Friday, October 18, 2013

श्लोक १९६

||श्रीराम समर्थ ||

नभी वावरे जा अणुरेणु काही।
रिता ठाव या राघवेवीण नाही॥
तया पाहता पाहता तोचि जाले।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १९६.......
नभी वावरे जा अणु रेणु काही |
रिता ठाव या राघवे विण नाही ||
तया पाहता पाहता तोचि झाले |
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ||१९६||
हिन्दी में......
नभ में जो व्यापक है अणु रेणु |
रिता ठाया उस राघव बिना नही ||
जिसे देखते -देखते ही वही होता |
वही लक्ष आलक्ष सब कुछ डुबोता ||१९६||
अर्थ.........
श्री समर्थ रमदास स्वामी जी कहते कि हे मानव मन ! आकाश मे जो भी अणु रेणु विचरण करते है उअस राघव के बिना सब कुछ सूना - सूना है | उसे देखते ही देखते व्वही हो जाता है जैसे कोई कार्य किये बिना सोचते - सोचते हो जाता है अर्थात तय किया हुआ लक्ष एकदम सब कुछ डुब जाता है |सब कुछ दिशा हीन हो जाता है | अत: उस राघव के बिना सब कुछ ही अधुरा है | इसलिये उसका सतत स्मरण जीवन का मुख्य उद्द्येश्य होना चाहिये |

suvarna lele said...

आपल्या सभोवती असलेल्या आकाशात अनेक सूक्ष्म जीव ,अनेक सूक्ष्म कण असतात जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत .,परंतू ते हालचाल करत असतात .त्यांचा अर्थ त्यांच्या मध्येही चैतन्य असते .चैतन्य म्हणजेच आत्मा ,अंतरात्मा सर्वत्र भरलेला आहे .म्हणून समर्थ म्हणतात की त्याच्या शिवाय रिकामी जागाच नाही .सर्वत्र तो भरलेला आहे ,
त्या राघवाचे दर्शन घेता घेता दर्शन घेणारा तद्रूप होतो .एकदा तद्रूप झाला की दृश्य अदृश्य या सर्वांचा लय होतो .तेथे सर्व लक्ष अलक्ष बुडाले असे समर्थ म्हणतात ,याचा अर्थ असा अलक्ष म्हणजे ज्यात लक्ष मुरते ते. म्हणाजे ज्यात दृश्य मावळते ते .असे होण्यासाठी केवळ ज्ञान दृष्टीच हवी . ती ज्ञान दृष्टी येते मी पणाचा त्याग केल्याने!
Sachin Jahagirdar said...

http://www.dasbodh.com

|| Samarth Sewa ||

Free Multilingual Online Database on Samarth Ramdas swami & Ramdasi Sampradaya containing audio,video ,text about Samarth Ramdas Swami .

Single Click Free Download.

please visit

www.dasbodh.com