Friday, November 26, 2010

श्लोक ४८

II श्रीराम समर्थ II

सदा देव काजी झिजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नीत्य वाचा||
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||श्रीराम||४८||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Kalyan Swami said...

As stated By Lochan Kate ( Gwaliar )....[हिन्दी मे]
सदा देव सेवा मे लगता जो है रे|
सदा रामनाम जो वदता जो है रे||
स्वधर्म से चलना उत्तम राह है रे|
जग मे वो दास सर्वोत्तम है रे||श्रीराम||४८||
अर्थ.....श्रीरामदास जी कहते है कि हे मन ! सदैव जिसका समय भगवद् भक्ति में व्यतीत हो तथा जिसकी वाणी से सच्चे मन से सदैव रामनाम निकले, जो व्यक्ति सदैव सच्चे मन से स्वधर्म अर्थात् अपना कर्तव्य निबाहे , वही श्रीराम का इस संसार मे उत्तम एवं धन्य भक्त है|....

suvarna lele said...

ज्याचा देह देवासाठी झिजतो ,तो दास्य भक्ती करतो .दास्य भक्तीची व्याख्या समर्थांनी दासबोधात द४ स .७ मध्ये केली आहे .
सातवे भजन ते दास्य जाणावे | पडिले कार्य तितुके करावे | सदा संनिध ची असावे | देवद्वा री | |४-७-२ || देवद्वारी पडेल ते काम करावे .हलके सलके काम करण्यात कमीपणा वाटून घेउ नये .शिवराय येव्हडे मोठे छत्रपती ,ते सुध्दा सज्जनगडावर झाडलोट करीत .केवळ मंदिरातील देवासमोर काम करायचे असे नाही तर आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येक माणसातला अंतरात्मा पहायला शिकून प्रत्येकाच्या अंतरात्म्याला सुख होईल असे वागणे ही सुध्दा दास्यभक्तीच ! एव्हडेच नाही तर त्याच्या वाचेतही नेहमी रामनामाची सुगंधी कुपी असायला हवी .फक्त एकच काळजी तो घेतो की नाम घेताना ,देवतेचे रूप ,गुण ,लीला तो आठवतो .तो स्वधर्माचे पालन करतो .स्वधर्म म्हणजे -सकल धर्मामध्ये धर्म | स्वरूपी राहणे हा स्वधर्म| |आपल्याला नेमून दिलेले विहित कर्म करताना स्वरूपात राहण्याचे अनुसंधान ठेवणे हा स्वधर्म ! या स्वधर्माचे पालन श्रीराम प्रभूंचा दास करतो तो धन्य होतो .

Gandhali said...

श्लोक ४८
हा भक्त कुणाचा आहे तर जो सर्वामध्ये उत्तम आहे अश्या सर्वोत्तम रामाचा भक्त आहे.जो सतत देव कार्यामध्ये मग्न असतो,देह देवासाठी झिजवतो.म्हणजेच दास्यभक्ती करतो .
"पडिले कार्य तितुके करावे I चढते वाढते वाढवावे I भजन देवाचे II"
फक्त देवळातल्या देवाचे नाही तर जनता जनार्दनाचे ही दास्य करतो.
"जनी जनार्दन म्हणोनी,जना संतुष्ट करावे इ "
सर्वांशी प्रेमाने वागावे,सतत दुसऱ्यासाठी देह कारणी लावावा मग संतुष्ट होतो नारायण.दास्यभक्ती बरोबरच हा परमभक्त स्मरणभक्ती ही करतो.
"नाम स्मरावे I मनी रूप आठवावे II "
त्याचे सतत नामस्मरण चालू असतेच त्या बरोबर जाती,वर्ण यानुसार आलेल्या धर्माचेही पालन करतो.ज्याला जे उचित कर्म दिले त्याने ते करावें असे ईश्वराचे मनोगत आहे.ते कर्म केले की पुढे जाऊन नि:संशय ईश्वरप्राप्ती होते तसेच
" सकळ धर्मामध्ये धर्म I स्वरूपी राहणे हा स्वधर्म II " हे स्वरूपी अनन्य होऊन राहणे जो पर्यंत साधत नाही तो पर्यंत चित्तशुदधी करणाऱ्या स्वधर्माचे पालन करावेच हे ज्याला उमजले आहे तो उत्तमलक्षणांनीयुक्त अशा मर्यादा पुरषोत्तम रामप्रभूचा दास धन्य होय ....