Friday, April 20, 2012

श्लोक ११९

II श्रीराम समर्थ II

अजामेळ पापी तया अंत आला।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक
अजामेळ पापी तया अंत आला |
क्रुपाळू पणे तो जनी मुक्त केला||
अनाथासि आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानि ||११९||
हिन्दी मे ...
अजामेल पापी उसे अंत भी है |
प्रभु क्रुपा से भी वो मुक्त होता है ||
अनाथों का आधार है चक्रपाणि |
न उपेक्षी कभी देव भक्ताभिमानी ||११९||
अर्थ... श्री राम दास जी कहते है की हे मानव ! जिसके मन में अत्यंत मैल हो उस पापी का भी अंत आता ही है परन्तु उस समय भी भगवान को आर्तता से पुकार नें पर भगवान अपनी दयालुता से उसे मुक्त कर देते है | अनाथों के नाथ अर्थात् चक्रधारी भगवान भी भक्तों का अभिमान ही करते है उनजी उपेक्षा कभी नही करते |

suvarna lele said...

अजामेळ हा कान्यकुब्ज देशातील मुळचा सदाचारी ब्राम्हण पण मन अनावर झाल्यामुळे पापी बनलेल्या या ब्राह्मणास दासीपासून दहा पुत्र झाले .सर्वात धाकट्या मुलाचे नाव नारायण होते .मृत्युच्या दारात असताना त्याने नारायण ,नारायण अशा हाका मारीत असे .त्या नामामुळे विष्णुदूत यमदूतांना त्याच्यावर पाश टाकू देईनात .यमदूत व विष्णूंचे दूत यांच्यातील संवाद त्याने ऐकला आणि नामस्मरणाचे पुण्य त्याने जाणले .तो विरक्त झाला ,भगवदभक्ती करू लागला .उत्तम गती पावला .
येथे अजामेळाची गोष्ट देव भक्ताभिमानी कसा आहे ते सांगण्यासाठी ९५ व्या श्लोकात सांगूनही सांगितली आहे .