Friday, December 10, 2010

श्लोक ५०

II श्रीराम समर्थ II

नसे अंतरी काम कारी विकारी|
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी||
निवाला मनी लेश नाही तमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||श्रीराम||५०||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Kalyan Swami said...

न रहे मन मे काम या आस|
जो तापसी ब्रहमचारी उदास||
अंत कर मन के तम का तु रे|
तभी धन्य कहलाता दास मै हू रे||५०||
अर्थ...... श्रीरामदासजी कहते है कि ! जिसके प्रति मन मे कार्य करने मे कोई विकार न हो जिसका विषयों के प्रति प्रेम नष्ट हो गया हो, जो ऐसा निर्विकार ब्रह्मचारी हो , जिसके मन को अज्ञानता का लेशमात्र भी नही छुआ हो जो समाधानी भी हो, श्रीराम जी का ऐसा भक्त संसार मे सबसे धन्य एवं उत्तम कहलायेगा|.....

suvarna lele said...

विकार म्हणजे बदल ! जसे दुधाचे दही होते .मानव देहात येणारे बाल्य,तारुण्य ,वार्धक्य हे सुध्दा विकारच आहेत .दागिने सोन्याचा विकार आहे .विकाराचे दोन प्रकार आहेत .१ उपयुक्त २ त्याज्य .दुधाचे दही होणे हा उपयुक्त विकार आहे .तर नासलेले दूध हा त्याज्य विकार आहे .श्री समर्थांनी ह्या श्लोकात 'कामकारी विकारी 'असा शब्द वापरला आहे .कामकारी म्हणजे काही ईछा ठेवून झालेले विकार ! माणसांच्या अंत :करणात विकारांचे स्वरूप ,प्रमाण यावर विकार ईष्ट की अनिष्ट ठरवता येते .जेव्हा विकारांचा उपयोग चांगला होतो ,तेव्हा विकार नियंत्रित व्यक्तीच्या अधीन असतो .धर्माच्या मर्यादा तो पाळतो .संरक्षण ,प्रगती ,विकास या सर्वांना तो पोषक ठरतो .तेव्हा तो कामकारी नसतो .
कामकारी विकार ज्याच्या कडे नसतात ती व्यक्ती उदासीन ,तापसी ,ब्रह्मचारी असतो .
उदासीन म्हणजे अलिप्त ,तटस्थ ,निर्मम , असतो .पण तो माणूसघाणा नसतो .तुसडा ,गर्विष्ठ रड्या नसतो .त्याची सर्व त्याज्य विकारांपासून ,कामक्रोधादी षडविकारांपासून ,माया ममतेपासून सुटका झालेली असते .
तो तापसी असतो .तापसी म्हणजे तप करणारा ,तितिक्षा असणारा ,कष्टाला न घाबरणारा ,सोशिक ,असतो .सामान्य माणसाला शारीरिक ,मानसिक पातळीवर काहीही सोसत नाही .त्यामुळे शारीरिक ,मानसिक पातळीवर त्याला क्षोभ निर्माण होतो .याउलट तापसी असतो .त्याच्या कडे तितीक्षा ,क्षमाशीलता असते .सोशिकपणा असतो .तसेच तो ब्रह्मचारी असतो .
ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरती | ब्रह्मणे चरती | ब्रह्मात राहणारा ,ब्रह्माकरिता जगणारा ,ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणारा असा असतो .त्यासाठी बहिर्मुखता सोडतो ,अंतर्मुख होतो ,विषयासक्ती सोडतो ,सतत ध्यानमग्न अवस्थेत राहतो .अनेक वृत्तींवर इंद्रीयांवर स्वामित्व मिळवतो .
तमोगुणामुळे काम क्रोध वाढीस लागतात .व मनुष्यातले सर्व विकार कामकारी होतात .पण अंत :करण प्रसन्न, शांत ,समाधानी असणारा पुरुष सर्वोत्तमाचा दास असतो .

Gandhali said...

श्रीरामाचा श्रेष्ठदास सत्पुरुष लोकव्यवहारात कसा वागतो हे मागील श्लोकात सांगितले .या परमभक्ताचे अंत:करण कसे असते हे इथे सांगितले आहे .त्याच्या अंत:करणात कामवासनेचा लेश ही नाही .तहान ,भूक, झोप हे देहादी विकार आहेत पण कामामुळे उत्पन्न होणारे इतर क्रोधादी विकार त्याच्या मनात नसतात.आपण शरीरापासून वेगळे आहोत ही जाणीव जागरूक असल्याने तो उदासीन असतो.उदासीन म्हणजे अलिप्त,तटस्थ,निर्मम असतो.देह व त्यायोगे येणाऱ्या सर्व गोष्टींच्या अतिरिक्त भोगाविशयी ,त्यांच्यात मन गुंतून पडण्याविशयी उदासीन असतो.तो तापसी असतो म्हणजे सोशिक असतो म्हणजेच शारीरिक, मानसिक पातळीवर संयमाची सवय असते.ताप म्हणजे श्रवण,मनन,अभ्यास याद्वारे ब्रह्मप्राप्तीसाठी झगडत राहणे.आत्मप्राप्तीसाठी शरीर ,प्राण झिजवने हे खरे तप करून तो सिद्ध झालेला असतो. त्यामुळे निष्ठावान ब्रम्हचारी असतो.म्हणजे ब्रम्हात राहणारा,ब्रम्हकरिता जगणारा,ब्रम्हाच्याप्राप्तीसाठी प्रयत्नशील असा.उदासीनता,तापसी ही संतांची सहज प्रवृत्ती होते आणि ब्रम्हचारी हा त्याचा आचरणात दिसून येणारा परिणाम आहे. 'देवाच्या भेटीसाठी I पडाव्या जीवलगांशी तूटी ......' या प्राप्तीसाठी अंतर्मुख व्हावे लागते,विषयासक्ती सोडून ध्यानमग्न व्हा्वे लागते अन मग अशा संतांचे अनेक प्रकारच्या वृत्तींवर व इंद्रीयावरही पूर्ण स्वामित्व असते.त्यांचे समाधान कधीही ढळत नाही.अशा अंतर्बाह्य शुद्ध असणाऱ्या दासाच्या मनात तमाचा म्हणजे अज्ञानाचा लेश ही उरत नाही तो सत्वगुणसंपन्न झाल्यामुळे त्याला प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान झाल्यामुळे तो नी:संदेह झालेला असतो.अंत:करण शांत ,प्रसन्न , समाधानी राहते.
" संशयरहित ज्ञान I तेची साधूंचे लक्षण I
सिद्धाअंगी संशयदिन I लागेल कैचा II"(दा.५.१०.१३ )
असा हा सिद्धपुरुष श्रीरामाचा दास धन्यच आहे.
श्रीसमर्थांचे स्मरण केल्यास या सर्व गुणांचे दर्शन आपणास खास घडतेच ." जय जय रघुवीर समर्थ "