Friday, December 21, 2012

श्लोक १५३

II श्रीराम समर्थ II


नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥
  डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक१५३....
नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्व ज्ञाने |
समाधान काही नव्हे तान माने ||
नव्हे योग यागे नव्हे भोग आगे |
समाधान ते सज्जनाचेनि योगे ||१५३||
हिन्दी में............
नही पिंड ज्ञान नही तत्व ज्ञान |
नही समाधान नही सुर तान ||
नही योग से है नही भोग से है |
समाधान होता सज्जन संगति से || १५३||
अर्थ......श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! न शारिरीक ज्ञान से , नही तत्व ज्ञान से , नही गायन वादन [संगीत ] के ज्ञान से समाधान मिलता है | न ही योग के द्वारा न ही भौतिक सुखों के द्वारा समाधान प्राप्त होता है बल्कि समाधान केवल सज्जन लोगों की संगति के योग से ही प्रप्त होता है |अत: हे मानव सदैव सज्जन लोगों की संगति में ही विचरण करना चाहिये | जिससे मन को संतुष्टि प्राप्त हो |

suvarna lele said...

माणूस सर्व गोष्टी स्वतःच्या समाधानासाठी करत असतो तो पिंडाची म्हणजे या देहाची सर्व माहिती मिळवतो , हा देह ज्या तत्वांचा बनलेला आहे त्याबद्दल माहिती मिळवतो .हा देह म्हणजे मी नाही हे त्याला त्या तत्वांच्या निरासातून कळते .म्हणजे प्रत्येक तत्व नाशिवंत आहे ,ते कोणतेच तत्व म्हणजे मी नाही हे कळते .
तानमानाने म्हणजे संगीताने ,योगाने ,यज्ञादी कर्म ज्ञानाने ,अष्टांग योगाने ,भोग त्यागाने समाधान ,समाधी ,तदाकाराता येत नाही .समाधान म्हणजे चित्ताची प्रसन्नता येत नाही .चित्ताची प्रसन्नता नेहमी सज्जन संगतीतच होते सज्जनांचे वागणे ,बोलणेच इतके सुंदर असते की त्यांनी दिलेल्या विचारांचे आपल्याला मनन करावेच लागते ,त्यातूनच मन नि:संदेह होते , पराब्र्ह्माप्रती निश्चयात्मक बुद्धी तयार होते .अशी बुद्धी झाली की स्वरुपाकार वृत्ती तयार होते .आणि समाधानाची प्राप्ती होते .