Friday, April 6, 2012

श्लोक ११७

II श्रीराम समर्थ II

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

भागवतात स्कंद ४ ,अध्याय ८ ते १२ मध्ये ध्रुवाची गोष्ट आली आहे .उत्तमपाद राजाच्या दोन राण्या होत्या .सुनीती आणि सुरुची .सुनीती मोठी राणी आणि धृव तिचा मुलगा होता .सुरुची धाकटी राणी होती सुरुची लाडकी राणी होती .एकदा राजा उत्तमाला मांडीवर घेऊन बसला होता .ध्रुवाने ते बघितले .तो राजाच्या दुस-या मांडीवर जाऊन बसला .हे पाहून सुरुची रागावली .म्हणून राजाने ध्रुवाला मांडीवरून खाली ढकलले .धृव रडत आईकडे गेला .आईने त्याला सांगितले ,” बाळा ,रडू नकोस .ही परमेश्वराची ईच्छा | तो ठेवेल तसे रहावे .धृव म्हणाला ‘मी देवालाच भेटतो ,त्यालाच विचारतो .’आई म्हणाली ,अरे बाळा ,देव फुकटचा भेटत नाही .त्यासाठी एकांतात तप करावे लागते .तुला कसे जमेल ? ध्रुवाने तप करण्याचा निश्चय केला .वनात जाउन तप करू लागला .काही काळानंतर नारद त्याला भेटले .त्याची निष्ठा किती दृढ आहे हे पाहण्याकरता त्यांनी त्याला वनात राहणे कसा धोका आहे ते सांगितले .पण त्याचा दृढ निश्चय पाहून नारदांनी त्याला द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला तप केल्यावर भगवंत प्रसन्न झाले .त्याला बापाची मांडीच काय कायमचे अढळपद दिले .धृव चिरंजीव झाला .तारांगणी त्याची जागा अढळ आहे .

lochan kate said...

श्लोक ११७...
धरु लेकरुं बापुडे दैन्य वाणे |
क्रुपा भाकिता दीधली भेटि जेणे ||
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११७||
हिन्दी में ....
करे बालक दीनता पूर्ण भक्ति |
क्रुपा देता रहता वो साथ में शक्ति ||
तारांगणो मे बना वो चिरंजीवी |
उपेक्षा न करता देव कभी भी ||११७||
अर्थ... श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! ध्रुव बालक दीनता पूर्वक तन , मन से लीन होकर भगवान की प्रार्थना कर रहा था | भगवान नें उसके अंतरात्मा की आवाज सुन कर , क्रुपा करके उसे दर्शन दिए | उसे चिरंजीव बना कर तारांगणों में भगवद् प्रेम की खान का तारा बनाया अर्थात् उसे उच्च स्थान प्रदान किया | अत: परमेश्वर अपने भक्तों का सदैव हित ही करते है | उसकी कभी भी उपेक्षा नही करते है |