Friday, April 15, 2011

श्लोक ६८....

II श्रीराम समर्थ II

बळे आगळा राम कोदंडधारी |
महाकाळ विक्राळ तोही थरारी ||
पुढे मानवा किंकरा कोण केवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६८||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Anonymous said...

As stated by Lochan Kate( Gwalior)... ...कोदंड धारी है राम जो श्रेष्ट |
महाकाल डरता है उनसे कनिष्ट ||
मानव की क्या उनके आगे प्रतिष्टा |
प्रभात में कर राम चिंतन निष्टा ||६८||
[कोदंडधारी का अर्थ है धनुष्य बाण धारण करने वाले ]
अर्थ... श्रीरामदासजी कहते है कि हे मन ! श्री राम चन्द्र जी प्रथम तो बलवान हैं एवं धनुर्धारी हैं जिन्हे देखकर महाकाल अर्थात् यम भी घबराने लगता है | एक छोटे से कंकड जैसा मानव ऐसे महान श्री राम जी की कथा क्या कर सकता है ? इसलिये हे मानव ! ऐसे श्रीराम का प्रात: समय में सतत चिंतन करते रहना चाहिये |

suvarna lele said...

या श्लोकात श्रीरामांच्या गुणांचे वर्णन आहे .श्रीराम कोदंडधारी आहेत कोदंड म्हणजे धनुष्य ,ते धनुर्धारी आहेत .सीता स्वयंवर असताना अनेक राजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण एकां श्रीरामां शिवाय कोणाला ही ते धनुष्य उचलू शकले नाही व त्याचा भंग करू शकले नाही .रावणही ते धनुष्य उचलू शकला नाही .असा श्रीराम बळाने आगळा आहे .
काळ म्हणजे मृत्यू त्याची या जगावर सत्ता चालते तो काळही श्रीरामांपुढे थरथर कापतो .मग या क्षुद्र मानवाची काय कथा? असा प्रश्न समर्थ विचारतात .
श्रीरामाच्या नामाचे महत्व समर्थ येथे सांगतात .की श्रीरामाचे नाम जर घेतलेस तर तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे :
काळ गुलाम करी सलाम |तुकया घरी तो नांदतो | अशी परिस्थिती येईल .