Friday, September 21, 2012

श्लोक १४०

II श्रीराम समर्थ II


जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥
 

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४०....
जयाचे तया चूकले प्राप्त नाही |
गुणे गोविले जाहले दु:ख देही ||
गुणा वेगळी व्रुत्ति तेही वळेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना ||
हिन्दी में.....
करी चूक मानुष को प्राप्त न होता |
हुआ दु:ख नादां को ना समझता ||
गुणो से हुई व्रुत्ति समझे ना वो भी |
रखा जो अहं भा समझे ना वो भी ||१४०||
अर्थ....
श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य ! त्रिगुणों के भ्रम से मोह माया द्वारा होने वाले प्राप्त दु:ख का उसके द्वारा हुई गलती से को ई सम्बन्ध नही होता है | वह दु: उस गलती के लिये प्राप्त है ऐसा नही है | नि:स्रैगण्य व्रुत्ति भी मनुष्य को समझ में नही आती है | इसलिये विवेक से कार्य करके जीवन मार्ग पर चलना चाहिये क्योंकि होनी तो भगवान की देन है | उसमें व्यक्ति का अहंकार कहीं भी काम नही आता है |

suvarna lele said...

शास्त्र सांगते ‘तत्वमसि –ते तूच आहेस म्हणजे ते परब्रह्म तूच आहेस .ज्या देहाला तू मी समजतोस तो तू नसून तुझ्या देहात वास करणारा ,तुला चालवणारा ,तुझ्याकडून सर्व क्रिया करवून घेणारा आत्मा तो तूच आहेस .पण तुला ते कळत नाही .ज्याप्रमाणे डोक्यावर ठेवलेला चष्मा आपण घरभर शोधतो ,पण सांपडत नाही ,तसे तुझ्यामधले आत्मस्वरूप तुला सांपडत नाही .तू ते शोधण्याचा प्रयत्न करत नाहीस .
मन ,बुद्धी ,ईद्रिये त्रिगुणांनी व्याप्त असतात .,त्यामुळे दुषित असतात .त्यामुळे खरे काय आहे याचे ज्ञान ते देऊ शकत नाहीत .खरे न कळल्यामुळे फक्त दु:ख पदरी येते .मी आत्मा आहे हे न कळता मी देह आहे असे त्रिगुणांनी कळते .आणि देह्सुखासाठी सगळे कार्य केले जाते .तात्पुरते सुख मिळते पण अंती दु:ख च पदरी येते .त्यासाठी या त्रिगुणांच्या पलीकडे जायला हवे .त्रिगुणांच्या पलीकडे जायचे म्हणजे निर्विकल्प व्ह्यायचे ,निर्विषय व्हायचे .पण ही अत्यंत अवघड गोष्ट आहे .त्यासाठी ईश्वरा विषयी उत्कट भाव असावा लागतो .अत्यंत नम्र ,ईश्वर चरणी संपूर्ण शरणागती असावी लागते .अहंकाराचा पूर्ण त्याग करावा लागतो .तरच जुने ठेवणे म्हणजेच परब्रह्म कळते अन्यथा कळत नाही .