II श्रीराम समर्थ II
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी|
मना सज्जना हेचि क्रीया धरावी||
मना चंदनाचे परी त्वा झिजावे|
परी अंतरी सज्जना नीववावे ||८||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, February 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
मना ! जन्मभर अशी क्रिया करावी की देहत्यागानंतर लोक आपली कीर्तीच गात राहतील , स्वतः काया-वाचा- मनाने परकार्यार्थ चंदनासारखे झिजावे आणि सज्जनाना मनापासून आनंद होईल असे वागणे असावे . "
मूलत: वरील ७ श्लोकात जसे सांगितले तसे मन आवरले , स्थिर झाले , आत्मबल वाढून श्रेष्ठ धारिष्ठ आले, विवेक आला की मन आपोआपच शांत,स्थिर कोमल होतेच. आचरण पवित्र ,परोपकारी होतेच .
" ह्रदय जयाचे कोमल ! सदा शुचिष्मंत निर्मल !!
निरंतर आचारशील ! पवित्रपणे !! "
देहबुद्धी जाळून टाकली की माणूस संपूर्ण स्वार्थरहित होतो म्हणुनच स्वतःचे उरलेले आयुष्य इतर लोकांसाठी खर्च करू शकतो.
जो अडला असेल , गांजला असेल त्याचे काम करुन द्यावे , मृदु बोलावे,दुसरयाच्या दु:खाने दु:खी व्हावे, संतोषाने सुखी व्हावे, अन्यायाची क्षमा करावी असे वागणे असनारा माणुस खुप लोकाना आकर्षित करतोच अन त्याची कीर्ति सगलीकडे पसरतेच...
" स्वये आपण कष्टावे ! बहुतांचे सोसित जावे !
झिजोना कीर्तिस उरवावे ! नानाप्रकारे !! " ( दा.१२,स.१० )
जो क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीच कमीपणा येत नाही.चांगले माणूस होण्यासाठी कुठलेही पद,परीक्षा, पदवी, पैसा,रूप,प्रतिष्ठा, घराणे काही- काही लागत नाही.
चन्दन वृक्ष बाहेरून सुन्दर नसतो.फला-फुलानी नटलेला नाही तरी त्याची कीर्ति केवढी आहे. तो स्वता: झिजतो तेंव्हाच जगप्रसिद्ध सुगंध देऊ शकतो. समर्थांचे हे सूक्ष्म निरिक्षण आणि त्यातून दिलेली ही उपमा म्हणजे आपल्या मनाला परमार्थामार्गावर नेण्यासाठी, उत्तम आयुष्य जगण्यासाठी मनाला दाखवलेला expresshighway च आहे .
" टाकिचे घाव सोसल्याशिवय देवपण येत नाही " ................
आपण वैभव वाढवावे अन ते इतरांच्या कल्याणासाठी वापरावे मग ते वैभव सर्व प्रकारचे असू शकते मुख्यत: आत्मज्ञानाचे असावे.
मला जे समजले ते मी इतराना सांगुन शिकवून अधिकारी बनवावे , चंदनासारखे संपूर्ण द्यावे अन जसा त्याचा सुगंध उरतो तसे कीर्तिरुपी उरावे ..........
.||श्रीराम||
'देहे त्यागिता कीर्ती मागे ऊरावी' या एकाच उक्तीमध्ये समर्थांनी जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. ....नरदेह प्राप्त झाला आहे तर त्या माध्यमातून जीवाने असे जगावे की त्याचा देह गेला तरी त्याच्या आचार -विचाराचे स्मरण जगाला कायम राहावे ....स्फुट प्रकरणात समर्थ म्हणतात,
मरोनी कीर्ती उरावी | नुरवावी अपकीर्ती ते | धन्य धन्य म्हणे लोक | सत्क्रिया करिता बरी ||३.१९ स्फुट काव्य || ....
परंतु लोकांमध्ये वावरताना लोकांनी कौतुक करावे म्हणून बरे वागायचे नाही, तर मानवी देह मिळाला आहे, माणुसकीने वागून जीवन सार्थक करायला समर्थ सांगत आहेत ..... कीर्ती करून नाही मेले | ते उगीच आले आणि गेले |....
जय जय रघुवीर समर्थ !
||श्रीराम||
समर्थांनी आधीच्या श्लोकामध्ये मनाने कसे उत्तम राहील पाहीजे हे स्पष्ट केले........ या देहाच्या माध्यमातून उत्तमोत्तम आचरणावर त्यांनी भर दिला आहे .......कारण या मुळेच जनामध्ये तुझी छी थू न होता तुझ्या मृत्यू नन्तर देखील तू लोकांच्या स्मरणात राहणार आहेस असे समर्थाचे सागणे आहे ...प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य आणि देहाच्या माध्यमातून करावयाची कर्मे याच्या आधारे तू आपल्या जीवनाचे सार्थक कर ... कर्म करताना मनुष्याने शुद्ध हेतू मनात बाळगावा ...कर्म करत असताना या कर्माचे या पुढच्या जन्मी उत्तम फळ मिळणार आहे अशी आशा मनात धरून कर्म करू नकोस ....या भ्रामक कल्पनांच्या आधारे जगणार्याच्या विषयी समर्थ म्हणतात
रुका अडका दान केला |अतीतास तुकडा घातला| म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा|| दास ८-७-१५ ||
तो मी खाईन पुढील जन्मा ऐसे कल्पि अंतर्यामी |वासना गुंतली जन्माकर्मी| प्राणीयाची ||दास ८-७-१६ ||
या जन्मी पुण्य केल्याने पुढल्या जन्मी या पुण्याने आपला संसार सुखाचा होईल अशी अशा धारणा करणाऱ्या जीवाला समर्थ अज्ञानी म्हणतात . ....कोणतेही कर्म करताना अत्यंत श्रद्धापूर्वक समर्पण भावनेने करणे आवश्यक आहे शुद्ध आचरणाबरोबर शुद्ध अंत:करण देखील तेवढेच मह्त्वाचे आहे ...
जय जय रघुवीर समर्थ !
||श्रीराम||
समर्थांनी या श्लोकामध्ये कीर्ती मागे उरावी असे सांगितले आहे....या मध्ये कीर्ती ही चांगल्या अर्थाने त्यांना अपेक्षित आहे.... दुर्योधन,कंस,रावण,अगदी अलिकड्चा हिट्लर यांची नावे आज देखिल घेतली जातात.... परंतु कसे वागु नये या दृष्टिने या व्यक्तिंकडे बघितले जाते... सत्तेचा बळावर जरी नावलौकिक मिळाला तरीही भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती, अनाचार या गोष्टींना महत्व देउन मिळणारी कीर्ती अधिक काळ टिकत नाही म्हणून समर्थांनी मनाला चंदनासारखे जीवन जगण्यास सांगितले आहे.. अनेक ऋषि-मुनी, संत-महंत, ज्यांनी ज्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून आपले शरीर परोपकारार्थ लावले त्यांना समाज आजही वंदनीय मानतो...समर्थ म्हणतात
शरीर परोपकारी लावावे । बहुतांच्या कार्यास यावे । उणे पडो नेदावे । कोणियेकाचे ॥दास.१२.१०.५॥
जय जय रघुवीर समर्थ !
As Stated by Lochan Kate ( Gwaliar)...
श्लोक....८
श्रीसमर्थरामदासजी कहते है कि हे मनुष्य ! सदैव सज्जनता पूर्वक कार्य करते रहना चाहिए|जिससे हमारे अंतकाल पश्चात् भी हमारी कीर्ति बनी रहे| लोग हमे याद करते रहे| हे मन ! सदैव अपने जीवन को दूसरो के भले के लिये अर्पित करते रहो|जैसे चंदन सदैव दूसरो को खुशबू एवं ठंडक देता रहता है| वैसे ही दूसरो के लिये सतत कार्य करते रहना चाहिए अंतर्मन से सज्जन लोगो के प्रति श्रध्दा रखना चाहिये| श्रध्दा पूर्ण व्यवहार से सज्जन लोगो के मन मे आदर का स्थान प्राप्त होता है|.
[हिन्दी मे...]
देह छोडने पर कीर्ती बचे रे|
हे मन इसकी तु क्रिया तो कर रे||
चन्दन के जैसे जीवन को जीना|
पर अंतर मन से दुसरो को नमना||८||
Post a Comment