असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहतां द्रुष्य भासे || निराभास निर्गुण ते आकळेना | अहंता गुणे कल्पिता ही कळेना ||१७१|| हिन्दी में ..... होता सार साचार वो चेरने से | देखो उसे मूढ ज्ञान चक्षुओ से || निराभास निर्गुण वो भी दिखेना | अहंता गुण कल्पिता से मिलेना ||१७१|| अर्थ.... श्री रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! परब्रह्म के स्वरुप का सार चुराने से प्राप्त नही हो सकता है | इस निर्गुण परब्रह्म को रुपाकार जगत् में ज्ञान रुपी चक्षुओं से देखनें पर ही उसका आभास होता है | बिना आभास के निर्गुण परब्रह्म मनुष्य की समझ से परे है | वह बिना आभास के हमें दिखाई नहीं देता | अहंकार होने के कारण यदि मानव उसे कल्पना में भी लाने का प्रयास करे तो भी समझ में नही आयेगा |
दुधामध्ये कसे तुप सर्वांपासून चोरून लपलेले असते, अगदी त्याचप्रमाणे सामान्य जगत् दृष्टीपासून ते ब्रह्म या विश्वातच चोरून लपलेले आहे. कारण चर्मचक्षुंनी पाहता तर दृष्यच दिसते आणि बद्ध मनुष्याला त्यातून जगाचीच जाणीव होते. गूणांनी रहित असल्याने आकार रहित त्या निर्गुण निराकार परमात्याचे अस्तित्व काही कोणाला कळत नाही. त्यात भरिस भर म्हणून मनुष्याच्या मन-बुद्धीवरही अहंकाराचा पडदा पडलेला असतो. हा अहंकाराचा पडदा कसा आहे म्हणाल तर हा मनुष्याला स्वत:विषयी नाना कल्पना करवतो, स्वत:चे दोष झाकावयास लावून नसलेले गूण, प्रशंसा मिरवतो. मीच कर्ता आहे आणि म्हणून मीच सर्व सुखांचा भोक्ता असावा असा अभिलाषेत जीवन जगावयास लावतो. इ. मग अशा अहंकाराच्या छायेत कल्पना करूनही ते परात्पर परब्रह्म कळत नाही, मग त्याची प्राप्ती तर दूरच राहते.
जग ज्या सत्य गोष्टीमुळे चालले आहे ती वस्तू गुप्त आहे .निर्गुण ,निराकार आहे ,ते सामान्य माणसाच्या दृष्टीला दिसत नाही .सामान्य माणसाच्या दृष्टीला फक्त दृश्य विश्व दिसते .,जे असार आहे ,काल्पनिक आहे .पण तेच त्याला सत्य वाटते .याचे कारण जे जे सगुण आहे ,साकार आहे ते ते दिसते ,निर्गुण निराकार असलेले परब्रह्म दिसत नाही . जेव्हा अहंता म्हणजे देहबुद्धी ठेवून ब्रहम पहायला गेले तर दिसत नाही .एखादी व्यक्ती साधना करू लागते ,काही गोष्टी तिला प्राप्त होतात ,काही ज्ञान प्राप्त होते ,मग तिला वाटू लागते आपण सामर्थ्य संपन्न होऊ लागलो .अशी देहबुद्धी अहंता निर्माण झाली की ब्रह्मस्वरूप तिच्यापासून दूर जातो .म्हणून समर्थ म्हणतात – म्हणोनि देहबुद्धी हे झाडे | तरीच परमार्थ घडे | देहबुद्धीने विघडे | ऐक्यता ब्रह्माची || दा ७-२-३९ ||
3 comments:
श्लोक .........१७१....
असे सार साचार ते चोरलेसे |
इही लोचनी पाहतां द्रुष्य भासे ||
निराभास निर्गुण ते आकळेना |
अहंता गुणे कल्पिता ही कळेना ||१७१||
हिन्दी में .....
होता सार साचार वो चेरने से |
देखो उसे मूढ ज्ञान चक्षुओ से ||
निराभास निर्गुण वो भी दिखेना |
अहंता गुण कल्पिता से मिलेना ||१७१||
अर्थ....
श्री रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! परब्रह्म के स्वरुप का सार चुराने से प्राप्त नही हो सकता है | इस निर्गुण परब्रह्म को रुपाकार जगत् में ज्ञान रुपी चक्षुओं से देखनें पर ही उसका आभास होता है | बिना आभास के निर्गुण परब्रह्म मनुष्य की समझ से परे है | वह बिना आभास के हमें दिखाई नहीं देता | अहंकार होने के कारण यदि मानव उसे कल्पना में भी लाने का प्रयास करे तो भी समझ में नही आयेगा |
दुधामध्ये कसे तुप सर्वांपासून चोरून लपलेले असते, अगदी त्याचप्रमाणे सामान्य जगत् दृष्टीपासून ते ब्रह्म या विश्वातच चोरून लपलेले आहे. कारण चर्मचक्षुंनी पाहता तर दृष्यच दिसते आणि बद्ध मनुष्याला त्यातून जगाचीच जाणीव होते. गूणांनी रहित असल्याने आकार रहित त्या निर्गुण निराकार परमात्याचे अस्तित्व काही कोणाला कळत नाही. त्यात भरिस भर म्हणून मनुष्याच्या मन-बुद्धीवरही अहंकाराचा पडदा पडलेला असतो. हा अहंकाराचा पडदा कसा आहे म्हणाल तर हा मनुष्याला स्वत:विषयी नाना कल्पना करवतो, स्वत:चे दोष झाकावयास लावून नसलेले गूण, प्रशंसा मिरवतो. मीच कर्ता आहे आणि म्हणून मीच सर्व सुखांचा भोक्ता असावा असा अभिलाषेत जीवन जगावयास लावतो. इ. मग अशा अहंकाराच्या छायेत कल्पना करूनही ते परात्पर परब्रह्म कळत नाही, मग त्याची प्राप्ती तर दूरच राहते.
जग ज्या सत्य गोष्टीमुळे चालले आहे ती वस्तू गुप्त आहे .निर्गुण ,निराकार आहे ,ते सामान्य माणसाच्या दृष्टीला दिसत नाही .सामान्य माणसाच्या दृष्टीला फक्त दृश्य विश्व दिसते .,जे असार आहे ,काल्पनिक आहे .पण तेच त्याला सत्य वाटते .याचे कारण जे जे सगुण आहे ,साकार आहे ते ते दिसते ,निर्गुण निराकार असलेले परब्रह्म दिसत नाही .
जेव्हा अहंता म्हणजे देहबुद्धी ठेवून ब्रहम पहायला गेले तर दिसत नाही .एखादी व्यक्ती साधना करू लागते ,काही गोष्टी तिला प्राप्त होतात ,काही ज्ञान प्राप्त होते ,मग तिला वाटू लागते आपण सामर्थ्य संपन्न होऊ लागलो .अशी देहबुद्धी अहंता निर्माण झाली की ब्रह्मस्वरूप तिच्यापासून दूर जातो .म्हणून समर्थ म्हणतात – म्हणोनि देहबुद्धी हे झाडे | तरीच परमार्थ घडे | देहबुद्धीने विघडे | ऐक्यता ब्रह्माची || दा ७-२-३९ ||
Post a Comment