Friday, June 29, 2012

श्लोक १२८

II श्रीराम समर्थ II
 
मना वासना वासुदेवीं वसों दे।
मना कामना कामसंगी नसो दे॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १२८...
मना वासना वासुदेवी वसो दे |
मना कामना काम संगी नसो दे ||
मना कल्पना वाऊगी ते न कीजे |
मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे ||१२८||
हिन्दी में....
मन वासना वसुदेव में रहे रे |
मन कामना काम संग न हो रे ||
मन कल्पना ऐसी झूठी ना रहे रे |
मन सज्जनों की तु बस्ती में हो रे ||१२८||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अपनी इच्छायें , आकांक्षांये सततन् वासुदेव भगवान के चरणों में , भक्ति में लीन रखो | हे मन ! काम रुपी प्रव्रुत्ति का संग न होने पाये , तथा कल्पना में भी बुरे कार्य करनें की इच्छायें ना हो | सदैव सज्जन लोगों की सज्जनता का साथ प्राप्त हो | सदैव सज्जन लोगों की संगति में समय लगा रहे |

suvarna lele said...

या श्लोकात वासना ,कामना , कल्पना असे तीन शब्द महत्वाचे शब्द आले आहेत
कल्पना सर्वात आधी निर्माण होते .एखादी गोष्ट आपल्याकडे असायला हवी असे वाटते .
.वासना म्हणजे एखादी गोष्ट हवी वाटणे ,
कामना म्हणजे हवे नको पणाला आसक्तीचे रूप येते .
समर्थ म्हणतात की हे मना ,तुझी वासना ,तुझे हवे नको पण वासुदेवा कडे असू देत .समर्थांनी येथे वासुदेव हा शब्द वापरला आहे ,समर्थ स्वत: रामोपासक आहेत ,,पण तरीही कृष्ण भक्ती करायला समर्थ सांगतात त्यांच्या कडे सांप्रदायिक दुराग्रह नाही .समर्थ सांगतात की काम भावना ठेवू नकोस .तू कल्पना कर ,पण वेडीवाकडी करू नकोस .कल्पना ,कामना ,वासना चांगल्या ठेव .त्यासाठी सज्जन संगतीत तू रहा .तर पवित्र विचारामुळे तुझ्या विचारात बदल होईल ,