Friday, November 23, 2012

श्लोक १४९

II श्रीराम समर्थ II

जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥
जनीं पाहता पाहणे जात आहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥
 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक१४९....
जगी पाहतां चर्म चक्षी न लक्षे |
जगी पाहतांज्ञान चक्षी न रक्षे ||
जगी पाहतां पाहणे जात आहे |
मना संत आनंत शोधुनि पाहे ||१४९||
हिन्दी में.....
चर्म चक्षु से ना दिखता आत्म स्वरुप |
ज्ञान चक्षु से देखो स्वत: के स्वरुप |
निराकार स्वरुप में तु लीन होना |
सज्जन मन से रे तु खोज करना ||१४९||
अर्थ.....
श्री रामदास जी कहते है कि हे मानव ! संसार में बारीकी से निरीक्षण करो | सिर्फ़ आंखों से देखकर आत्मस्वरुप दिखाई नही देता है | अत: ज्ञान चक्षुओं द्वारा स्वत: के स्वरुप को पहचानो |निराकार परब्रह्म में लीन होकर अनंत स्वरुप में लीन हो जाओ | उसे देखनें का प्रयास करो |

suvarna lele said...

त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला ,परब्रह्माला चर्म चक्षूंनी बघायला गेले
तर तो दिसत नाही .ईतर ईंद्रीयांनी सुध्दा त्याचे ज्ञान होत नाही .समर्थ १३ | २ या
समासात म्हणतात ‘चर्मचक्षु ज्ञानचक्षू | हा तो अवघाची पूर्वपक्षु | निर्गुण ठाईचा
अलक्षु | लक्षवेना || १६||
बाह्य ईंद्रीये हे चर्मचक्षु व मन बुद्धी हे ज्ञानचक्षु हे दोघेही परब्रह्माला ओळखू शकत
नाहीत .ती अपूर्ण आहेत .त्यामुळे चर्म चक्षु व ज्ञान चक्षु असूनही त्या परब्रह्माचे ज्ञान
होत नाही .पण जेव्हा सद्गुरूचा अनुग्रह होतो ,सादुरुशी शिष्य अनन्यता धारण करतो
तेव्हा सद्गुरू आपल्या शक्तीपाताने ,दर्शनाने ,स्पर्शाने शिष्याला सद्गुरूला पहायला
शिकवतो ..पाहता पाहता पाहणारा त्या परब्र्ह्मात विलीन होतो .जशी नदी समुद्राला
भेटायाला जाते तेव्हा ते सागरच होते .एक थेंब सागरात पडतो तेव्हा तो सागराच होतो
तेथे द्वैत राहतच नाही ,एकरुपताच येते .