Friday, September 28, 2012

श्लोक १४१

II  श्रीराम समर्थ II

म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनी जाणता पाय त्याचे धरावे ।।
गुरु अंजनेवीण  तें आकळेना ।
जुने ठेवणे मी पणे आकळेना ।। १४१ ।।

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४१ .....
म्हणे दास सायास त्याचे करावे |
जनी जाणता पाय त्याचे धरावे ||
गुरु - अंजने वीण ते आकळेना |
जुने ठेवणे मी पणे ते कळेना ||१४१||
हिन्दी में .....
कहे दास उसके लिये तुम करो रे |
जनी जान पॉव उनके तुम धरो रे ||
गुरु अंजन के बिन कुछ ना बने रे |
रखा जो अहं भाव समझे ना वो रे ||१४१||
अर्थ.....श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मनुष्य ! संत कहते है कि भगवान की भक्ति के लिये कष्ट करना चाहिये | उसी के चरणों की आस रखना चाहिये | इसके लिये गुरु का होना अत्यंत आवश्यक है | अत: जब तक गुरु से ज्ञान रुपी अंजन [काजल] आंखों में नही जाता तब तक मनुष्य के अहंकार का अंत नही होता | उसे जीवन की वस्तविकता नही समझती | अत: विवेक से सोच समझकर कार्य करना चाहिये | क्योंकि भगवान की देन तो हमारी समझ से परे की चीज है | इसलिये अहंकार रहित जीवन जीते हुए अपना कार्य करना चाहिये |

suvarna lele said...

आपले धर्मशास्त्र ,आपल्या नीतीन्यायाविशयीच्या कल्पना ,आपले अध्यात्म ,आपले वेद हे सर्व आपले जुने ठेवणेच आहे . या जुन्या ठेवण्याचा विचार केला ,मनन ,चिंतन केले तरच नराचा नारायण होईल अशी सोय आपल्या पूर्वजांनी करून ठेवली आहे ,पण हे सर्व अभ्यासताना कोणाचे तरी मार्गदर्शन हवे असते .हा कोणीतरी म्हणजे केवळ सद्गुरुच असतो .
समर्थ येथे म्हणतात की सद्गुरू ओळखण्यासाठी प्रयत्न करा .दक्षतेने ,सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत ,कारण आपल्याला जर काही जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जाणत्याचे पाय धरावे लागतात .साधं नवशिक्या मुलीला स्वयंपाक शिकायचा असेल तर त्यातल्या जाणत्या बाईचा सल्ला घ्यावा लागतो .
मग नराचा नारायण बनविना-या सद्गुरुंचा शोध तर किती तळमळीने ,काळजीपूर्वक केला पाहिजे सद्गुरू चरणांशी अनन्य व्हायला हवे .तरच ते ज्ञान प्राप्त होईल .ज्याप्रमाणे मंत्रांनी सिद्ध केलेले अंजन डोळ्यात घातले तर भूमिगत द्रव्य पाहण्याचे सामर्थ्य डोळ्यात येते ,त्याप्रमाणे सत्याचे ,त्या परम तत्वांचे दर्शन होण्यासाठी गुरुकृपेची आवशक्यता आसते .समर्थ दासबोधात म्हणतात ‘ असो जयासी मोक्ष व्हावा | तेणे सद्गुरू करावा | सद्गुरुवीण मोक्ष पावावा | हे कल्पांती न घडे ||