Friday, March 12, 2010

श्लोक ११

II श्रीराम समर्थ II

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

|| श्रीराम||

सुख हे एक मृगजळ आहे !
सुखाची संकल्पना व्यक्तीसापेक्ष असते .....खूप पैसा मिळाला तर मी खूप सुखी होईन या विचाराने मनुष्य अधिक पैसे मिळवण्याच्या मागे लागतो.... खूप पैसा मिळून सुद्धा त्याला सुखाचा वारा सुद्धा स्पर्श करत नाही ... कारण पैसा मिळवण्याच्या नादात समाधान , शांती या गोष्टी त्याचा हातून निसटून जातात ...अनेकदा असेही पाहतो, भरपूर पैसा आहे पण अशी काही दुखणी आहेत की ज्यावर कितीही पैसा ओतला तरी काहीही उपाय नाही.........परमेश्वराच्या प्रार्थनेशिवाय कोणताही पर्याय उपलब्द्ध नाही .....!
गाडी-बंगला सर्व सुखसोयी आहेत पण सुखाचा लवलेश नाही ....
ज्यांना मुले आहेत , ती नीट वागत नाहीत म्हणून ते सुखी नाहीत तर जे निपुत्रिक आहेत त्यांचे दु:ख तर स्वाभाविकच आहे ....दु:खाला टाळण्याचा प्रयत्न करून देखील असंख्य दु:खेच माणसाला भोगावी लागतात, सुखाच्या मागे लागून सुख मात्र हाताला लागत नाही ..........

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्रीराम||

स्वत:च्याच दु:खामध्ये बुडून गेलेल्या जीवाला समर्थ जाणीव करून देतात की राजा असो , रंक असो या जगात सुखी असा कोणीच नाही ....कितीही प्रयत्न केले तरी असे का हा प्रश्न मनुष्याला कायम सतावतो ....त्याचे उत्तर समर्थ या ठिकाणी देतात ....
मना त्वाची रे पूर्व संचित केले !
माणसाच्या जशा वासना असतात, तशी कर्मे त्याच्याकडून घडतात .....आणि जशी कर्म त्याचाकडून घडतात, तसेच फळ त्याला मिळत असते ....पेरावे तसे उगवते हे समर्थ दासबोधात अनेकदा सांगतात ....चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते ... भगवंताने मनुष्याला कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे ....जन्माला आल्यापासून मृत्युपर्यंत कसे जीवन जगावे हे आपल्या हातात आहे ....आपल्या वाट्याला आलेल्या दु:खाचे मूळ हे आपल्याच कर्मात असते ....त्यामुळे माणसाने आपल्या दु:खाचे खापर कोणावर फोडू नये ....आपलेच कर्म आपल्याला भोगावे लागते.
म्हणून समर्थ म्हणतात आता या देहाच्या माध्यमातून भगवंताचे चिंतन आणि मनन करून, सतत त्याच्या सानिध्यात राहून आनंद प्राप्त कर!
आपल्या वाट्याला आलेली सुख-दु:खे भोगावीच लागतात ... सुख दु:ख पूर्वसंचितावर अवलंबून असली तरी पण भगवंताच्या चिंतनाने जीवनात आलेल्या दु: खाची धार आपोआप कमी होते ...बुद्धि स्थिर रहाते

जय जय रघुवीर समर्थ !

Kalyan Swami said...

As Stated by Lochan Kate ( Gwaliar)...श्लोक ११.......
श्री रामदासजी कहते है कि हे मनुष्य मन ! संसार मे ऐसा कोन सा मानव है जो सर्व सुखो से सम्पन्न है? अगर सारे संसार मे ढूंढकर भी देखोगे तो ऐसा मानव नही मिलेगा| मनुष्य ने पूर्व में जैसा कार्य करके संचय किया है वैसा ही कर्मभोग उसे प्राप्त होता है| अत: हे मनुष्य ! सदैव सद्कर्म करते रहना चाहिए|

lochan kate said...

[हिन्दी में.]................
सारे सुखो से भरा है कौन है रे|
सोच मन का ये शोध तु कर ले रे||
जैसा कर्म पूर्व में तुने किया रे|
वैसा ही भोग प्राप्त तुझको हुआ रे||श्रीराम||११||