II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
तये द्रौपदीकारणे लागवेगे।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
श्लोक १२४...
तये द्रौपदी कारणे लागवेगे |
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागे ||
कळी लागि जाला असे बौध्द मौनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२४||
हिन्दी में......
देख दौपदी को है वह बचाये |
सब छोड पिछे दौडे चले आये ||
कलियुग मे बुध्द बने , हुए मौनी |
न उपेक्षी कभी भक्त को देव मानि||१२४||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव ! श्री हरि भगवान दौपदी के कारण सारे कामों को छोडकर उसे बचाने तत्काल दौडे आये | ऐसे ही कलियुग के पापों का भोग भोगने के लिये परमेश्वर नें बुध्द का जन्म लिया | जिसमें उन्होंने मौन धारण कर लिया |ऐसे भगवान अपनें भक्तों का अभिमान ही करते है उसकी उपेक्षा कभी भी नही करते |
हा श्लोक १२4 वा आहे .......... क्रुपया भूल चूक कडे लक्ष द्यावे ही विनंती......|
कौरव पांडवांमध्ये द्युत चालू असताना धर्मराज युधिष्टिर त्याचे राज्य ,त्याची संपत्ती ,त्याचे भाऊ सर्व हरला .शेवटी त्याने आपल्या पत्नीला द्रौपदीला पणाला लावले आणि तो द्रौपदी सुध्दा हरला .दुर्योधनाने दु:शासनाला द्रौपदीला राजसभेत घेऊन यायला सांगितले त्यावेळेस द्रौपदी रजस्वला होती ,एकवस्त्रा होती .तरीही दु:शासनाने फरफटत तिला राजसभेत आणले .तिला विवस्त्र करण्यासाठी दु:शासनाने तिच्या साडीला हात घातला .त्यावेळेस द्रौपदीने कळवळून श्रीकृष्णाला हाक मारली .तेव्हा देव सर्व काम सोडून द्रौपदी च्या सहाय्यांस धावून आला व द्रौपदीचे रक्षण केले .
कलीयुगात बुध्दाच्या रूपात अवतार धारण केला .पण बुध्द रूपात मौन धरून बसला आहे मौनी होण्यास कारण असे असावे की या कलीयुगात भक्तीत दांभिकपणा वाढला आहे ,भगवंतावरील भक्ती उणावली .उत्कटता उरली नाही . पण देव मौनात असला तरी भक्ताची उपेक्षा तो करत नाही .
Post a Comment