Friday, July 29, 2011

श्लोक ८३

II श्रीराम समर्थ II


जेणे जाळिला काम तो रामध्यातो।
उमेसी अती आदरें गुण गातो॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

ज्याने कामाला जाळले ,ते शंकर भगवान उमेला म्हणजेच पार्वतीला आदराने श्रीरामाचे गुण सांगतात .मानवच काय पण देव ,गन्धर्व ,मुनी ,दानव या सर्वांना त्रास देणा-या कामाला शंकरांनी जाळून टाकले .सामर्थ्य संपन्न ,वैराग्याची मूर्ती असलेले भगवान शंकर श्रीरामांचे ध्यान करतात ,रामाचे भजन करतात .भगवान शंकर ज्ञानाचे भांडार आहेत ,वैराग्याचे आदर्श आहेत ,त्यांच्या जवळ सामर्थ्य आहे मग तरीही ते श्रीरामाचे नाम का घेतात ? त्यांचे ध्यान का करतात ? कारण ही त्यांची ज्ञानोत्तर भक्ती आहे ,ती अत्यंत महत्वाची असते . त्यांचा रामनामावर विश्वास आहे .
भगवान शंकर भक्ती मार्गातील जगतगुरू आहेत .त्यांचा आदर्श ठेवून आपल्या सारख्या सामान्यांनी रामनाम घेतले पाहिजे असे समर्थ या श्लोकात सांगतात .

lochan kate said...

श्लोक ८३......श्लोक ८३......
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो |
उमेसी अती आदरे गुण गातो ||
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे |
परी अंतरी नाम विश्वास तेथे ||८३||
हिन्दी में .....
जल काम वासना जो राम को ध्याये |
उमा देवि उसके आदर से गुण गाये ||
बहुत ज्ञान वैराग्य सामर्थ्य जहां हो |
पर अंतर में नाम विश्वास वहां हो ||८३||
अर्थ....
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! जिसने अपनी काम वासना का अंत कर दिया हो और जो रामनाम में लीन हो गया हो उसका पार्वती सह शंकर जी भी गुणगान करते है | जिसका ज्ञान एवं वैराग्य अत्यधिक हो गया हो उसमें अंतर मन की शक्ति का सामर्थ्य आ जाता है | परन्तु हे मानव अंतर मन में राम नाम के प्रति विश्वास होना आवश्यक है |