II श्रीराम समर्थ II
मनी लोचनी श्रीहरि तोची पाहे|
जनी जाणता भक्त होउनि राहे||
गुणी प्रिती राखे क्रमु साधनाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||श्रीराम||४७||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, November 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar)... [हिन्दी मे]
मन रे नयन मे हरि को देखो|
और उसका तु भक्त बनके देखो||
गुणो की प्रित साध क्रम साधना का |
जग मे ध्न्य वो दास सर्वोत्तम सा||श्रीराम||४७||
अर्थ... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन !ज्ञान की द्रुष्टि से श्री हरि को वही देख सकता है जो अंतर मन से भगवान का होकर रह सकेगा| मनुष्य की सगुणात्मक प्रवूत्ति की प्रेम व भक्ति तथा साधना क्रिया का जिसका सच्चा नियम धर्म हो वही भक्त श्रीराम का संसार मे सबसे धन्य एवं उत्तम,दास कहलाता है|........
हे मना ,तुझ्या डोळ्यांना श्रीहरी चे रूप दिसू दे .श्रीहरी श्रीराम आणि अंतरात्मा हे सगळे एकच ! मग येथे श्रीराम न म्हणता श्रीहरी का म्हटले आहे ?कारण जो सगळ्या पातकांचा नाश करतो तो श्रीहरी ! त्याच्या साक्षात्काराने पाप पुण्य उरत नाही .समर्थ सांगतात की तू जाणता भक्त हो ! जाणता भक्त तो की जो सर्वत्र हरीचे रूप पाहतो .हरीचा भक्त तो जो कधीही अहंकार ,देहाभिमान ठेवत नाही .हरी चरणाशी जो लीन असतो,नम्र असतो .तो सगुणा बद्दल प्रेम ठेवतो .सगुणाची पूजा करतो ,भजन पूजन करतो .नवविधा भक्तीपैकी एका भक्तीचा अंगीकार करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतो .आत्मज्ञान झाल्यावर सुध्दा सगुण भजन व साधना चालू ठेवतो .उपासानामूर्ती ध्यानी | अथवा आत्मानुसंधानी |नाहीतरी श्रवण मननी | निरंतर ||१४-७-१६ ||
उपासना मूर्तीचे ध्यान ,आत्मानुसंधान ,श्रवण आणि मनन या चार साधना मार्गात तो निरंतर रहातो .त्यामुळे तो महान भक्त बनतो .ज्ञान झाल्यावर सुध्दा तो सगुण भक्ती विसरत नाही .त्याचे जीवन धन्य होते .तो सर्वोत्तमाचा म्हणजे श्रीरामांचा दास होतो .

श्लोक ४७
या श्लोकापासून पुढे १० श्लोकात सर्वोत्तम अशा ईश्वराचा दास कसा असतो त्याचे गुणवर्णन केले आहे .सर्वोत्तमाचा दास त्याच्यासारखा सर्वोत्तमच बनतो.येथे वर्णन केलेला दास हा उत्तमदास पूर्णत्वाला पोचलेला ज्ञानी आहे.त्याच्या मनात म्हणजे अंतरंगात व लोचनात म्हणजे दृष्टीने दिसणाऱ्या बाह्य जगात , दोन्हीकडे श्रीराम,श्रीहरी तो कृपाळू परमेश्वरच त्याला दिसत असतो.
" जिकडे पाहे तिकडे हरी I हरीविण दुजे नाही "
अंर्तबाह्य रामरूपाने तो भरून गेलेला असतो.तो ज्ञानीही असतो अन भक्त ही असतो.तो सर्वत्र राम पाहतो.त्याचा जगाशी व्यवहार तसाच असतो 'सर्वं खल्विदं ब्रम्हम'हा बोध असून ही तो सगुणाचा उपासक असतो.मला ब्रम्ह कळले आहे ,मी आत्मतृप्त आहे, मी आता उपासना ,नित्यनेम साधना कशाला करू असे तो म्हणत नाही कारण ,
" आचार उपासना सोडिती I ते भ्रष्ट अभक्त दिसती I
जलो तयांची महंती I कोण पुसे II "
सिद्धपण न मिरविता लीनतेने हरीभक्त,रामाचा सेवक म्हणून राहतो.प्रेमाने सगुणाची उपासना करतो म्हणूनच त्याला 'जाणता भक्त' म्हंटले आहे.आणि असे वागून तो लोकांना आदर्श घालून देतो.
"सर्वांमध्ये उत्तम I त्या नाव सर्वोत्तम II " अशा श्रीरामाचा हा दास खरच धन्य आहे.
खूप छान
Post a Comment