Friday, July 6, 2012

श्लोक १२९


II श्रीराम समर्थ II

 
गतीकारणे संगती सज्जनाची।
मती पालटे सूमती दुर्जनाची॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२९...
गति कारणे संगती सज्जनाची |
मती पालटे सूमती दूर्जनाची ||
रति नायिकेचा पति नष्ट आहे |
म्हणोनि मनातीत होऊनि राहे ||१२९||
हिन्दी में .....
गति के लिये संगति सज्जनों की |
मती है बदलती सुमती दूर्जनों की ||
रति नायिका का पति नष्ट होता |
तभी तो मन का भव पूर्ण होता ||१२९||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! सद् गति प्राप्त करनें के लिये सज्जनों की संगति की आवश्यक्ता है | दूर्जनों की बुध्दि भी सज्जनों की संगति में बदल जाती है | जैसे रति नायिका के पति का जीवन नष्ट भ्रष्ट हो गया था | अत: हे मन !रति की भावना अपनें मन में न रखकर अलिप्त होकर अपना जीवन व्यतीत करना चाहिये |

suvarna lele said...

मानव प्राणी असा एकच प्राणी आहे की जो सारासार विचार करू शकतो . चांगले काय आणि वाईट काय याची परीक्षा करू शकतो .एकदा सन्मार्गाला माणूस लागला की तो सज्जनाची संगती धरतो ,सत्संगतीने त्याच्या बुद्धीत पालट होतो .त्याचे सर्व संशय नाहीसे होतात .त्याची देहबुद्धी आत्मबुद्धी कडे वळवली जाते .देहबुद्धीने होणारे माया ,ममता ,क्रोध ,काम यासारखे दोष हळू हळू नाहीसे व्हायला सुरुवात होते .माणसातील सत्व गुण वाढू लागतो .मृत्यू नंतर चांगली गती प्राप्त व्हायला मदत होते . दुर्जन सुजन बनायला सुरुवात होते .त्याची दुर्मती सुमती होऊ लागते .
चांगले वाईट कळू लागते .या सगळयाला एक अडथळा आहे .रतिपति मदनाचा ! कामाचा ,विषयासक्तीचा !हा काम दुष्ट ,दुरात्मा आहे .नष्ट चांडाळ आहे .घातक आहे ,फसवा आहे .तो अनेक प्रलोभने निर्माण करतो .त्याच्यामुळे सुख च हितकारक आहे असे भासू लागते .असत्य असले तरी ते सत्य आहे असे भासू लागते .मग अनेक संकटे त्याच्या वाट्याला येतात .त्याच्या दु:खातून कोणीच सुटका करू शकत नाही .मग माणसे दु:खातून सुटका करून घेण्यासाठी व्यसनाधीन होतात .त्यांच्या अध:पतनाला सीमा रहात नाही .म्हणूनच कामाला नष्ट म्हटले आहे ..