Friday, February 22, 2013

श्लोक १६२

II श्रीराम समर्थ II 
  
अहंतागुणे नीति सांडी विवेकी।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥
परी अंतरी अर्वही साक्ष येते।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥


जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

lochan kate said...

श्लोक १६२........
अहंता गुणे निती सांडी विवेकी |
अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी ||
परी अंतरी सरव ही साक्ष येते |
प्रमाणांतरे बुध्दि सांडुनि जाते ||१६२||
हिन्दी में.......
अहंभाव की निती छोडो विवेकी |
अनीति बलात श्लाघ्यता है विलोकी ||
पर अंतर में साक्ष है जब होती |
अंत: से बुध्दि साक्ष है छोड जाती ||१६२||
अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जो ज्ञानि लोग होते है वो अहंकार के कारण निती नियमों को चूडकर कभी भी नही चलते अनिती के विरुध्द बल पूर्वक किया गया कार्य थोडे समय के लिये अच्छा लगता है परन्तु अंतर मन से सत्य को न समझने के कारण बुध्दि भ्रष्ट हो जाती है | इसलिये सत्यता की पहचान करना अत्यंत आवश्यक होता है | साथ ही उसी सत्य के मार्ग पर चलना श्रेयस्कर होता है |

suvarna lele said...

विवेकी म्हणजे सारासार विचार असलेले ,आत्मानात्म विचार असलेले ,ज्ञानी लोकही अहंतेमुळे वाया जातात .नीतिभ्रष्ट होतात .वेद मर्यादा ते पाळत नाहीत . ज्ञानी असल्यामुळे त्यांचा लौकिक वाढतो .त्यांना मान्यता मिळते .लोकांची वाहवा मिळते आणि त्यातून मोहाकडे ते आकृष्ट होतात .सूक्ष्माकडे न वळता स्थूलाकडे वळतात ,मानमान्यता ,गौरव प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न करतात .आणि अनीतीने वागू लागतात .ज्ञानाचा ताठर अहंकार त्यांना मुक्तावास्था नसूनही आपण मुक्त आहोत अशी कल्पना करून घेतात .आणि वाटेल तसे ,मनाच्या अधीन होऊन वागतात .श्रेष्ठांनी सांगितलेल्या वचनांकडे दुर्लक्ष करतात .चित्तात समाधान वाटत नाही .
नाथ भागवतात म्हटले आहे : तिळभरी राखोनि अभिमान | जरी मज रिघसी शरण | तरी माझी प्राप्ती नव्हे जाण | अभिमान विघ्न प्राप्तीसी || १२-१४६ ||म्हणून जे परमार्थाचा ,मोक्षाचा ,विचार करतात त्यांनी अहंकार आपल्यात उत्पन्न होत नाही ना याकडे बारकाईने बघायला हवे .

श्रीपाद श्रीधर खारकर said...

सुलभ पध्दतीने दासबोध उलगडून सांगत आहात .

धन्यवाद !

श्रीपाद श्रीधर खारकर said...

सुलभ पध्दतीने दासबोध उलगडून सांगत आहात .

धन्यवाद !

श्रीपाद श्रीधर खारकर said...

सुलभ पध्दतीने दासबोध उलगडून सांगत आहात .

धन्यवाद !