II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे। |
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥ |
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो। |
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥ |
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक क्र. १५४.....
महा वाक्यतत्वादिके पंचिकर्णे |
खुणे पाविजे संत संगे विवर्णे ||
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो |
तया सांडूनी चंद्रमा भाविजेतो ||१५४||
हिन्दी में ....
महा वाक्य तत्वों का हो पंचिकर्ण |
यही संत संग मे देखो है विवरण ||
दूसरे को सदा संकेत जो देता है |
उसे देख चंदा भी विभोर होता है ||१५४||
अर्थ..... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! संतों की संगति में बैठकर उनके द्वारा दिये गये पंच तत्वों की किरण्तत्वों के बारे में कहे गये महा वाक्यों से मिले हुए विवरण का सदुपयोग करना चाहिये अर्थात् संतों द्वारा पंचतत्वों के बोध का सदुपयोग करना चाहिये , जिससे अपना व दूसरे का भी भला ही होगा , क्योंकि जो दूसरे को राह दिखाता है उसे देखकर चन्द्रमा भी भाव विभोर हो जाता है |
सज्जन संगतीत महावाक्य –तत् त्वं असी | अशा महावाक्याचा उपदेश ऐकता येतो या स्थूळ देहाची ,सूक्ष्म देहाची ,कारण ,महाकारण देहांची तत्वे ,त्यांचा कर्दम म्हणजे एकत्रीकरण कसे होते ते ऐकता येते .एकत्रीकरण म्हणजे पंचीकरण कसे होते ते कळते .ही सर्व तत्वे ज्याच्या आधाराने कार्य्भूत होतात ते परब्रह्माचे अधिष्ठान समजते त्यासाठी संत संगत लागते .ज्याप्रमाणे द्वितीयेचा चांद्र एखाद्या फांदीच्या आडून खुणेने दाखवता येतो त्याप्रमाणे परब्रह्माचा संकेत महावाक्याच्या आधारे संत सांगतात .ते तू आहेस या सारखे महावाक्य पाठ झाले म्हणजे ज्ञान नाही असे समर्थ सांगतात ,तर त्या महावाक्यांचे विवरण समजणे म्हणजे ज्ञान महावाक्याचे विवरण केवळ आत्मज्ञानी ,स्वानुभवी संत सज्जनच करू शकतात . तरच सर्व शंकांचे निरसन होऊन नि:संदेह ज्ञान मिळते .
तत्वमसी या महावाक्यात तीन पडे आहेत .तत् ,त्वं ,असी . तत्पदाने सर्वशक्तीमान ,सर्वद्न्य असणारे ईश्वरी तत्व .जगाची उत्पती ,स्थिती ,लय करणारा ईश्वर .ज्याचे वर्णनही करता येत नाही ,ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असे ईश्वरी तत्व ते तत्
त्वं –अद्न्यानाने ,अविद्येने ज्याचा सत्व गुण झाकलेला आहे ,तो देहधर्मी असलेला मी जो अहंकाराने युक्त आहे ,भोक्तृत्वाचा ,कर्तेपणाचा अभिमान मानणारा आहे .कूटस्थ चैतन्य असा त्या त्वं पदाचा अर्थ आहे .
असी आहेस .तत् त्वं असी म्हणजे तो तूच आहेस .परम तत्व जे अज्ञानी माणसाला अगम्य आहे ते तु म्हणजे स्थूळ देहाच्या आतील कूटस्थ आहेस .
Post a Comment