Friday, November 4, 2011

श्लोक ९७

II श्रीराम समर्थ II

मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।
अहंतागुणे यातना ते फुकाची॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥
 


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक ९७...श्लोक ९७...
मुखी नाम नाही तया मुक्ति कैंची |
अहंता गुणे यातना ते फ़ुकाची ||
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा |
म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा ||९७||
हिन्दी में....
मुख में जिसके नाम नही उसे मुक्ति कैसे |
अहंकारिता गुण देती यातना फ़ोकट से ||
आगे काल का अंत खडा दीनता का |
इसलिये कहा है रे ले नाम राम का ||९७||
अर्थ.... श्री राम दासजी कहते है कि हे मन ! जिसके मुख में राम नाम का उच्चार नही हो उसे मुक्ति कैसे प्राप्त होगी | अहंकार के कारण मनुष्य को यातनायें अधिक होती है | आगे चलकर अंत में मनुष्य की दीन दशा हो जाती है | इसलिये हे मानव ! सिर्फ़ इसलिये ही कि दीन दशा ना हो एवं यातनाओं से मुक्तता रहे | अत: रामनाम का स्मरण सतत् करते रहना चाहिये |

suvarna lele said...

ज्याच्या मुखात भगवंताचे नाम नाही ,त्याला मुक्ती कशी मिळेल ? असे समर्थ विचारतात .अहंकारामुळे उगाचच कष्ट सोसावे लागतात .मुखी नाम नसेल तर दैन्यवाणा अंत होतो म्हणून हे मना सतत नाम घे .
ज्याच्या मुखी नाम नसते ,ज्याला नामाचे महत्व कळत नाही त्याला अशी जाणीव होत नाही की या सृष्टीचा पालनकर्ता कोणी आहे ,तोच सर्व गोष्टी करवतो ,आपण कांहीच करत नाही .आपण कर्ता नाही .कर्ता करविता ईश्वर आहे ह्या गोष्टी त्याला कळत नाही आणि त्याच्या मनात अहंता निर्माण होते .मी सर्व करतो ,माझ्यामुळे सर्व गोष्टी घडतात .असे वाटत रहाते .मग अहंतेमुळे त्याला मुक्ती कशी मिळणार ? मुक्ती मिळते फक्त आत्मज्ञानाने ! श्रीसमर्थांनी दासबोधात दशक ५ समास ५ बहुधाज्ञान निरुपण समासात हे ज्ञान नव्हे असे सांगत १४ विद्या ६४ कलांचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान नाही .आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असे सांगितले आहे .
पण अहंकाराने आपण एखाद्या विषयातले ज्ञान हेच खरे ज्ञान समजतो ,मी पणाने मला म्हणजे आपल्या देहाला सुख व्हावे म्हणून रात्र दिवस कष्ट करतो मी ,माझे घर ,माझे कुटुंब ,असा सतत विचार करतो ,चित्ताला व्यग्रता येते ,चित्त दु:श्चीत्त होते आणि दु:ख पदरी पडते .
आपल्याला सुख मिळावे म्हणून आपण आपल्या ईच्छा ,आकांक्षा वाढवतो ,थोडक्यात ,आपण वासनांच्या नादी लागतो ,वासना पूर्ण करण्यासाठी धडपड करतो म्हणजे रजोगुण वाढवतो .समर्थांनी म्हटल्या प्रमाणे ‘रजोगुणे पुनरावृत्ती ‘ होते .जन्म मरणाच्या फे-यात अडकतो .पून्हा पून्हा जन्म मरणाच्या यातना भोगाव्या लागतात ..प्राणी एकटा जन्माला येतो ,एकटाच जातो .एकट्यालाच त्याच्या यातना ,दु:ख भोगावे लागते .जिवंतपणी नाम न घेतल्याने श्रीरामांचे पाठबळ मिळत नाही म्हणून हे मना सतत रामनाम घे .

sanjay bhonge said...

मी दासबोध वाचलेले नाही.. थोडे फार मनाचे श्लोक वाचलेत. पण नाम महात्म्य काय असते ते प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी यांच्या कथेतून आपल्याला समजले आहेच. नामस्मरणात रममाण झाल्यावर माणूस तल्लीन होतो, विश्वरूपात एकरूप होतो, तो अहंकार, मोह, मद, मत्सर, माया, कोप या षडरिपु पासून दुरावतो.आणि मग खऱ्या अर्थाने त्याचे मन वैषयिक जीवनापासून मुक्त होते. म्हणून नामस्मरण करताना किती वेळा म्हटले या पेक्षा या जगाचा, अवती भवती वावरणाऱ्या अडथळ्यांचा तुम्हाला विसर पडतो एवढे तादात्म्य साधते का? नामस्मरण मी रोज करतो ते सोपे आहे.. पण संपूर्ण समर्पण करणे खूप अवघड आहे.. आणि जेव्हा आपण ते साध्य करतो.. तेव्हा मुक्त होतो... समरूप होतो..म्हणून, समर्थांनी सागितले आहे त्या प्रमाणे नामस्मरण केले पाहिजे पण ते संपूर्ण समर्पित होऊन केले पाहिजे...