Friday, January 6, 2012

श्लोक १०६

II श्रीराम समर्थ II



बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥
दया सर्वभुतीं जया मानवाला।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥

2 comments:

lochan kate said...

श्लोक १०६...
बरी स्नान संध्या करी एक निष्ठा |
विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा||
दया सर्व भूती जया मानवाला |
सगा प्रेमळुभक्ति भावे निवाला ||१०६||
हिन्दी में...
नियमित जीवन जिये एक निष्ठ |
मन: शांति विवेक न हो स्थान भ्रष्ट||
दया सर्व भूति जिस मानव में होये |
सदा प्रेम , शांति से भक्ति में खोये ||१०६||
अर्थ....
श्री रामदास जी कहते है कि हे मानव ! स्नान पूजा , अर्चना , निष्ठा पूर्वक एक मन से करते रहना चाहिये | अपने विचारों को विवेक पूर्ण नियमित करके पूजा अर्चना का स्थान भ्रष्ट नही करना चाहिये | जिस मानव के मन में दया का भाव होता है वह व्यक्ति सदैव प्रेम पूर्वक शांत प्रव्रुत्ति का व्यक्ति होता है |

suvarna lele said...

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा | या चारानातून समर्थ स्वधर्माचरण करण्याचा उपदेश देतात .आपले मन चंचळ असते .त्याला आपला सोडून दुसरा धर्म योग्य वाटतो ..म्हणून समर्थांनी स्वकर्म करण्याचा उपदेश केला आहे .आपल्याला योजिलेले कर्म फलाशा सोडून केले तर चित्त शुध्द होते .स्नान संध्या महत्वाचे कर्म आहे .ते बरे करा असे समर्थ म्हणतात बरे म्हणजे संध्या करण्यासाठी आंचमन केले प्रापंचिक विषयातून मन काढून संपूर्ण वेळ भगवननिष्ठ रहावे .असे झाले तर इतर कोणतेही साधन करण्याची जरुरी नाही असे समर्थ म्हणतात .संध्या ही सूर्य रूपाने होणारी ब्रह्मोपासना आहे .गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांचा राजा आहे .यात सर्व मंत्रांचा राजा आहे .या मंत्राचे पाठबळ घेउन अन्य साधन केले तर साधनात शुचिता व तेजस्विता येते .म्हणून हे मना ,विवेक कर .स्वकर्म कर .स्थानभ्रष्ट झालेल्या तुला विवेकाने आवर .
विवेकाने स्वकर्म केले की चित्त शुध्द होते ..द्वैत भावना नाहीशी होते .सर्वाभूती रामराय असा प्रत्यय येतो .भूतमात्री दया उत्पन्न होते .सर्वत्र राम आहे या भावनेने साधक वागू लागतो .