Friday, June 22, 2012

श्लोक १२७

II श्रीराम समर्थ II

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥
देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण




जय जय रघुवीर समर्थ !
 

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२७....
जगी धन्य तो राम सुखे निवाला |
कथा ऐकता सर्व तल्लीन झाला ||
देहे भावना राम बोधे उडाली ||
मनोवासना रामरुपी बुडाली ||१२७||
हिन्दी में ...
धन्य वो है जो राम नाम में डूबा |
कथा राम नाम में जो है गुथा ||
देह भाव जिसका राम नाम खोया |
मनो वासना राम रुप का भाया ||१२७||
अर्थ.....
श्री समर्थ राम दास जी कहते है कि हे मानव मन ! वह प्राणी जो राम रुप में लीन हो जाता है या हो गया हो गया हो , जो राम जी की कथा में तल्लीन हो गया हो , जिसकी अंतरात्मा की देह भावना [ अहंकार ] राम रुपी ज्ञान से नष्ट हो ग ई हो , जिसकी वासनायें , इच्छायें , राम स्वरुप में , डूब ग ई हो ऐसा प्राणी संसार में धन्य है |

suvarna lele said...

ज्याचे सुख रामात आहे .श्रीरामांच्या नामस्मरणात ,चिंतनात ,कथाश्रावणात ,सेवेत सुख होते ,त्या अलौकिक भक्तीसुखाने तृप्त होतो ,शांत होतो .त्याला काही हवे अशी कोणतीच अभिलाषा नसते .त्यामुळे तो निवाला असे समर्थ म्हणतात . असा माणूस धन्य होतो .
सामान्य माणसे घर दार , मुले बाळे ,संपत्ती हे सर्व व्यवस्थित असले की आपले जीवन धन्य झाले असे मानतात ,पण संत सज्जनांची धन्यतेची माप पट्टी वेगळी असते .राम भक्तीत जो रममाण होतो ,हरीभजनात जो तल्लीन होतो तो धन्य असतो .ईश्वराच्या अवतारलीला जो आवडीने ऐकतो ,संत चरित्र ऐकतो ,तो तलीन होतो .तो धन्य होतो
देहेभावना रामरुपी उडाली – देहभावना म्हणजे देहबुद्धी .देहबुद्धी म्हणजे मीपणा .मीपणा नाहीसा होतो रामबोधाने .म्हणजे राम कथेने तल्लीन होऊन आशा आकांक्षा रहित तो होतो .तेव्हा तो धन्य होतो .मनाच्या वासना नाहीशा होतात .रामरूपात नाहीशा होतात .