Saturday, June 16, 2012

श्लोक १२६

II श्रीराम समर्थ II

 

जनांकारणे देव लीलावतारी।
बहुतांपरी आदरें वेषधारी॥
तया नेणती ते जन पापरूपी।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२६....
जना कारणे देव लिलावतारी |
बहूतांपरी आदरे वेषधारी ||
तया नेणती ते जन पापरुपी |
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ||१२६||
हिन्दी में .....
जनों के लिये लिला करते हैं भगवन |
बहूतों के आदर से धरे वेष भगवन ||
जिन्हे ले है जाते पाप की राह पर |
दुरात्मा चांडाल पापी का अंत कर ||१२६||

श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव ! लोगों का तारण करने के लिये भगवान विभिन्न रुपों में अवतार धारण करते है | जिन्हें लोग पाप कर्मों की ओर ले जाते है , उन दुरात्माओं , चांडालों , पापियों , का भगवान नाश करते है | अत: ऐसे पापियों के उध्दार के लिये भगवान विभिन्न रुप लेकर प्रगट होते है एवं अपनें भक्तों की रक्षा करते है |

suvarna lele said...

भक्तांसाठी देव लीला अवतार घेतो .अनेक वेश धारण करतो .कबीरासाठी शेले विणतो ,नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून रहातो ,दामाजी साठी महार वेषाने कर बादशहाच्या दरबारात पोहोचवतो .संत सखू च्या सासरी स्त्रीरुपाने रहातो . भक्त प्रल्हादासाठी नरसिंह रूप धारण करतो .
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला अज्ञानी लोक जाणत नाहीत .अज्ञानी पापी लोकांना माझे खरे स्वरूप लक्षात येत नाही त्यामुळे माझावर त्यांचा विश्वास नसतो .ते खरोखरच पापी असतात .ते नुसते पापी नसतात तर दुरात्मे असतात .दुरात्मे म्हणजे आत्म्यापासून दूर आपल्या स्वस्वरूपापासून दूर .ईश्वरावर ,भगवंतावर श्रध्दा नसणारे ,अश्रध्द लोक .ते भगवंताच्या स्वरूपाला जाणत नाहीत .
ते चांडाळ पापी असतात कारण त्यांना दैन्यवाणे जिणे जगावे लागते ,ते सतत दु:खी ,असमाधानी असतात .