II श्रीराम समर्थ II
सुखानंद कारी निवारी भयाते |
जनी भक्ति-भावे भजावे तयाते |
विवेके त्यजावा अनाचार हेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६९||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
सुखानंद कारी निवारी भयाते |
जनी भक्ति-भावे भजावे तयाते |
विवेके त्यजावा अनाचार हेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६९||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
As stated by Lochan Kate...सुखानंदकारी भय को है हरता |
अत:भजो रे राम नाम है करता ||
त्यागो अनाचार अपने विवेक से |
प्रभाती में कर रे चिंतन मन से ||६९||
अर्थ..श्रीराम दास जी कहते है कि हे मानव मन ! सबको सुख व आनंद देने वाले श्रीराम चन्द्र जी जो भय को दूर करते है उनकी भक्ति अंतर मन से श्रध्दा भाव से करो | अपनें मन से दुष्कर्मी विचार अर्थात द्वेष एवं अनाचार त्याग देना चाहिये और प्रात: के समय में श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये |
हे मना ,त्या श्रीरामाचे स्मरण कर .कारण श्रीराम सुखानंद रूप आहे म्हणजे त्याच्या जवळ शाश्वत असे सुख आणि आनंद आहे आपल्याला भौतिक गोष्टींची प्राप्ती झाली की सुख वाटते ,आनंद होतो .पण ते सुख क्षणीक असते कारण कोणतीही भौतिक गोष्ट नाश पावणारी असते .पण श्रीराम स्वत: शाश्वत ,सुखानंद रूप असल्याने त्याच्या नामस्मरणाने मिळणारा आनंद ही शाश्वत आहे .जसजसे आपण नामस्मरण करत जातो ,भक्तीने अंत:करण पूर्वक नाम घेतो तसे तसे आपण आपले रहात नाही ,आपण रामनामात गुंगून जातो .आणि त्यावेळेस ज्या सुखाची प्राप्ती होते ती अवर्णनीय असते .प्रत्यक्ष शंकर भगवान ही श्रीरामाचे स्मरण करत असतात .
सुखानंद देणारे श्रीराम भयाचे ही निवारण करतात .माणसाला भयं देहबुद्धीने असते .श्रीरामांच्या नामात तल्लीनता येते तेव्हा देहबुद्धी सुध्दा नाहीशी होते .देहबुद्धी नाहीशी झाली की भयाचे कारण रहात नाही .
समर्थ या श्लोकात व्यापक अर्थाने रामाची उपासना करायला सांगतात .समर्थ सांगतात की कोणाचा हेवा करू नका .त्यासाठी समर्थ सर्वांमध्ये राम बघायला सांगतात ..सर्वत्र रामच भरला असे तेव्हा वाटेल जेव्हा आपले आचरण विवेकाने युक्त असेल .शुध्द असेल ,कोणाबद्दल मत्सर नसेल .कोणाबद्दल क्रोध नसेल .जे घडते ते ईश्वराच्या ईच्छेने अशी मनाची धारणा असेल तरच सर्वत्र श्रीराम आपण पाहू शकू ..यासाठी समर्थ आपल्याला एकच मंत्र देतात .प्रभाते मनी राम चिंतीत जावा !
Post a Comment