Friday, February 26, 2010

श्लोक ९

II श्रीराम समर्थ II
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे |
अति स्वार्थबुद्धि न रे पाप साचे ||  
घड़े भोगणे पाप ते कर्म खोटे |
न होता मनासरिखे  दु :ख मोठे ||९ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !

13 comments:

Kalyan Swami said...

AS stated by Dr. Madhavi Mahajan..
॥श्रीराम॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थ बुद्धी न रे पाप सांचे।
सुखी जीवन जगावयाचे असेल तर भरपूर पैसा मिळवला पाहिजे ही मानवी मनाची स्वाभाविक प्रवृत्ती असते....गरजा भागविण्यासाठी पैसा हे महत्त्वाचे साधन आहे...परंतु परद्रव्याची अभिलाषा हे पाप आहे ....म्हणून समर्थ याठिकाणी नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे सांगत आहेत...मानवी मन प्रपंचा मध्ये गुंतलेले असते...हा प्रपंच करता करता अनेक गोष्टी साठवून ठेवण्याची माणसाची प्रवृत्ती असते....प्रपंचासाठी साठवता साठवता आपली मुलं नातवंडांसाठी देखील साठवून ठेवण्याची त्याची वृत्ती प्रबळ होत जाते....त्यामुळे आयुष्य संपत आले तरीही देहाचे कष्ट मात्र सुटत नाहीत...आणि सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे की , इतके कष्ट घेतल्यानंतर देखील दोन पिढ्यांमधील संर्घष संपत नाही ....सर्वात शेवटी दु:खापलीकडे त्याचा पदरात काहीच पडत नाही....परद्रव्याची अभिलाषा धरु नको सांगणारे समर्थ याठिकाणी वडीलांच्या पैशांची देखील अपेक्षा ठेवू नको हे स्पष्ट करतात....या अपेक्षेमधुन निर्माण होणारी घुसमट, संर्घष या सर्वांचा प्रत्यय आपण नित्य घेत असतो...या दु:खापासून दूर राहण्यासाठी द्रव्याचा हव्यास आणि परद्रव्याची अभिलाषा बाळगू नकोस असे समर्थ सांगत आहेत....


जय जय रघुवीर समर्थ....

Suhas said...

||श्रीराम समर्थ ||
दुसर्याचे द्रव्य घेऊन मनुष्य सुखी होऊ शकत नाही .. माझे ते माझे आणि तुझे पण माझेच .. ही वृत्ती मनुष्याला पापाचरण करण्यास भाग पाडते.
साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगून देखील दुर्योधनाला हे पटले नाही की पांडवांना राज्यात वाटेकरी करायला हवे! इतका स्वार्थ माणसाला आंधळा बनवतो!
आणि असल्या पापकर्माचे फळ हे मिळणारच ! केलेले कर्म फेडावे लागतेच!
म्हणून समर्थ म्हणतात, रे मना, अगदी घरातले .. पूर्वजांचे देखील द्रव्य नको! ( सारे महाभारत तर या पूर्वजांच्या राज्याच्या मोहापोटीच तर घडले .).
आणि शेवटी जे पाप आहे, अन्याय्य आहे , वाईट आहे ते लयाला जाणारच ! .. हा ...मला हवे .. मला हवे... चा मोह न संपणारा हे त्याला तसा मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय कधीच खीळ बसणार नाही ...!म्हणून समर्थ सांगतात की बाबारे .. मुळातच हा स्वार्थ करू नकोस ! याची परिणीती दु:खातच होणार आहे !
कारण Needs are unlimited & resources are limited .. याचा मेळ बसणार नाहीच .. फुका मनासारखे न घडल्याचे दु:ख मात्र पदरी पडेल!

जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

.||श्री राम ||
माणसाची स्वार्थी वृत्ती त्याच्या दु: खाचे एक कारण आहे ....स्व:ताच्या सुखाकरिता काहीही करण्याची त्याची तयारी असते ....देहाला सुख मिळावे म्हणून; सर्व सुखसोई प्राप्त व्हाव्यात, यासाठी तो सतत धडपडत असतो ....स्वार्थ हा प्रत्येकामध्ये
थोड्या-फार फरकाने असतोच पण अती स्वार्थबुद्धि माणसाला वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळवण्यास भाग पाडते. .....यातूनच खोटे बोलणे, इतरांची फसवणूक अश्या गोष्टी करताना त्याचे मन निर्ढावून जाते....
सज्जनांचा अपमान आणि दुर्जनांचा सहवास त्यांना प्रिय वाटतो ...या स्वार्थी बुद्धिमुळे पापाचा संचय होतो .
पैसा, सत्ता यामागे धावता धावता वाईट कर्म घडले तरी त्याला त्यात गैर वाटेनासे होते ...
या स्वार्थी वृत्तीमुळे हवे ते प्राप्त झाले नाही तर माणसाला फक्त दु: खच प्राप्त होते. म्हणून समर्थ मनाला स्वार्थापासून दूर राहायला सांगतात.
जय जय रघुवीर समर्थ!

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम ||

मानवी जीवनामध्ये पैसा हा जितका महत्वाचा आहे तितकाच त्याचा योग्य रीतीने वापर झाला नाही तर तो नाशास कारणीभूत आहे हे ही महत्वाचे आहे ....कारण पैश्यावरील माणसाचे प्रेम माणुसकीचा अंत करते !
पैश्याच्या मागे लागलेली स्वार्थी माणसे, माणुसकी सोडून वर्तन करतात, अशी कितीतरी उदाहरणे आज आपण समाजामध्ये पाहतो ...पैश्याचा मोह चोरी करायला लावतो, दुसर्याचा प्राण घ्यायला लावतो ...पैश्यापुढे आई- वडिलांची देखील किंमत राहत नाही.
मात्र पैश्याने माणसाच्या बुद्धीमध्ये दोष निर्माण होतात, हे जरी खरे असले तरी पैश्याच्या आहारी न जाता त्याचा योग्य वापर केला तर मनातल्या असुरी वृत्तींना थारा मिळत नाही.
आपण मिळवलेला पैसा फक्त आपल्याच उपयोगी पडावा ही माणसाची सामान्य स्वार्थी वृत्ती ! पण आपल्या जवळील पैसा परोपकाराकरिता खर्च करावा...अन्नदान - वस्त्र-दान करावे, अशी सात्विक वृत्ती वाढीस लावावी असे समर्थांचे सांगणे आहे,
कारण पैश्याच्या मोहाची स्वार्थीवृत्ती भगवंतापासून दूर नेते म्हणून या वृत्तीचा त्याग करून पाप कर्म पासून दूर रहा, हे समर्थांचे सांगणे आहे ..
जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

||श्री राम ||

परद्रव्याची अभिलाषा माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे ..
समर्थांनी यापूर्वीच्या श्लोकात विकारांचा त्याग सांगितला आहे ...परद्रव्याची अभिलाषा सर्व विकारात वाढ करणारी आहे , जेवढी आपली मिळकत आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याची माणसाची अभिलाषा त्याला गैर व्यवहार करण्याला भाग पाडते.
भरपूर पगाराची नोकरी असूनही लाच घेण्याची त्याची वृत्तीच त्याला अधोगतीला नेते आणि त्यामुळे सतत पापकर्मे घडत राहतात ...
पैश्याच्या मोहावर नियंत्रण ठेवता आले तर निर्माण होणार्या अनेक विषयांचा आपोआप त्याग होतो आणि विषय जसे-जसे सुटू लागतात तसतसे भगवंताकडे मन वळू लागते म्हणून समर्थ साधकाला या ठिकाणी परद्रव्याची अभिलाषा सोडून द्यायला सांगत आहेत ....
जय जय रघुवीर समर्थ !

Unknown said...

'Dravya te pudhilanche' yavar ajun boluyat ka? samarthanna nemake kay apekshit asave?'paradravya' and 'adhikdravya' jastiche dhan milavayachya mage lagu naye...ki lokache...

Suhas said...

On Pradnyajee's Comment - He donhi arth houu shakatat! "Poorvajanche" asahi ek arth houu shakato. lokache hi nako ani adhika hi nako! Let's wait for the explaination from Dr. Mahajan.

Dr.Madhavi Mahajan said...

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे ....याठिकाणी समर्थ पुढीलांचेवर अधिक भर देतात... पुढीलांचे या शब्दाचा अर्थ दुस-याचे, पूर्वजांचे.....दासबोधामध्ये समर्थ सांगतात आसुदे अन्न सेउ नये । वडिलांचे ॥ दास.द.२.स.२.ओ.२६॥ याठिकाणी तर समर्थ वडिलांच्या धनाची देखील अपेक्षा ठेउ नकोस सांगतात...स्वत:च्या कष्टानी जे मिळवशील त्यावर अधिक विश्वास ठेवायला सांगतात....हे मना परद्रव्याची अभिलाषा बाळगु नको... इतरांच्या धनाची अपेक्षा ठेवली तर मोह,लोभ,स्वार्थ वाढिला लागेल ...स्वत: कष्ट करण्यापेक्षा जे समोर आयते आहे तेच प्राप्त करुन घेण्याची लालसा मनात निर्माण होऊन मनातील असुरीवृत्तींचा असुर वाढत जाऊ नये ...यासाठी समर्थ आपल्याला सावध करीत आहेत.....

Gandhali said...

श्लोक ९
" मना ! दुसर्यांचे द्रव्य नको.परद्र्व्याची अभिलाषा करू नकोस....अति स्वार्थ-बुद्धि नको त्यामुळे पाप साचत जाते.
ज्यामुळे पापफळ भोगावे लागते ते कर्म वाईट ,खोटे होय. स्वार्थबुद्धि बाळगून ही मनासारखे घडून आले नाही तर मात्र फार दू:ख होते. "
समर्थांनी मनाला घडवण्यासाठी हे श्लोक रचले. मनाला ते सतत सहा विकारांच्यापासून दूर रहायाला सांगतात.
संसाररुपी मायाजालात माणुस एकदा गुंतला की मी माझे .. माझ्यासाठी .. हे हवे... ते हवे ...हा पसारा आलाच.
या मध्ये सुद्धा गरजेपुरते, प्रामाणिकपणाने मिळवलेले ... . उत्तम प्रकारे नीतीने व्यवहार करुन भरपूर धन मिळवले तरी ते योग्यच आहे.
पण फक्त मला, मलाच अन त्यासाठी वाट्टेल ते , अनीतीने वागून जो जोपासला जातो तो स्वार्थ !
प्रापंचिक माणसामध्ये देह्बुद्धिचा फार जोर असतो त्यामुळे प्रपंचाच्या पसार्यात सगळा स्वार्थाचाच धुमाकूळ गाजतोय ! स्वार्थापायी जे वर्तन होते त्यात कोणाचे नुकसान होते, कोणी दू:खी होतो, म्हणजेच आपल्या पापात वाढ होते. अन वाईटाचे फळ वाईटच असणार !

अगदी लहानपनापासून आपली संस्कृति हे शिकवते आहे . लहानपणी ऐकलेली लाकूड्तोड्याची गोष्ट काय शिकवते ? देव त्याला सोन्याची , चांदीची कुर्हाड देतो पण तो नाही म्हणतो अणि आपली लाकडीच कुर्हाड़ घेतो.... नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे!
शाळेत असताना मुले कोणाचे रबर,पेन, अथवा खेळणे आणतात ते निरागसतेने आवडले म्हणून आणतात तेंव्हा त्यांची आई व शिक्षक रागवतात दुसर्यांचे घेवू नये हे शिकवतात हेच संस्कार ! अगदी रोजची आजुबाजुची उदाहरणे पहिली तर कर चुकविणे , जकात चुकविणे ,कोणाचे बिल बुडविणे , समोरचा अडाणी ,हिशेबात कमी अथवा बेसावध असेल तर त्याचा गैरफायदा घेणे, लांडी-लबाडी करणे, परवानगी-शिवाय त्याची जागा , वस्तू वापरणे, फायद्यासाठी लाचारी ,
लाळघोटेपणा करणे हे सगळे स्वार्थामुळेच घडते आणि या अतिस्वार्थामुळे सज्जन मन दुर्जन बनते अन पापसंचय वाढत जातो, वाईट कर्माची फळे वाईटच असतात अन ती भोगावीच लागतात .मन अभिलाषेत अडकते आणि तसे घडले नाही तर दु:ख होते म्हणून ज्या कर्मामुळे ,वासनेमुळे भोग भोगावे लागतात त्यांचाच त्याग करावा .म्हणून दु:ख नको असेल तर पाप करू नकोस .संसार मायारूपी सागर आहे त्यात अनेक रूपांनी मोहपाश विखुरलेले आहेत त्यात न अडकता सद्सद्विवेकबुद्धीने प्रामाणिकपणाने ने वागून प्रपंच करावा .....

Kalyan Swami said...

As Stated by Lochan Kate ( Gwaliar ) ...श्लोक ..९....
श्रीरामदासजी का कहना है कि हे मनुष्य ! दूसरों के धन द्रव्य का लोभ नही करना चाहिए | अत्यंत स्वार्थ बुध्दि से पाप के कर्मो का संचय होता है| इसलिये मनुष्य को स्वार्थ के कारण गलत कार्य नही करना चाहिए| क्योकि जब हमे अपने खोटे कर्मो का फ़ल भोगना पडता है, तब हमारे मन को अत्यंत कष्ट होता है| उस समय मनुष्य के मन को होने वाले कष्ट अत्यंत असीम होते है| अत: स्वार्थ परे अपना जीवन व्यतीत करना चाहिए|.

lochan kate said...

[हिन्दी मे]....
मोह ना तु कर रे ,यह द्रव्य दूसरों का|
अति स्वार्थ बुध्दि से पापो से जुडता||
भोगना पडेगा, पाप का कर्म खोटा|
तब है मन को बडा ही दुख होता||श्रीराम||९||

Gaurav said...

Does it mean that, we should not go to foreign and get money from there? "Pudhil" mhanje foreigners pan ahet ka?

Sunil said...

पुढील म्हणजे आपले पूर्वज. वाडवडिल. आपल्या पुढे जे या जगात आले, ज्यांच्या मागून आपले येथे पदार्पण झाले, जन्म झाला ते आपल्या पुढे असलेले, आपल्याला या जगात मागे ठेवून पुढे निघून गेलेले असे आपले पूर्वज अभिप्रेत आहेत.