Friday, August 23, 2013

श्लोक १८७

।। श्रीराम समर्थ ।।

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥
मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥

जय जय रघुवीर समर्थ !
 

3 comments:

suvarna lele said...

पिंड आणि ब्रह्मांड एकच आहेत आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी .पिंडात म्हणजे आपल्या देहात आणि ब्रह्मांडात एकच आहे .ब्रह्मांडात हे आहे ते सर्व पिंडात आहे का ? नाही .पण असे का म्हणतात ? असे म्हणण्याचे कारण आपले शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनलेले आहे त्याच पंचमहाभूतांनी ब्रह्मांड ही बनलेले आहे . म्हणजे त्यादृष्टीने पिंड आणि ब्रह्मांडात ऐक्य आहे .
असे असले तरी जर आत्मास्वरुपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तेथे त्रिगुण किंवा पंचमहाभूते यांचा काहीही उपयोग नाही कारण आत्माराम या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहेत .
ईश्वर निर्मित सृष्टी खरी नाही तो भास आहे असे मानतात .जेव्हा सृष्टीचे आपले खरे स्वरूप काय आहे हे जेव्हा कळते तेव्हा या दृश्य विश्वात भावना गुंतून पडत नाहीत .आपले स्वरूप पंचभूतातीत आहे कळून वृत्ती अंतर्मुख होतात


lochan kate said...

श्लोक १८७...............
भुते पिंड ब्रह्मांड हे एक्य आहे |
परी सर्वही सस्वरुपी ना साहे||
मना भासले सर्व काही पहावे |
परी संग सोडूनि सुखी रहावे ||
हिन्दी में.......
भुत , पिंड , ब्रह्मांड है सब एक रे |
पर वो सस्वरुप को ना साहे ||
मन को भाये सब कुछ देखूँ |
पर संग ना छोडे कुछ ना साहूँ ||
अर्थ..... श्री समर्थ राम दास जी कहते है कि हे मानव मन ! पंच भूतात्मक देह एवं ब्रह्मांड एक ही है परन्तु सब ही सद् स्वरुप में नही समाते है | मन में सोच लेने या देखती ही बुरी संगति का त्याग कर देना चाहिये जिससे अपने जीवन का मार्ग सरल एवं सुलभ हो जाता है | | क्योंकि सुख से रहने के लिये सद् संगति का होना अत्यंत आवश्यक है |

KV said...

The translation isn't right.