Friday, July 1, 2011

श्लोक ७९


II श्रीराम समर्थ II

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपणजय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ७९
श्लोक ७९
मना पावना भावना राघवाची |
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ||
भवाची जिवा मानवा भूलि ठेली |
नसे वस्तु ची धारणा व्यर्थ गेली ||७९||
[हिन्दी में]
हे मन रख तु भाव मन में राघव का |
अंतर मे धर राम ,छोड चिंता तु भव का ||
नश्वर है संसार ,भ्रम तु छोड मानव का |
माया मोह व्यर्थ है ये तु धारणा रख सा ||७९||
अर्थ ....
श्रीराम दास जी कहते है कि हे मानव मन ! अंतर मन में बसी संसार की व्यर्थ की चिंता की छोडकर पावनता से श्रीराम के प्रति शुध्द भाव रखना चाहिये तथा इस नश्वर संसार का भ्रम छोडकर सत् स्वरुप की धारणा रखना कभी भी व्यर्थ नही जाता है | अत: अपने को सद् विचारों के साथ सद् स्वरुप में लीन रखना चाहिये | एवं सदा भगवद्भक्ति में लीन रहना चाहिये |

suvarna lele said...

देह्संसार चिता करणे व्यर्थ का आहे याचे स्पष्टीकरण समर्थ या श्लोकात देतात .
समर्थ सांगतात की हे मना ,तू पावन करणा-या राघवा बद्दल भावना धर .प्रपंचाची चिंता करणे सोडून दे . समर्थ दासबोधात म्हणतात ,सांडून आपली संसार वेथा | करीत जावी देवाची चिंता | निरुपण कीर्तन कथावार्ता |देवाच्याची सांगाव्या ||४-८-७ ||
समर्थ सांगतात संसाराच्या चिंता करण सोडून दे .देवाची चिंता कर .देवाची चिंता म्हणजे सतत देवाचे स्मरण कर .श्रवण ,कीर्तन ,नामस्मरण अशा भक्ती च्या ज्या नऊ पाय-या सांगीतल्या आहेत त्या पाय-या अनुसर .की तुझी देहबुद्धी नाहीशी होईल ..सत्व गुण वाढेल .चित्त वृत्ती शुध्द होईल .
भक्ती न करता देह्संसार चिंता केली तर काय होईल ते समर्थ सांगतात – भवाची जीवा मानवा भूली ठेली | भव म्हणजे संसार ! संसार ही एक भूल आहे ,भ्रम आहे . माणसाला संसाराची भूली पडते .त्या भ्रमात माणूस अडकतो भ्रम म्हणजे जे नाही ते आहे असे वाटणे .जसा अंधारात दोरीवर सर्पाचा भास होतो .तसा संसार हा एक भ्रम आहे .प्रश्न असा येतो की संसार तर आपण करतो ,आपल्याला दिसतो तर तो भ्रम कसा ? विचाराने आपल्याला कळते संसार कल्पनेवर आधारित आहे .कल्पनेवर आधारित सृष्टी म्हणजे भासच असतो .
कल्पनेवर आधारित असलेल्या आठ सृष्टी समर्थांनी द ६ स ६ मध्ये सांगितल्या आहेत ,पण त्यातली एकाही खरी नाही ,सत्य नाही .कारण त्या सर्व कल्पनेवर आधारित होत्या परंतु सृष्टी मिथ्या असली ,असत्य असली तरी त्या सृष्टीचा पसारा ज्या अधिष्ठानावर भासतो त्या सर्वांचा आधार एकच आहे ,तो म्हणजे निर्गुण आत्माराम ! त्याच्याशी तद्रूप हो असे समर्थ सांगतात .तीच खरी भक्ती .