Friday, January 13, 2012

श्लोक १०७

II श्रीराम समर्थ II
मना कोपआरोपणा ते नसावी।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।
मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १०७....
मना कोप आरोपना ते नसावी |
मना बुध्दि हे साधु संगी वसावी ||
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी |
मना होई रे मोक्ष भागी विभागी ||१०७||
हिन्दी में....
आरोप , द्वेष , कोप मन में ना ठहरे |
मन: बुध्दि संतों की संगत में रह ले ||
नाश कर दे मन से चांडाल व्रुत्ति |
मन:हो तेरा मोक्ष का भाग साथी ||१०७||
अर्थ... श्री रामदास जी कहते है कि हे मन ! मन में कोप की धारणा नहीं रखना चाहिये | बुध्दि को सत्संग में स्थिर रखना चाहिये हे मनुष्य ! दुष्ट व्यक्ति की संगत त्याग देना चाहिये तभी हम मोक्ष के भागीदार हो सकेंगे अर्थात् सत्संग के मार्ग पर चलना हितकर होता है |

suvarna lele said...

हे मना ,क्रोध निर्माण होऊ देऊ नकोस .क्रोध निर्माण होतो वासनांची पूर्ती झाली नाही तर वासनाच उत्पन्न झाली नाही तर क्रोध निर्माण होणारच नाही ..विषय वासना निर्माण होऊ नये म्हणून हवा सत्संग ! कारण संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळून जाय | संत संग ओळखायचा कसा ? निरपेक्षता ,भगवंताचे स्मरण ,शांती ,समदर्शन ,निर्वैर या पांच लक्षणांनी युक्त असतो तो संत !त्याची संगत मिळाली तर सुखकारी होते .
साधुसंग व्हावा ,तसेच दुष्ट संगत नसावी अशी निश्चयात्मक बुद्धी असावी .दुष्ट संगतीने साधक त्याच्या निश्चयापासून ढळतो .दुष्ट कोण आसा प्रश्न येतो . दुष्ट तो जो केवळ विषयी असतो .म्हणून दुष्ट चांडाळ टाळून संत संगती धर . संत संगती धरली मोक्षाचा अधिकारी मोक्षाचा अधिकारी होशील .तुझ्या जन्म मरणाच्या फे-या वाचवायच्या असतील तर सत्संग धर.