Friday, March 5, 2010

श्लोक १०

II श्रीराम समर्थ II

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
दु:खाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Kalyan Swami said...

AS stated by Dr. Madhavi Mahajan..

|| श्री राम ||
भक्तीमार्गावरून वाटचाल करणाऱ्या साधकाला समर्थ सांगतात ....पाप आणि दु:खाचे मूळ असणाऱ्या स्वार्थी बुद्धीचा त्याग करून
हे मना, देहावर प्रेम न करता हृदयस्थ परमेश्वरावर प्रेम कर, तेव्हा सर्व दु:ख विसरेल ..
या परमेश्वरावर प्रेम करायचे असेल तर साधकाने...
सांडूनी आपली संसार व्यथा |करीत जावे देवाची चिंता ||
निरुपण कीर्तन कथा वार्ता | देवाच्याची सांगाव्या || दास- ४- ८-७ ||
प्रपंचातील दु:ख विसरून केवळ त्याच्या चिंतनात आपले मन रमवावे ...सामान्य माणसाला आपल्या प्रपंचातील अडचणी इतक्या असतात की त्याच्याच चिंतनात त्याचे आयुष्य जाते ....
त्याला परमेश्वराची आठवण नसते असे नाही पण केवळ प्रपंचातील अडचणीच्या काळात त्याला भगवंताचे स्मरण होते ....
प्रपंचात वावरताना भले आपल्याला भगवंताखेरीज कोणी नाही असे म्हणत असला तरी मनामध्ये तेवढी निष्ठा नसते .. समर्थ म्हणतात
देवावेगळे कोणी नाही |ऐसे बोलती सर्वही ||
परंतु त्यांची निष्ठा काही | तैसेची नसे || दास ४-८-१९||

असे न करता सदासर्वदा प्रीती रामी धरावी असे समर्थांचे सांगणे आहे ..

जय जय रघुवीर समर्थ !

Suhas said...

|| श्रीराम समर्थ ||

सदा सर्वदा - हा शब्द समर्थांनी अनेक वेळा वापरला आहे .. त्याची उकल श्रद्धेय सुनीलदादा चिंचोलकरांनी अतिशय सुंदर आणि मार्मिक केली आहे!

सदा - म्हणजे सर्वकाळ ( all the time ) - आणि सर्वदा म्हणजे सर्वत्र ( every where ) ! समर्थांना सदासर्वदा प्रीती अपेक्षित आहे ..
आपण सगळेच संकट काळी देवाची आठवण काढतोच पण अपेक्षित आहे - सदासर्वदा ! ( Every where & all the time )
दु:खाची स्वये सांडी जीवी करावी - एकदा का रामाला आपलेसे केले की दु: खाची काय बिशाद ! एकाच खोलीत अंधार आणि प्रकाश राहू शकत नाहीत! प्रकाशाचा प्रवेश झाल्यावर अंधार लोप होतोच ! एकदा जीवात रामाचा प्रवेश झाला की भवाच्या दु:खाचे काय कौतुक !
सुखलोलुपता हा फार मोठा दोष आहे .. त्याने शरीराचे नुकसानच होते. शेवटच्या दोन पंक्तीत समर्थांनी सांगितले आहे शरीराचे लाड न करता स्वताचे खरे स्वरूप ओळखून ( म्हणजे आपण देह नाही !) विवेकाने रहावे !

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्रीराम ||

दु:खाची स्वये सांडी जीवी करावी ... प्रत्येक जीवाला देहाच्या माध्यमातून दु:ख भोगायला लागत असते आणि माणसाला नेमके हे दु:खच नको असते! प्रत्येक गोष्टीतून माणसाला काही ना काही अपेक्षित असते आणि या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की अपेक्षाभंगाचे दु:ख!
या श्लोकात समर्थ सुख - दु:खाची अपेक्षाच ठेऊ नका असे सांगताहेत ..दु:खाची की सुखाची असा संभ्रम अनेकदा निर्माण होतो ..कारण काही ठिकाणी सुखाची सांडी जीवी करावी असाही उल्लेख आला आहे ..पाठ्यभेदांमुळे संभ्रम निर्माण होत असला तरी ... समर्थ या ठिकाणी सांगतात की देहाच्या माध्यमातून निर्माण होणार्या दु:खांकडे पाहायचा दृष्टीकोन बदल, दु:खाकडे सकारात्मक दृष्टीने बघ आणि सुखाची अपेक्षा ठेऊ नकोस...या श्लोकात समर्थांनी अपेक्षांचा त्याग करावा असे सुचवले आहे ......
जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्रीराम||
समर्थांनी जीवाला उपदेश करताना विवेकावर भर दिला आहे ...देहासक्ती आणि त्यामधून मिळणारे सुख या भोवतीच विचार करणाऱ्या सामान्य जीवाला समर्थ विवेकाच्या आधारे खरे सुख, खरा आनंद, कोणता आहे हे सांगत आहेत ....प्रपंचामध्ये रमलेल्या जीवाला सार काय आणि असार काय हे न समजल्यामुळे खरा आनंद कशात आहे याचे विस्मरण झाले आहे ..मनुष्याच्या दु:खाचे कारण तेच आहे,
समर्थ म्हणतात ,
सर्व सांडून शोधा मजला |ऐसे देवाची बोलीला||
लोकीं शब्द अमान्य केला | भगवंताचा ||दास १३ .७.२३ ||
म्हणोनी नाना दु:ख भोगती | सर्व काळ कष्टी होती||
मनी सुखाची इच्छिती| परी ते कैचे ||दास १३ .७ २४ ||
समर्थांना हा विश्वास आहे की मुख्य देव ज्याला सापडला, त्याला काही कमी पडत नाही ..
पण सर्व काही "मी करतो" या भावनेतून होते!
सामान्य जीव विवेकाने विचार करत नाही आणि त्याच्या अविवेकी विचाराने ..त्याच्या पदरात दु: ख मात्र पडते ....
विवेकाचे फल ते सुख | अविवेकाचे फल ते दु:ख ||
यात मानेल ते आवश्यक | केले पाहिजे ||दास.१३.७.२८||
विवेक म्हणजे खरा कर्ता जो आहे, त्याला ओळखा..हा विवेक ज्याचा सुटतो त्याला अनेक दु:खाना सामोरे जावे लागते ..
सकळ काही कर्ता देव|नाही प्रकृतीचा ठाव| विवेकाचा अभिप्राव |विवेकी जाणती ||

जय जय रघुवीर समर्थ !

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar) .. श्रीरामदासजी कहते है कि - हे मनुष्य ! सदैव श्रीराम के प्रति प्रीति रखना चाहिए,जिसके कारण स्वयं ही दुखो का नाश होता है| अर्थात् दु:खो से मुक्ति मिलती है| अपने को किसी भी प्रकार के होने वाले कष्ट को सुख समझकर कार्य करते रहना चाहिए| अर्थात् विवेकपूर्णता से काम करते रहना चाहिए

lochan kate said...

हिन्दी मे...
सदा सर्वदा राम से प्रिती कर रे|
जिससे दुखो से दूरी होती रे||
देहे दुख को सुख समझाते जाओ|
ज्ञान से सदा सत् स्वरुप मे भर जाओ||१०||