II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
गजेंदु महासंकटी वास पाहे।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥
उडी घातली जाहला जीवदानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
भागवतात स्कंद ८ अध्याय २ ते ४ या ठिकाणी गजेंद्र मोक्षाची कथा आहे ,गजेंद्र हा पूर्व जन्मातील इंद्रद्युम्न हा शापित राजा होता .तो धर्मशील ,पुण्यवान ,हरिभक्त होता .पण अगस्ती ऋषींनी ,,राजाकडून चांगले आदरातिथ्य न झाल्याने ‘तू गजयोनीत जाशील आसा शाप दिला .तसेच नक्र किंवा मगर हा देवऋषींनी शाप दिलेला हूहू हा गंधर्व !
गजेंद्र पुष्कर तीर्थावर हत्तीणीं बरोबर जलक्रीडा करत होता .तेव्हा नक्राने गजेंद्राचा
पाय पकडला .गजेंद्र खूप खटपट करू लागला ,पण पाय सुटला नाही .त्याने कळपातील हत्तींना बोलावले पण कोणी मदत केली नाही .कठीण समय येता कोण कामास येतो ! त्याला हरिस्मरण झाले , हरीच आपला त्राता आहे असे वाटले सरोवरातील एक कमलपुष्प भगवंताला अर्पण केले .आर्त होऊन त्याने भगवंताचा धावा केला .श्रीविष्णू त्याच्या मदतीला धावून आले .देव भक्ताभिमानी आहे .तो त्याची उपेक्षा करत नाही .
श्लोक ११८....
गजेन्द्र महा संकटी वास पाहे |
तया कारणे श्रीहरी धावतां हे ||
उडीई घातली जाहला जीवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११८||
हिन्दी में ....
गजेंद्र ने संकट में आर्त लगायी |
सुनकर प्रभु दौडे देर ना लगायी ||
दिया भगवन ने उसे जीवदानी |
उपेक्षा न करता देव भक्ताभिमानी ||११८||
अर्थ..... श्री समर्थ रामदास स्वामी कहते है कि हे मानव ! महासंकट के समय आर्तपुकार सुनकर श्री हरि गजेन्द्र के लिये भी दौडे आये थे और उसे जीवन दान दिया | अत: हे मानव ! यह जान लो कि भक्त की आर्त पुकार सुनकर भगवान तुरंत दौडते है और उसकी मदद करते है | अत: भगवान सदैव अपने भक्त का साथ ही देते है | उसकी उपेक्षा कभी भी नही करते |
Post a Comment