्रीराम समर्थ //
जगामध्ये जगमित्र / जीव्हेपाशी आहे सूत्र //१९.२.१९//
जगामध्ये जगमित्र व्हायचे असेल तर आपली वाणी गोड असणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्यातूनच आपण मित्र जोडत असतो तसेच अनेक शत्रू पण निर्माण करत असतो.
उत्तम गुणांपैकी "वाणीची मधुरता" हा दैवी गुण समर्थ प्रमाण मानतात. माणसाने नेहमी स्वत: वरून दुसर्याचे अंत:करण जाणावे.
दुसर्याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दांनी दुसर्याचे मन दुखावले जाऊ शकते.
समर्थ म्हणतात .
कठीण शब्दे वाईट वाटते! हे तो प्रत्ययास येते !
तरी मग वाईट बोलावे! काय निमित्ते // दास १२.१०.२३//
आपले बोलणे नम्र तर असावेच पण त्याच बरोबर आपल्या बोलण्याने अनेकांची मने शांत होतील असेच बोलावे असा समर्थांचा आग्रह आहे . लोकसंग्रहाचे सोपे सूत्र समर्थ सहजपणे शिकवून जातात.
प्रभू रामचंद्र समर्थांचे उपास्य दैवत होते.दशरथनंदन श्रीराम, अयोध्येचे भावी राजन , सर्व प्रजाजनांमध्ये मिसळत असत.सर्वांची दु:खे जाणून घेत असत. लाघवी बोलणे आणि नम्र वाणीमुळे प्रजाजनांना दिलासा मिळत असे. समर्थ स्वत: देखील हाच आदर्श समोर ठेवून आचरण करत असत.
कठोर वाचेने बोलणाऱ्याविषयी त्यांना अत्यंत तिटकारा होता.दासबोधामध्ये त्यांनी तोंडाळ, कठोरवचनी, शीघ्र कोपी माणसाला राक्षस संबोधले आहे. (दास. १८.६.५)
दुसर्याला दुखावणारी वाणी अपवित्र असल्याचे समर्थांचे स्पष्ट मत आहे. शब्दांचा वापर विवेकाने, विचाराने केला पाहिजे ही जाणीव समर्थ आपल्याला करून देतात.

जय जय रघुवीर समर्थ !

suvarna lele said...

पहिल्या मंगलाचरणा च्या श्लोकात समर्थांनी गणेश आणि शारदेला वंदन केले आहे .पण गणेश आणि शारदेचे स्वरूप काय हे समजावून घेणे आवश्यक आहे .सृष्टी च्या निर्मितीच्या मुळाशी जाउन आपण जावून पोहोचलो तर लक्षात येते की परब्रह्म जे सदोदित होते त्याच्या ठिकाणी 'मी अनेक व्हावे 'अशी ईच्छा झाली ,असे स्फुरण झाले ,ते स्फुरण ,तो मूळ संकल्प उठला तीच मूळमाया .तोच सृष्टीचा उगम ! मूळमायेत जाणीव आणि वायू असे दोन भाग झाले .जाणीव म्हणजे गणेश .आपल्याला होणा-या प्रत्येक गोष्टीची जाणीव म्हणजे आपल्यामधील गणेश ! गणेशाचे वर्णन समर्थांनी 'गणाधीश 'असे केले आहे .गण म्हणजे सांख्यांची २४ तत्वे -पंचकर्मेंद्रिये ,पंचज्ञानेंद्रिये ,पंचप्राण,पंचप्राण व अंत :करण चतुष्टय या चोवीस गणांचा अधीश म्हणजे गणाधीश .तो सर्वां गुणांचा आहे असे समर्थ म्हणतात म्हणजे त्याच्याकडे यश ,श्री ,उदारता ज्ञान वैराग्य व ऐश्वर्य असे षडगुण संपन्नता आहे .
मूळमायेचा दुसरा भाग आहे क्रियाशक्ती म्हणजे शारदा ! ती वायुरूप आहे .ती सर्व खेळ करत असते .ती सृष्टी निर्माण करते तशी नष्ट ही
करते .मूळमायेच्या कर्तुत्वास प्रारंभ झाला म्हणून समर्थ मुळारंभ म्हणतात,आणि निर्गुण परब्रह्म सगुण रूपात स्फूर्ती रूपाने आले म्हणून निर्गुणाचा आरंभ म्हणतात .परा ,पश्यंती मध्यमा ,वैखरी या वाणींना प्रेरणा देणारी शारदा आहे म्हणून तिला चारही वाचांची मूळ म्हणतात .

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar )

||श्री मना चे श्लोक||
[श्री मन के श्लोक सार्थ (व्याख्या सहित)]
[१] श्री समर्थ रामदास जी का कहना है कि श्री गणेश जो शिवगणों के एवं सर्वगुणो के राजा है सभी गुणो से परिपूर्ण है ,वही जीवन के मूल में अर्थात आरंभ में निर्गुण परब्रह्म स्वरुप है | उन्हे नमन् करो| इस प्रकार परब्रह्म परमेश्वर को किया नमन् , श्रीराम को प्राप्त करने का अनंत पथ है| इस परम सुखमय , आनंदमय कार्य से हम वंचित ना रहे

Ravindra G.Phadke. said...

Comment on Shloka 1

Since I feel that there is a need for understanding of Sri. Samartha's Thoughts by everybody , english is the best language. Therer is enough literature in Marathi by Sri. Belsare, Sri. Athawale, Dr. Vani etc.

Hence I am giving my comments in English only.

This is The first Shloka. Sri Samartha Is Himself a Brahmadyani.
But he comes first in Duality and then does Stavana of Sri. Ganesha.

Sri Ganesha is the Isha of all the Ishas. From HIM is created all this visible universe. He is the Creater and is Nirguna but is appearing for us in the form of Saguna. In the Ganapati Atharvashirsha we know him as Om.

Sharada is his Shakti. She is also known to us as MAYA. She is present in our life in the form of Four aspects of Speech. We use the Vaikahari as our form of communication with other human beings.This faculty is given to us by Sharada. Sri Samartha does Vandana to both .

He then tells us in the last line that let us follow the path of GOD REALIZATION. For convincing us that He is experienceing the Parabrahman he has used the words " Ya Raghavacha".in this last line.

This also means that by following the meaning and putting what Sri. Samartha tells us in the further shlokas, we too can also reach the ultimate real goal of SELF REALIZATION in this birth itself.

Jai Jai Raghuveer Samartha.

lochan kate said...

श्लोक [१]
गणो के धीश जो, गुणो के ईश है |
मूल के आरंभ में,सम्पूर्ण निर्गुण है||
नमन् शारदा को ,चत्वार की वाचा|
अनंत पथ है जो, राघव का साचा||