Saturday, February 2, 2013

श्लोक १५९

II श्रीराम समर्थ II 

 
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥



जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १५९....
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची |
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ||
अहंभाव ज्या मानसी चा विरेना |
तया ज्ञान हे अन्न पोटी विरेना ||१५९||
हिन्दी में ......
खाने में भक्षी मक्षिका जिसने जानकर |
उसे भोज की रुचि कैसे मिले खासकर ||
अहं भाव मन के जिसका कभी ना हरे |
उसी ज्ञान रुपी अन्न कैसे पेट में पचे ||१५९||
अर्थ.....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जिस मानव ने जान बुझकर अज्ञान रुपी मक्खी निगली हो उसे ज्ञान रुपी भोजन का स्वाद कैसे प्राप्त होगा ? यह उसी प्रकार है कि जिसने अज्ञान रुपी अहंभाव से अपना जीवन भर रखा हो उसे अर्थात् जिसके मन से अज्ञान रुपी अहंकार नही निकला हो वह ज्ञान रुपी अन्न को कैसे पचा सकता है ?

suvarna lele said...

ज्याप्रमाणे अतिशय रुचकर भोजनात जर माशी पडली ,तर भोजनाची रुची कशी मिळेल ? फक्त उलटी होऊन अन्न बाहेरच पडेल .त्याप्रमाणे जाणीव रुपी ,अहंकार रुपी माशी ,मी ब्रहम जाणतो अशी जाणीव रुपी माशी जेव्हा ज्ञान रुपी अन्नात पडते तेव्हा ती त्या अन्नाची चव बिघडते .ते ज्ञान पचत नाही .त्याचे कारण आहे अहंकार .
अहंकार सोडला तरच आत्मज्ञान होते .
अहंकार हाच द्वैताला जीवभावाला कारण असतो .त्यामुळे तो नष्ट झाल्याशिवाय जीव शिव ऐक्य होत नाही .स्वरूपस्थिती प्राप्त होत नाही .



प्रसाद शरद खाडे said...

ह्यावरंच श्री माऊली भाष्य करतात : "जाणिव - नेणिव भगवंती नाही ।"