Friday, March 26, 2010

श्लोक १३

II श्रीराम समर्थ II


मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
भगद्वगीतेमध्ये दॆवी आणि असुरीसंपत्ती सांगितली आहे..असुरी संपत्तीत दांभिकपणा, मद, क्रोध, निष्ठुरता, हे गुण असतात ज्यायोगे मनुष्य बंधनात अडकतो...(भ.गी.१६.४)... असुरीसंपत्ती ही देहाविषयीचे प्रेम वाढवणारी आहे म्हणुन मागील श्लोकामध्ये समर्थ विवेके देहेबुद्धि सोडून द्यावी सांगतात... याठिकाणी अत्यंत अहंकारी रावणाचा दाखला देऊन देहेबुद्धिच्या आहारी गेले तर कसे नुकसान होते हे स्पष्ट करतात... रावणाने आपल्या परक्रमाने सारे जग जिंकले होते...देवांना देखील हतबल करून सोडले होते...तपश्चर्येच्या बळावर भगवान शंकराला देखील प्रसन्न करून घेतले होते....पण अशा पराक्रमी रावणाचे शेवटी काय झाले ...शेवटी तो आपल्या बलदंड सेनेसह नाश पावला...याला कारण त्याची असुरीवृत्ती.....ऎश्वर्यप्राप्ती करता धडपड करणा-या रावणाला काहीच प्राप्त झाले नाही...उलट रावण म्हणजे वाईट वृत्ती अशीच अपकीर्ति त्याला प्राप्त झाली....त्याची अहंकारी वृत्ती त्याच्या नाशास कारणीभूत ठरली.....
जय जय रघुवीर समर्थ

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
रावण इतका पराक्रमी होता की देवांच्या मनात देखील त्याच्या विषय़ी भय निर्माण झाले होते...पण अशा महापराक्रमी रावणाचा नाश केवळ त्याच्यातील वाईटवृत्तीमुळे झाला....अहंकार, लोभ, काम अशा अनेक वाईट वासनांमुळे ज्याचा नाश झाला त्या रावणाचे उदाहरण देऊन समर्थ याठिकाणी दुर्बुद्धिचा त्याग करावयास सांगतात....याठिकणी समर्थ वासनांचा नाही तर वाईट वासनांचा त्याग करावयास सांगत आहेत....सत्ता, संपत्ती मिळण्याची वासना सर्वांनाच असते परंतु दुस-यांच्या संपत्ती लुबाडणे, दुस-याला त्रास देण्याची वृत्ती , यावृत्तीमुळे मनुष्याचा नाश होतो.... इतरांना त्रास देऊन सुख ओरबाडून घेण्याच्या या असुरीवृत्तीचा समर्थ निषेध करतात...चांगली वासना मनात बाळगुन कर्म करून नरदेहाचे सार्थक करावे असे समर्थ या ठिकाणी सांगत आहेत....

जय जय रघुवीर समर्थ

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला काळाची जाणिव करुन दिली आहे....जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्त्यू हा ठरलेला आहे....जन्माला आल्या नंतर आपले जीवन जगताना कोणते धोरण वापरून आयुष्य व्यतित करावे याचे मार्गदर्शन समर्थ करतात...हे मना संपूर्ण आयुष्य केवळ स्वार्थ साधण्यात वाया घालविले जन्मावरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला । कॆसा विषम काळ आला । अंतकाळी ॥दास.३.५.५०॥ जन्मभर सुखासाठी धडपड करून शेवटी यातनाच सोसाव्या लागतात ....हा जन्म सा-या दु:खाचे मूळ आहे म्हणून समर्थ म्हणतात जन्म अवघा दु:खमूळ । लागती दु:खाचे इंगळ । म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावे ॥ दास.३.५.५२ ॥ जन्म हा कष्टदायक तर आहेच पण काळ देखील आपल्या मागे दबा धरून बसलेला आहे.....कधी घाला घालेल सांगता येत नाही म्हणून हे जीवा ऎश्वर्याची घमेंड करु नकोस आणि दुर्वासनेचा त्याग कर....काळाचे भान ठेवून नरदेहाचे सार्थक करून घे...

जय जय रघुवीर समर्थ

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar)..श्लोक १३...
श्री समर्थ रामदासजी के अनुसार .... हे मनुष्य ! तुम जानते हो रावण का क्या हाल हुआ था? विद्वान और होशियार होने पर भी अहंकार के कारण सारा राज-पाट नष्ट हो गया| इसलिये कहते है कि दुष्ट वासनाओं को छोडकर कार्य करने से सर्वनाश नही होता| क्योकि मन की अहंकार पूर्ण दूर्भावना के कारण "काल" सर्वनाश करने के लिए तैयार रहता है| इसलिये अहंकार ना करो|

lochan kate said...

[हिन्दी मे.....]
बता मन रावण का क्या हाल हुआ रे|
अकस्मात सारा राज्य डूबा रे ||
बुरी वासना छोड तु तेजी से रे |
जबर काल तेरे पीछे लगा री||