Friday, October 25, 2013

श्लोक १९७

||श्रीराम समर्थ ||


नभासारिखे रुप या राघवाचे।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥
तया पाहता देहबुद्धी उरेना।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Tanmay said...

श्लोक १९७......
नभा सारिखे रुप या राघवाचे |
मनी चिंतीता मूळ तुटे भवाचे ||
तया पाहता देह बुद्धि उरेना |
सदा सर्वदा आर्त पोटी उरेना ||१९७||
हिन्दी में......
नभ जैसा होता रुप राघव का |
मन चिंता से टुटता मूल भव का ||
उसे देखकर देह बुध्दि रहेना |
सदा सर्वदा आर्तता भी रहेना ||१९७||
अर्थ....... श्री समर्थ श्री रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! आकाश समान ब्रह्माण्ड रुपी उस राघव का रुप स्वच्छ है | अत: जन्म मरण की चिंता के मूल का अंत होता है | उस श्रीराम के स्वरुप को देखते ही अहंकार का नाश हो जाता है | दुर्बुध्दि का नाश हो जाता है तथा सदैव उस्परम पिता परमेश्वर की आस बनी रहती है | अत: अपना जीवन सार्थक करने को सतत श्रीराम का चिंतन करो |

suvarna lele said...

मागच्या श्लोकात समर्थांनी अंतरात्मा सर्वत्र भरून आहे असे सांगितले आता त्याचे रूप सांगत आहेत .या राघवाचे रूप नभासारखे विस्तीर्ण आहे ,विशाल आहे ,व्यापक आहे ,निर्मळ ,निश्चळ आहे ते परब्रह्मच आहे .परंतु आकाशाची उपमा अपुरी आहे .परब्रह्म उपमा रहित आहे ..आकाशात विकार आहेत ,परब्र्ह्मात नाहीत .आकाशाचे गुण आहे .परब्रह्म गुणरहित आहे . त्यामुळे त्या राघवाचे जर चिंतन केले ,त्याचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या भवसागराचे मूळ तुटते .भवसागरात डूबणारी नौका पैलतीराला लागते .या जन्म मृत्यू च्या फे-यातून सुटका होते .
जन्म मृत्यू च्या फे-यातून सुटका तेव्हाच होते जेव्हा देहबुद्धी उरत नाही .देहबुद्धी म्हणजे मीपणा ,काम ,क्रोधादी विकार .आणि मग राम स्वरूपात भक्त स्वत:ला विसरतो .


AnupamT said...

सुंदर मांडणी आहे... आपले samartharamdas400 ची वेबसाइट मागच्या आठवड्या पासून बंद झाली आहे, माझी आपल्याला कळकळीने विनंती आहे की आपण कृपा करून ती परत सुरु करावी... कारण मी त्यातील प्रवचने ऐकत होतो व pdf वाचत होतो आणि त्या वेबसाइट ने मला खूप मदद झालेली होती _/\_