II श्रीराम समर्थ II
मना वीट मानू नको बोलण्याचा|
पुढें मागुता राम जोडेलं कैंचा ||
सुखाची घडी लोटता सुख आहे |
पुढे सर्व जाईल काही न राहे || २५||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, June 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar)....श्रीसमर्थ रामदासजी मनुष्य को समझाते हुए कहते है कि हे मानव ! बुरा बोलने वालों की किसी भी बात का बूरा मत मानो और उनका बूरा भी मत करो, क्योकि बुरा बोलने वालो के साथ बुरा करने पर अपने आगे-पिछे रामनाम कैसे जोड पाओगे? अर्थात् नामस्मरण से कैसे जुड पाओगे? नामस्मरण ही जीवन का सबसे बडा सुख का क्षण है| और प्रत्येक सुख के क्षण के बाद , दुसरा सुख का क्षण तब ही आ सकता है जब हम निश्चल भाव से नामस्मरण से जुडे रहेंगे ,क्योकि आगे चलकर तो सब नष्ट होना ही है ,परन्तु श्रीराम का नामस्मरण ही प्रत्येक क्षण सुख देता रहता है|
samarth ramnamache mahatwa sangtana manala satat updesha kartat .mhanun samarth manala samjawtat ki he mana,mazyza waramwar manala samajawnyacha weet yeu deu nakos.bhagwantache naam sodales tar tyachi prapti/darshan kase honar? ya bhawsagarat sukhdukhachya latanchi bharati ohoti satat suruch asate.aapalyala kalache mojmam lagu asate tyamule sukhdukhachi ghadi badalatach asate.kon samayo yeil kaisa|yacha na kale ki bharrwasa||mhanun satat naamsmaran kele asata nirasha/ dukkhachya welelahi man khambir rahil.
समर्थांनी या आधीच्या म्हणजे १९ ते २४ व्या श्लोकांमध्ये वेगवेगळा उपदेश केला की हे मना ,सत्याला सोडू नकोस ,राघवाशिवाय काही बोलू नकोस ,मिथ्य खरे मानू नकोस .असा उपदेश केल्यावर समर्थांना वाटले की मनाला जरा समजावं .मनाला ते सांगतात की हे मना ,मी तुला उपदेश केला म्हणून तू कंटाळास का ?अरे पण असे बघ ,तुला पुन्हा पुन्हा जेवायला लागतंच ना ? तसेच आहे मला तुला पुन्हा पुन्हा उपदेश करावा लागतो आहे . व्यसनापासून अनाहितापासून परावृत्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावे लागते .पण शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा अन्न खावे लागते तसे सद्बुद्धी साठी पुन्हा पुन्हा ऐकावे लागते .म्हणून हे मना ऐक .
आत्ता जर तू स्वहितासाठी काही केलं नाहीस ,तर तू स्वत :चे हित केव्हा करून घेणार ? आत्ता तुला नरदेह मिळाला आहे .सर्व प्राण्यांमध्ये नरदेह हा एकच देह आहे की ज्याला स्वतंत्र बुद्धी परमेश्वराने दिली आहे .परमेश्वर प्राप्ती साठी नरदेहातच प्रयत्न करता येतात .नरदेहातच विचार करता
येतो ,वैराग्य अंगी बाणता येते ,मन ,बुद्धी ईश्वराकडे वळवता येते ,परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते .नरदेह सुटला तर पुन्हा नरदेहच मिळेल याची शाश्वती देता येत नाही .नरदेह मिळाला नाही तर मग रामाची भेटी तुला कशी होईल ? त्यामुळे पुढच्या जन्माची आशा तू धरू नकोस .जे मिळवायचे आहे ते याच जन्मात मिळवायचे आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव .म्हातारपणी नामस्मरण करू ,परमेश्वराची उपासना करू असे म्हणू नकोस नाहीतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे होईल .
बहुतेक आवर्ती पडिले |प्राणी वाहतची गेले | जेहिं भगवंतासी बोभाइले|भावार्थ बळे |
अनेकांसारखा तू वाहत जाउ नयेस मानून मी तुला पुन्हा पुन्हा सांगावे लागते .तू त्याचे वाईट वाटून घेउ नकोस .
पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते .त्यामुळे काही काळ चांगला जातो.पण काळ सारखा बदलत असतो .आज पैसे आहेत ,तर उद्या खायलाही पैसे रहात नाहीत .आपल्या जवळचे नातेवाईक आज आहेत ,उद्या असतीलच असे नाही . तुझे शरीर ,जे तू तुझे म्हणवतोस ते तरी तुझे राहणार आहे का ?अरे तुझे डोळे तुला साथ म्हातारपणी देणार नाहीत ,कान ऐकण्याचं काम नीट करणार नाहीत.अरे ,तुझे तुज नव्हे शरीर |तेथे इतरांचा काय विचार ?म्हणून सावध हो ,आता आत्मारामच तुझा सखा आहे .त्याची मर्जी संपादन कर .त्याचेच नाम घे .म्हणून समर्थ सांगतात :सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
!! श्री राम !!
मनोबोधामध्ये २४ व्या श्लोकाचा शेवटचा चरण आहे , अहंता मनी पापिणी ती नसो दे ... रामाशिवाय जीवन व्यर्थ आहे .सदा सर्वदा नाम तोंडी राहू दे,हे सांगताना शेवटचा चरण जो आहे त्याला अनुसरूनच हा पुढील चरण आला आहे.कारण अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे या अहंकाराचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात
" नवल अहंकाराची गोठी ! विशेषे न लागे अज्ञानापाठी !
सज्ञानाचे झोंबे कंठी ! नाना संकटी नाचवी !! "
या श्लोकात समर्थ म्हणतात म्हणजे मनालाच समजावतात की माझ्या या बोलण्याचा वीट मानू नको.तू त्यावर थोडा विचार कर कारण असे जर केले नाहीस तर सर्व सुखाचा आराम म्हणजे श्रीराम तुला कसा भेटेल ?
आपण ज्याला सुख सुख असे म्हणतो ते क्षणभंगुर असते, कालांतराने ते नष्ट होते म्हणजेच "सुखाची घडी लोटता .. व पुढे सुख आहे असे जे आपणास वाटते ते खरे सुख नसते कारण आपण ज्याला सुख मानतो किंवा म्हणतो ते आपली देहाशी संबंधित आहे आणि देहाची क्षणभंगुरता आपण नेहमी अनुभवतो.आत्ता माझ्याशी फोनवर बोलला आणि लगेच फोन आला की तो गेला म्हणून . हा शेवटचा जो चरण पुढे सर्व जाईल .. चा दुसरा अर्थ ,जन्मभर जे आपण मिळवले त्यापैकी काही म्हणजे काहीही आपण बरोबर नेऊ शकत नाही.सारे येथेच ठेऊन जावे लागते आणि हे सत्यही आहे .तेंव्हा काय आपल्या बरोबर येणार याचा विचार करून माणसाने त्याप्रमाणे आचरण करावे हे बरे ...
!! श्रीराम !!
श्लोक २५
" मना ! माझ्या या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस.कंटाळून रामनाम घेण्याचा आळस करशील तर पुढे राम कसा भेटेल ? सुखात काळ चालला आहे म्हणून निवांत अखेर पर्यंत टिकणारे नाही."
माणसाच्या मनाची मोठी गम्मत असते अगदी लहानांपासून-थोरांपर्यंत पहा आपल्या कल्याणाची चांगली गोष्ट,कृती,सवय कोणी आपल्यास सांगत असेल,आपले भले व्हावे म्हणून उपदेश करत असेल तर त्यांचे ते बोलणे आपल्याला फारसे रुचत नाही आणि त्यातून ते पुन्हापुन्हा सांगितले तर लेक्चर नको,काय बोअर करताय असे नक्की म्हंटले जाते.आणि चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप वेळा सांगावे लागते.लहानांना अभ्यास कर,बाहेरून आल्यावर हात-पाय धु ,खोटे बोलू नये...इ., मोठ्यांना वेळ पाळा,वेळीच व्यायामाला सुरवात करा,सिगारेट ,दारू सोडा ..इ,तर आजी आजोबाना डॉक्टरकडे वेळीच जा,पथ्य पाळा,..इ.अशा अनेक सूचना आपण आसपास सतत ऐकत असतो.अन खूप वेळा सांगितल्यावर कुठे तरी प्रयत्न होतो .त्यात सुद्धा आरम्भशूर बरेचजण असतो,बाबा डॉक्टरांकडे जाऊन आले की ८ दिवस सकाळी उठून फिरायला जातात नंतर आज उशीर झाला , आज लवकर जायचे आहे ,आज पाऊस आला आहे, आज मूड नाहीये करत करत कधी बंद होते काळात नाही .म्हणून वारंवार सांगावे लागते.अन हे कोण सांगते ज्यांना आपले भले व्हावे ही काळजी आहे तेच.समर्थांनी पण व्यक्तीचा उद्धार ,त्यातून राष्ट्राचा उद्धार ही एकच भावना हृदयाशी अखंड धरून ठेवली होती.अन आपले कल्याण व्हावे, आपणावर ही रामाची कृपा व्हावी म्हणून ते सतत रामनाम घे याची आपल्याला वारंवार आठवण करतात.मनाला संभाळून घेत चुचकारत त्याला विनंती करतात. बाबारे माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस.अशी काकुळती,जिव्हाळा आई आपल्या लेकरासाठी दाखवते तसेच या साऱ्यासंतांच्या हृदयात आपल्यासाठी ओसंडून वाहत आहे .
" गर्जती पुराणे आणि संतजन ! करावे भजन राघवाचे ! "
समर्थ विनवीत आहेत, रे मना ! " या जन्माचे सार्थक व्हावे हा final goal आहे अन त्या साठी success mantra म्हणजे रामनामाची गोडी लावून घे. " अन त्यात ही consistancy हवी.दोन दिवस केले अन लगेच result असे होत नाही. " पी हळद अन हो गोरी " असे कुठेच नसते.अन हे आत्ताच का करावे तर जे आता आहे ते कायम राहणार नाही तसेच मला पुढे काय हवे आहे ते जाणून तशी हालचाल मी आत्तापासून करायला पहिजे म्हणजेच vision समर्थ शिकवतात.अहो आपण कोणत्याही MBA course ला गेलो तर तिथे हेच सांगतात ना,VISION हवी. सारे संत हेच सांगतात .बाबारे द्रव्य,दारा, मान,आरोग्य हे सगळे आत्ता चांगले आहे मी फार सुखात आहे असे समजून राहू नको .हे सर्व नश्वर आहे.सतत बदलणारे आहे.इथे कायम काहीच नाही .अन एकदा हे आहे ते उत्तम सुखाचे वाटले अन खूप दिवस टिकून राहिले तर 'अतिपरिचयात अवज्ञा' होते मग आहे त्या पेक्षा अधिक ,निराळे हवे असे वाटू लागते आणि मिळाले नाही तर पुन्हा दु:ख वाटू लागते.त्यामुळे हे सुख हि खरे नाही अन हे दु:ख हि खरे नाही.आधीच जागा हो.
" संपत्ती,संतती,विद्या ! शक्ती सामर्थ्य जातसे !
दक्ष ते जाणती आधी ! बावळी भुलली मदे ! "
सर्व निघून गेल्यावर पश्चातापाची वेळ येते .व्यवहारात पण किती उदाहरणे आपण पहातो.घडून गेल्यावर आधी केले असते तर हि चुटपूट लागून राहते.१ टक्क्यांनी प्रवेश मिळत नाही तेंव्हा आधी अभ्यास केला असता तर , म्हातारपणी अनेक व्याधी जडल्यावर आधी व्यायाम-आहार यांची काळजी घेतली असती तर,अचानक अपघात होऊन नुकसान होते तेंव्हा आधी विमा काढला असता तर .... पण एकदा वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही.तहान लागल्यावर विहीर खणून पाणी मिळते का ?म्हणून ' सुखाची घडी लोटता सुख आहे , पुढे सर्व जाईल काही ना राहे ' हे मना तू दक्ष हो,या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी तो कोदंडधारी राम कसा भेटेल हे साध्य ठेऊन रामनामाचे साधन चालू ठेव .
" नव्हे सोडवण रामनामावीण ! रामदास खुण सांगतसे !"
!! जय जय रघुवीर समर्थ !!
॥श्रीराम समर्थ॥
यापूर्वीच्या श्लोकांच्या विवेचनामध्ये वाचिक तपाचा उल्लेख आला आहे...त्याचे थोडे स्पष्टिकरण....भगवदगीतेमध्ये सतराव्या अध्यायामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तपाचा उल्लेख आलेला आहे... वाचिक तपामध्ये
"अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ||भ.गीताअ.१७.श्लोक१५||"
वाचिक तपामध्ये मनाला उद्वेग न देणारे, सत्य, प्रीय, व हितकर असे जे भाषण याला वाचिक तप म्हटले आहे तसेच स्वाध्याय आणि स्वकर्माचा अभ्यास याला देखील या तपामधे महत्त्व आहे...यामध्ये मृदु ,सत्य पण गोड बोलणे तसेच ऎकणा-याचे अज्ञान जाऊन तो ज्यायोगे नि:संदेह होईल असे बोलणे....तसेच केवळ सत्य आणि प्रिय असून पुरेसे नाही तर ते हितकारही असावे...बोलतानाचे मृदुपण असे असावे की ज्यायोगे इतरांना दु:ख होणार नाही...यासाठी माऊलींनी उत्तम दृष्टांत दिला आहे.... जसे पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहज जगते...त्याप्रमाणे कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित असावे....समर्थ देखील नम्र वाणीवर भर देताना " मना सर्व लोकांसि रे नीववावे " असे सांगतात......कमी बोलण्य़ास सांगून बोलण्यावर नियंत्रण ठेवावयास सांगतात...यापूर्वीच्या श्लोकामध्ये व्यर्थ बोलण्यामध्ये शक्ती वाया घालवू नको असे समर्थ सांगतात....तर या श्लोकामध्ये "मना वीट मानू नको बोलण्य़ाचा । पुढे मागुता राम जोडेल कॆचा ॥" हे मना रामाला जोडावयाचे असेल तर माझा या बोलण्याचा वीट मानू नकोस....याठिकाणी समर्थ मनाला माझा या उपदेशाचा वीट मानू नको असे सांगतात त्याच बरोबर सत्य, प्रिय, आणि हितकारक बोलण्याचा देखील वीट मानू नको सांगतात...कारण राम जोडावयाचा असेल तर त्याला प्रिय वाटेल असेच बोल....राम जोडणे हे तुझ्या जीवनाचे ध्येय असू दे...हे जीवन कसे आहे हे सांगताना समर्थ सांगतात जीवनामध्ये जसे सुखाचे क्षण आहेत तसेच दु:खाचे क्षण देखील आहेत....सुख जेव्हा दारात उभे असते तेव्हा दु:ख देखील त्याचा पाठोपाठ येते याची जाणीव असणे आवश्यक आहे....सुखाच्या दिवसांमध्ये माणसाला नेमके या दु:खाचे विस्मरण होते.....आणि खरी शोकांतीका ही की या दिवसांत त्याला भगवंताचे देखील विस्मरण होते....मी करतो, हे सर्व माझा कर्तृत्त्वामुळे आहे, अशा व्यर्थ अहंकाराची नशा त्याला चढते.....आणि जेव्हा दु:खाचे प्रसंग येतात त्यावेळी त्याला भगवंताचे स्मरण होते....आणि आपण अहंकाराच्या धुंदीत जे वागलो त्याचे त्याला विस्मरण होते....समर्थ सांगतात सर्वकाळामध्ये भगवंताचे स्मरण ठेव आज जे तुझ्यासाठी सुखाचे आणि दु:खाचे दिवस आहेत ते कायम स्वरुपी राहणारे नाही....म्हणून समर्थ म्हणतात वेळीच सावध हो...
जय जय रघुवीर समर्थ....
[हिन्दी मे]
बुरा ना मान बोलने का ऐसा |
नही तो राम को तु पायेगा कैसा||
सुख का क्षण जाये तो भी सुख है रे|
आगे सब कुछ जायेगा कुछ ना रहे रे||25||
Very nice ��
Post a Comment