Friday, November 2, 2012

श्लोक १४६

II श्रीराम समर्थ II

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकरले काल मोडी ॥
पुढे सर्व जाईल काही न राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४६ ॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४६ ...
दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी |
अकस्मात आकारले काळ मोडी ||
पुढे सर्व जाईल काही न राहे |
मना संत आनंत शोधुनि पाहे ||१४६||
हिन्दी में.....
दिखा आंखो से को नही कल्पनातीत |
अकस्मात साकारता वो नही हीत ||
जायेगा सब कुछ , रहता नही है रे |
अरे जीव देखो आनंत मिलता यही रे ||१४६||
अर्थ... समर्थ श्री रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जो अपनें को आंखों से दिखता है वह वैसा ही होता है यह जरुरी नही है | अचानक जो अपनें को साकार दिखता है उसका , काल के द्वारा कभी न कभी अन्त निश्चित होता ही है | अंतकाल के समय सब कुछ समाप्त हो जाता है , अपना कुछ भी नही रहता है | इसलियेहे मन ! संत कहते हैं कि सिर्फ़ अनंत स्वरुप को पहचानो , कल्पना करो और उसे आत्मसात करने का प्रयास करो और अपना जीवन सार्थक करो |

suvarna lele said...

ज्याला खरे संतत्व आहे ,म्हणजे अस्तित्व आहे ,सत्ता आहे ,जे अनंत आहे ,अमर्याद आहे ,ज्याला सीमा नाही ते सत्य स्वरूप हे मना तू शोधून पहा .ते सत्य स्वरूप जे त्रीकालातीत आहे ,जे सर्व व्यापक आहे ,स्थळकाळाची मर्यादा ज्याला नाही ते सत्य तत्व ,हे मना तू शोध .त्यासाठी असा विचार कर की जे दिसते ते नाशिवंत आहे ,ते मोडते .जे उभारले जाते ते मोडते .ते शाश्वत नाही .ते कायम टिकणार नाही .स्थळ काळाच्या ओघात ते नाहीसे होते .
सुंदर इमारती ,कोरीव लेणी ,कोणतीही सुंदर गोष्ट जी निर्माण झाली आहे ती नष्ट होते .यद दृष्टं तं नष्टं हा नियमच आहे अगदी पंचमहाभूते ,त्रिगुण ज्यांच्या पासून ही सृष्टी निर्माण झाली ती सुध्दा कल्पांत काळी नष्ट होते .मग या सर्वांच्या पलीकडे ज्यातून हे विश्व निर्माण झाले ,त्या अनंताचा शोध घे .