Friday, May 4, 2012

श्लोक १२१

II श्रीराम समर्थ II


महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

या श्लोकात भक्त प्रल्हादासाठी घेतलेल्या नरसिंह अवताराचे वर्णन आहे .
भगवत भक्त असलेला भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा ..हिरण्यकश्यपूला भगवद नामाचे वावडे होते .पण प्रल्हाद मात्र धैर्याने नारायणाचे नाम घेत होता .त्याला या श्लोकात महाभक्त म्हणतात .कारण भगवंतानेच त्यांचा महिमा गायला आहे .हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले होते त्या वरदानाप्रमाणे घरात ,बाहेर ,दिवसा ,रात्री ,नर ,पशू ,ई .पासून त्याला मृत्यू येणार नव्हता . हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा भरपूर छळ केला .त्याला कड्यावरून ढकलले .उकळत्या तेलात टाकले ,पण प्रल्हाद घाबरला नाही .खरे धारीष्ठ्य त्याच्या जवळ होते .अशा या श्रेष्ठ भक्तासाठी खांबातून नरसिंह अवतार देवाला घ्यावा लागला तो ही देहाने नर ,व मुखाने सिंह या रूपात .! ते नरसिंह रूप भयानक होते त्यांच्या मुखातून विषारी व तापदायक अग्निज्वाळा निघत होत्या .त्या भयानक रूपासमोर कोणीही जाण्यासाठी धजत नव्हते .प्रत्यक्ष लक्ष्मीला ही पुढे जाण्याचे धैर्य नव्हते तेव्हा ब्रह्मदेवाने प्रल्हादाला पुढे केले .प्रल्हादाला त्या भयानक रूपाची भीती वाटली नाही .उलट त्याने देवाची स्तुती केली .देवाला शांत केले .आपल्या लाडक्या भक्ताला प्रेमाने पोटाशी धरले

lochan kate said...

श्लोक १२१ ...
महा भक्त प्रह्लाद हा कष्ट वीला |
म्हणोनी तया कारणे सिंह जाला ||
न ये ज्वाळा वीशाळ संनीध्द कोणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२१||
हिन्दी में....
महा भक्त प्रहलाद को कष्ट पीडा |
इसी लिये भगवान सिंह रुप खडा ||
न होता उनके पास ज्वाला ओ से |
सदा देव करता अभिमान भक्त से ||१२१||
अर्थ ....
श्री राम दास जी कहते है कि हे मनुष्य ! महाभक्त प्रह्लाद को अपने पिता के दुर्व्यवहार के कारण अत्यंत कष्ट उठाने पडे | होलिका की गोदी में बैठाकर आग लगा दी गैइ थी तब भयानक ज्वालाओं के कारण कोई उनके पास नही आ पाया | किन्तु उसके कारण भगवान नें सिंह का रुप लिया और प्रहलाद को बचाया अत: भगवान सदैव अपने भक्त का अभिमान ही करते है उनकी उपेक्षा नहीं कर्ते |