Friday, December 17, 2010

श्लोक ५१

II श्रीराम समर्थ  II
मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||श्रीराम|| ॥५१॥


 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ....
मद मत्सर छोड रे स्वार्थ बुध्दि |
नही संसार में उसे लोभ की उपाधि||
सदा बोलना नम्र वाचा सुवाचा |
जग में है वो दास सर्वोत्तम सा||५१||

अर्थ== श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मनुष्य ! जो नशा, द्वेष और लोभ से दूर हो गया हो | जिसका मन से स्वार्थ बुध्दि का अंत हो गया हो एवं प्रपंच अर्थात घर संसार से जिसका मन उचट गया हो | जो सदैव नम्र भाषा का प्रयोग बोलने में करता हो वही भक्त इस संसार में श्रीराम का धन्य एवं उत्तम भक्त कहलाता है |

suvarna lele said...

५१ व्या श्लोकात समर्थ सर्वोत्तामाच्या दासाचे काही गुण सांगत आहेत .सर्वोत्तामाच्या दासाकडे मद ,मत्सर आणि स्वार्थबुद्धी नसते . मद म्हणजे ताठा ,घमेंड .प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचा मद असतो .कोणाला सौंदर्याचा ,कोणाला ज्ञानाचा ,कोणाला सामर्थ्याचा ,कोणाला धनाचा मद असतो .संपत्तीच्या जोरावर मी काहीही करीन अशी त्याची भावना असते .मत्सर निर्माण होतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही पण दुस-याला मिळते .दुसरा आपल्या पुढे गेलेला सहन होत नाही . सर्वोत्तामाच्या दासामध्ये मद आणि मत्सर हे विकार नसतात ,कारण सिध्द् लक्षण समासात समासात समर्थ म्हणतात – आपुला आपण स्वानंद | कोणावरी करावा मद |८-९-२८ | |

साधू स्वरूप निर्विकार | तेथे कैंचा तिरस्कार | आपला आपण मत्सर |कोणावरी करावा | |८-९-२९ | |

सर्वोत्तामाच्या दासाला स्वार्थबुद्धी नसते .कारण त्याला लोभ नसतो .कारण आपण कोणी निराळे नाही .सर्व आपणच असा त्याचा भाव असतो .

त्यांना संसाराची उपाधी नसते .संसार म्हणजे जन्म मरणाच्या येरझारा .प्रपंच म्हणजे मिथ्या असलेली दृश्य विश्वातली उपाधी म्हणजे आपले घर ,व्यवसाय ,कुटुंब जे अशाश्वत आहे .ह्या कोणत्याही गोष्टी सर्वोत्तमाच्या दासाकडे नसतात .

जगात तो बोलतो तसा वागतो .त्याचे बोलणे नम्र असते .त्याचे भाषण मधुर असते .असा हा सर्वोत्तमाचा दास असतो