Friday, November 9, 2012

श्लोक १४७

II श्रीराम समर्थ II


फुटेना तुटेना चळेना ढलेना।
सदा संचले मीपणे ते कळेना ॥
तया एकरुपासि दूजे न साहे।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४७॥
 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४७....
फ़ुटेना तुटेना चळेना ढळेना |
सदा सचंले मी पणे ते कळेना ||
तया एक रुपासि दूजे न साहे |
मना संत आनंत शोधुनि पाहे ||१४७||
हिन्दी में ....
टुटे ना , फ़ुटे ना , हिलता ना ढलता |
चंचल अहं से सदा ना समझता ||
उस एक रुप से दुजा ना साहे रे |
अरे मन आनंत मिलता यही रे ||१४७||
अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! यह जो ब्रह्म है यह कभी भी खंडित नही होगा , कभी हिलता नही , ढलता नही , टुटता नही , यह अटल है | अत: हे मनुष्य सदैव संचित की हुई वस्तुऐ अहंकार के कारण समझ में नही आती है | उसके कारण एक व्यक्ति को दूसरे का सुख सहन नही होता अर्थात् ईर्ष्या के कारण एक मनुष्य दूसरे को सुखी या संतुष्ट देखकर शांत नही रह पाता | अत: हे मानव ! अनंत स्वरुप को देखो पहचानो तथा उसे आत्मसात करने का प्रयास करो और अपने जीवन को सार्थक करो |

suvarna lele said...

या दृश्य विश्वात जे पदार्थ दृश्य आहेत ,आकाराला आलेले आहेत इ सर्व पदार्थ नाश
पावतात ,मोडतात . पण या सर्व दृष्याला एकां सत्य ,अविनाशी ,गोष्टीच अधिष्ठान
असते ,ते अधिष्ठान म्हणजेच ती सद्वस्तु ,परब्रह्म .ते कसे असते ते आता समर्थ
सांगतात .ते परब्रह्म फुटत नाही ,तुटत नाही ,चळत नाही ,ढळत नाही . कोणात
विलीन होत नाही जे विश्व निर्माण होण्यापूर्वी होते ,आता आहे ,विश्वाचा प्रलय
झाल्यावरही राहणार आहे .
त्याचे वर्णन करताना असे नाही ,असे नाही असे करावे लागते ,कारण त्याला
कोणत्याही दर्शय वस्तूची उपमा देता येत नाही .कोणत्याच बाबतीत त्या परब्रह्माची
तुलना होऊ शकत नाही . समर्थांनी दासबोधात आकाश ,सागर यांची तुलना परब्र्ह्माशी
करून दाखवली पण ती पुरेशी ठरली नाही
माती रांजण माठ ,वीट ह्या सर्वात एकच माती असली तरी त्याच्या आकारामध्ये
असलेली विविधता विविधता पाहिली तरी विविधतेच्या मुळाशी एकरूपता असते
.विश्वात असलेली विविधता जरी अस्थिर असली ,पालटणारी असली तरी तिच्या
मुळाशी असलेले तत्व एकच असते .ते तत्व स्थिर ,शाश्वत असते .म्हणून
त्रिकालाबाधित सत्य असते