II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
विठोने शिरी वाहिला देवराणा। |
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ |
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी। |
जिवा सोडवी राम हाअंतकाळीं॥८४॥ |
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्री विठ्ठलाने महादेवाला ,म्हणजेच श्री शंकरांना आपल्या डोक्यावर मिरवले .असे श्रेष्ठत्व त्याला प्राप्त झाले .पंढरीतील पांडुरंगाच्या शिरावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला अनुसरून हे वर्णन आहे .विठ्ठल म्हणजे विष्णू हे शंकरांना मस्तकी धारण करतात ते त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीमुळे !
ज्ञानोत्तर भक्ती ही काही वेगळीच आहे .जसे मातेचे आणि बालकाचे देह वेगळे असले तरी अंतरंगात ऐक्यच असते .तसे ज्ञानोत्तर भक्तीत देव भक्ताचे ऐक्य असते .म्हणूनच शंकरांनी विष्णूच्या पायातील गंगा आपल्या डोक्यावर धारण केली आहे .तर विष्णूने म्हणजेच श्री विठ्ठलाने शंकरांना मस्तकावर धारण केले आहे .
शंकरमहाराज ,ज्यांनी आपल्या मस्तकी चंद्र धारण केला आहे , तपस्वी ,उग्र तप करणारे होते .परंतु समुद्र मंथनात निघालेले हलाहल विष पिउन होणारा दाह केवल रामनामाने थांबला .तेच श्रीराम ताप निवारण करणारे असल्यामुळे जीवाची जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तता करणारे आहेत .
श्लोक ८४....
विठोने शिरी वाहिला देव राणा |
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ||
निवाला स्वये तापसी चंद्र मौळी |
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||८४||
हिन्दी में ...
विष्णु ने सिर पर लिया देव राजा |
उसे अंतर में ध्यास है रे उसी का ||
स्वयं से तपे शान्त होते चन्द्र मौली |
जीवन से मुक्ति देते राम ही अंत समयी ||८४||
अर्थ ...
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! संताप से उग्र तपे श्री शंकर जी को जब विष्णु ने अपने माथे पर धारण किया | [चन्द्र मौली अर्थात् श्री शंकर जी ] तब एकदम वे शांत हो गये | अत: ऐसे तपित भगवान को भी विष्णू जी शांत करते है यो मानव का क्या ?अत: मनुष्य को चाहिये कि ऐसे श्री राम चन्द्र जी का सतत नाम लेने से अंत समय में मुक्ति प्राप्त होती है | अत: मुक्ति की प्राप्ति के लिये सतत विष्णु स्मरण करते रहना चाहिये |
Post a Comment