Friday, February 24, 2012

श्लोक ११२

II श्रीराम समर्थ II


जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।
परी वादवेवाद तैसाचि ठेला॥
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

Monday, February 20, 2012

श्रद्धांजली - डो. सुषमाताई वाटवे..

मा. डो. सुषमाताई वाटवे यांचे रविवार दि. १९ फेब्रु. २०१२ रोजी दु:खद निधन झाले.
या ब्लोगवरती त्यांचा वरद हस्त होता आणि सतत राहील.
मनाच्या श्लोकांवरील त्यांचे निरुपण आपण दर आठवड्याला ऐकत असतो.
या आठवड्यात योगायोग असा की. शुक्रवारी श्लोक अपलोड करता आला नाही आणि तो रविवार सकाळ्पर्यंत ही अपलोड झाला नाही. गेल्या १११ श्लोकांचे काम करताना असे कधीच झाले नाही.
डो. सुषमाताईनी हे मर्त्य जग सोडले असले तरी त्यांचा कृपाशिर्वाद आपल्यावर सतत राहील याची
आपणां सर्वांनाच मनोमन खात्री आहे.
आपल्या ब्लोग ची मा. डो. सुषमाताई वाटवे यांना विनम्र श्रद्धांजली !

( या आठवड्यात श्लोक अपलोड होणार नाही. )

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

Friday, February 10, 2012

श्लोक १११

II श्रीराम समर्थ II

हिताकारणे बोलणे सत्य आहे।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥
हितकारणे बंड पाखांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

Friday, February 3, 2012

श्लोक ११०

II श्रीराम समर्थ II

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।
विवेके अहंभाव यातें जिणावें॥
अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥


जय जय रघुवीर समर्थ !