Friday, May 11, 2012

श्लोक १२२

II श्रीराम समर्थ II


श्लोक १२२
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।
तया कारणें वामनू चक्रपाणी॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥


 
जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२२...
क्रुपा भाकिता जाहला चक्रपाणी |
तया कारणे वामनु चक्रपाणी ||
द्विजा कारणे भार्गवू चापपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२२||
हिन्दी में .....
क्रुपा देता रहता है चक्रपाणी |
उसी कारण से वामन रुप धारी ||
द्विजों के लिये भार्गव राम आये |
कभी न करते उपेक्षा है ,दास भाये ||१२२||
अर्थ.....
श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य इन्द्र के द्वारा क्रुपा की याचना करते ही चक्रधारी भगवान वामन रुप में प्रगट हुए | परमार्थ सेवा के लिये अर्थात् दूसरों की भलाई के लिये धनुर्धारी परशुराम बने | ऐसे भगवान अपने भक्त का सदैव अभिमान करते है उसकी उपेक्षा नही |

suvarna lele said...

बली हा प्रल्हादाचा नातू ,विरोचानाचा पुत्र ,तो धार्मिक होता .तो यज्ञयाग करत असे . ते केवळ सामर्थ्य मिळावे ,सत्ता संपत्ती मिळवावी अशा हेतूने करत असे .त्याने एकदा ईंद्र्पदाची ईछा धरून बलीने यज्ञ सत्र सुरु केले .तेव्हा घाबरलेल्या ईंद्राने भगवान विष्णूंची प्रार्थना केली .बलीपासून माझे रक्षण करा असे विनवले .त्याप्रमाणे श्री विष्णूंनी कश्यप अदिती च्या पोटी वामन रुपाने जन्म घेतला .बटूच्या वेशात यज्ञ मंडपात आला .बळीने त्यांचा सन्मान केला .अर्घ्यपाद्य अर्पण केले आणि दान मागण्यास सांगितले .त्या तेजस्वी ब्रह्मचार्याने तीन पावले भूमी मागितली .बली ला ते मागणे हास्यास्पद वाटले .बळीने त्रिपाद भूमीचे उदक सोडले .शुक्राचा-यानी बटूला ओळखले होते .त्रिपाद भूमी दान देण्यातला धोका त्यांनी ओळखला होता. हातावर उदक पडतांच वामनाने विराट रूप धारण केले .बटूने पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली ,दुस-या पावलाने द्युलोक व्यापला व तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे बली ला विचारले ,बलीने स्वत:चे मस्तक समोर दिले .तिसरा पाय ठेवायला ! विष्णू प्रसन्न झाले .पुढील मन्वतरात तू ईंन्द्र होशील असा वर देऊन त्यास पाताळात नेले व विष्णू स्वत: द्वारपाल होऊन राहिले असे वर्णन येते .श्री विष्णूंनी ईंद्राचे ही रक्षण केले आणि बळीचे ही कल्याणच केले .
सत्ता संपत्तीने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांवरही अत्याचार केले .त्यांच्या पारीपत्यासाठी भगवान विष्णूंनी जमदग्नीच्या पोटी परशुरामाचा अवतार घेतला .उन्मत्तांचा संहार केला .समर्थ राष्ट्रीय विचाराने भारलेले होते त्यांना शस्त्रधारी परशुराम आदरणीय वाटतात . देव भक्तांची उपेक्षा करत नाही या संदर्भात समर्थ परशुरामांचे उदाहरण देतात .