Friday, July 27, 2012

श्लोक १३२

II श्रीराम समर्थ II

विचारूनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त तेही निवाले॥
बरें शोधल्यावीण बोलो नको हो।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

या श्लोकात समर्थ सांगतात – विचारूनी बोलले ,विवंचुनी चाले |
विचारूनी बोले चे स्पष्टीकरण बरे शोधल्यावीण बोलू नको या चरणात आहे .केव्हाही बोलताना विचार करून ,नक्की काय घडले आहे ,एखादी गोष्ट खरी आहे की खोटे ह्याचा सारासार विचार करून बोलावे कारण असे सारासार विचार करून बोललेले सत्याच्या जवळ असते .सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून ,थोरा मोठ्यांचा विचार पाहून विचार करून बोलायाला हवे
विवंचुनी चाले –या ओळीचे स्पष्टीकरण जनी चालणे शुध्द नेमस्त राहो या ओळीत आहे विवंचुनी चालायचे म्हणजे विवेकाने वागायचे ,कृती करण्यापूर्वी सावध राहायचे .पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही असे वागायचे .कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्गाने जाउन सर्व समावेशक निर्णय घेणे हे महत्वाचे .त्यामुळे संताप होत नाही .वागणे शुध्द ,निर्मळ ,सदाचार असणारे असावे .त्यामुळे ध्येय निश्चित ठरते व वागणे पवित्र होते .

lochan kate said...

श्लोक १३२......
विचारुनि बोले विवंचुनि चाले |
तयाचेनि संतप्त तेही निवाले ||
बरे शोधिल्या वीण बोलो नको हो |
कनी चालणे शुध्द नेमस्त राहो ||१३२||
हिन्दी में .....
सोचक्र जो बोले देख के जो चले |
उसके सामने तो संतप्त भी हो ले ||
सही जाने बिना बोलो ना कभी तुम |
तभी आचरण की शुध्दी बनो तुम ||१३२||
अर्थ.....
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! जो विचार पूर्वक सोच समझकर शांति से बात करते है उनके सामने अत्यंत संताप करने वाले लोग भी शांत हो जाते है अत: हे मानव ! किसी भी बात की सही जानकारी लिये बिना , बात नहीं कहना चाहिये | जिससे अपना आचरण शुध्द रहता है |