Friday, July 15, 2011

श्लोक ८१

II श्रीराम समर्थ II


मना मत्सरे नाम सांडूं नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो॥
समस्तांमधे नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

हे मना ,कोणाकडेही मत्सर बुद्धीने पाहू नकोस .तुला जे मिळाले आहे त्यात समाधान मानायला शिक् .सर्व जीवांमध्ये आत्मारामाचे वास्तव्य असते .तू कोणाचाही मत्सर केलास तरी त्या आत्मारामाचा मत्सर केल्या सारखे होईल .म्हणजेच श्रीरामाचा मत्सर केल्यासारखे होईल .अरे तुला त्या सर्वेश्वर श्रीरामाची भक्ती ,पूजा करायची आहे ना ,मग कोणाचा मत्सर करू नकोस .तसेच नाम घेणं ही सोडू नकोस .
तू नाम घेण्याचा ध्यास घे .त्यांने तुझे फायदे होतील .तू नाम घेत राहिलास तर तुझ्या मनात कोणाविषयीही मत्सर निर्माण होणार नाही .कोणी तुझा मत्सर केला तर त्याचा तुला त्रास होणार नाही .पण एक लक्षात घे ही क्रिया एव्हडी पटकन होणारी नाही तुला त्यासाठी नामाचा ध्यास लागला पाहिजे .तरच तुला दुस-याचा मत्सर वाटणार नाही .दुस-याने केलेल्या मत्सराचा तुला त्रास होणार नाही .
नामाचा ध्यास घेण्याचा आणखीन एक फायदा असा आहे की हा देह म्हणजे मी अशी आपली जन्म जन्मांतरीची समजूत असते ती नामाच्या ध्यासाने बाजूला सारता येते आणि मी म्हणजे देह ही आपली खोटी समजूत नाहीशी होते .
नाम घेणे हे फुकाचे ,फुकटातले ,पैसाही खर्च न होता घडणारे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे .
सर्व मोक्षाच्या साधनात नाम श्रेष्ठ साधन आहे .संपूर्ण जगताला व्यापून टाकणा-या परब्रह्माला आपल्या आवाक्यात आणणारे साधन नाम आहे म्हणून नाम हे सार आहे .सर्वत्र व्यापून असणा-या परब्रह्माचे स्मरण एका नामाने साधते भगवत गीतेत भगवंतांनी सांगीतल्या प्रमाणे नामाने मन्मना भव मद्भक्तो भव हा उपदेश केवल नामाने साधता येतो म्हणून नामाची तुलना दुस-या कोणत्याही साधनाशी यज्ञ ,याग ,दान ,तप ,व्रते यांच्याशी करता येत नाही .

lochan kate said...

श्लोक ८१...
मना मत्सरे नाम सांडू नको हो |
अति आदरे हा निजध्यास राहो ||
समस्तां मधे नाम हे सार आहे |
दुजी तूळणा तूळितां ही न साहे ||८१||
हिन्दी में.....
हे मन मत्सर में नाम ना छोडो
अत्यंत आदर से निज ध्यास रखो ||
सम्स्तों मे नाम , ये सार है रे ||
किसी से उसकी तुलना नही रे||८१||
अर्थ ...
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! सत् पुरुषों के प्रति अपने मन में द्वेष भावना रखकर नाम स्मरण से दूर ना भागो |अत्यंत आदर के साथ अपने मन में राम का ध्यान समाये रखो | संपूर्ण संसार में यह नाम स्मरण ही जीवन का सार है |अन्य किसी बात से तूलना करने पर भी इसे तोला नही जा सकता | अत: इस अतुलनीय नामस्मरण का चिंतन करते रहना चाहिये | |