II श्रीराम समर्थ II
मना श्रेष्ठ धारिष्टय जीवी धरावे !
मना बोलणे नीच सोशीत जावे !!
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे !
मना सर्व लोकासी रे नीववावे!! ७ !!
जय जय रघुवीर समर्थ!!
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण
Friday, February 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
||श्री राम ||
समर्थ मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून जीवाला भक्तिमार्ग अनुसरायचा असेल तर मनाची जडण - घडण कशी असावी या विषयी मार्गदर्शन करतात...केवळ त्यांच्यासाठीच नाही तर भवसागरातील प्रत्येक जीवाला समर्थ या ठिकाणी मार्गदर्शन करतात ..मागील श्लोकामध्ये असुरी वृत्तीचा नाश करण्यास समर्थ सांगतात ....तर आता या श्लोकामध्ये भक्तिमार्गाला पोषक अशा दैवी गुणांचा स्वीकार करायला समर्थ संगात आहेत ...धृती, क्षमा, नम्र वाणी याचा स्वीकार करावयास समर्थ सांगतात ...रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात ....त्त्यांच्याशी व्यवहार करत असताना आपल्याला आपल्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे या दृष्टीने एक प्रकारची साधनाच करायला समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत ....या ठिकाणी उत्तराला प्रत्युत्तर न देणे ही एक प्रकारची साधना समर्थ शिकवत आहेत ....व्यावहारिक जगात कोणी काही बोलले म्हणजे अरे ला कारे म्हटलेच
पाहिजे अशी सर्वसामान्य समजूत असल्याने नित्य संघर्षाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे निर्माण होणार्या अशांततेपासून दूर राहण्यासाठी समर्थ या श्लोकात मार्गदर्शन करतात.
जय जय रघुवीर समर्थ!
||श्रीराम समर्थ ||
वरील श्लोकातील विकारापासून दूर राहावयाचे असेल तर काय करायला पाहिजे हे समर्थ सांगत आहेत .....
भगवंत चराचरात व्यापून आहे ही व्यापक दृष्टी संतांची आहे ....सर्वत्र भगवंताची अनुभूती घेणारे संतांचे आचरण जसे आहे तसेच वागण्यासाठी संत जीवाला प्रवृत्त करतात. ....तुका म्हणे तोची संत | सोशी जगताचे आघात | ....
समर्थ म्हणतात............
धके चपेटे सोसावे | नीच शब्द साहत जावे |प्रस्तावोन परावे | आपले होती ||दास. १५ ६ २२||....
आपली वाणी कशी असावी, प्रवृत्ती कशी असावी या विषयी समर्थ सांगतात ....नम्र वाचा हा महत्वाचा गुण आहे ....वाचिक तापाचे महत्व भगवंताने सांगितले आहे ....सोशिक वृत्ती, दुसर्यांना आनंद देण्याची प्रवृत्ती , याचे महत्व समर्थ आता समजावून सांगत आहेत
जय जय रघुवीर समर्थ !
!! श्रीराम समर्थ !!
श्लोक ७
" मना ! चित्तात श्रेष्ठ म्हणजे सात्विक धैर्य धरावे व दुसर्यांनी नीच दुरुत्तरे केली तरी ती शांतपणे सोसून घ्यावीत आणि स्वत: मात्र नम्र भाषण करून सर्व लोकांच्या अंत:करणाने नीववावे म्हणजे संतोषित करावे."
सहा विकारांच्या स्वैराचारावर विजय प्राप्त केला की श्रेष्ठ धारिष्ट्य येते. म्हणजेच मनाचे मोठेपण वाढते, स्वत:च्या अहमला गोन्जरण्याची गरज राहत नाही त्यामुळे कोणी कितीही अवहेलना करून बोलला तरी मनाची शांती भंगत नाही , मन क्षमाशील बनते .
" उदंड धी:कारून बोलती| तरी चळो ना द्यावी शांती |
दुर्जनासी मिळोन जाती | धन्य ते साधू ||"
ही शिकवण आपणास लहानपणापासून घरोघरी मिळत असतेच ना ? मोठ्यांचा आदर करा , नम्रपणे बोला, उद्धटपणे बोलू नये हे संस्कार होत असतात. अगदी घरातल्या आजी- आई, मावशी - काकू यांकडे बघूनही शिकत असू . त्या कधी कोणाला उलट बोलत नसत!
सगळ्यांचे शांतपणे ऐकून घेत त्यामुळे घरात शांतता नांदत असे अन ते घर पुढे येत असे. We can see the remarkable increase in the % of divorce cases now a days.
when there is peace , creativity & invention borns. बोलण्यामुळे नाती जोडली जातात तसेच तोडली पण जातात .. "धके चेपटे सोसावे | नीच शब्द सहित जावे || पस्तावून परावे| आपले होती ||"
जीभेच्या पात्याची धार तलवारीच्या पात्यापेक्षा घातक असते म्हणून जीभेचा जपून वापर करावा .एकदा दात आणि जीभ कोण श्रेष्ठ या वरून बोलत असता दात म्हणाला तू जास्त हालचाल केलीस तर मी तुला जखमी करू शकतो , तेव्हा जीभ म्हणते मी नुसते दोन-चार शब्द जास्त बोलले तर बत्तीशी काढून हातात मिळेल!
अशी महती असणारी वाणी विवेकाने वागवून मनाच्या लगामात ठेवावी , दोन शब्द कोणी गोड बोलले तर जसे आपल्याला चांगले वाटते तसेच दुसर्याला पण वाटत असते हे सतत लक्षात ठेवावे.
" म्हणोनी दुर्वाक्य न बोलावे | परचे आपण साहित जावे |
याहुनी श्रेष्ठ साधना बरवे | भुवनत्रयी असेना ||"
जय जय रघुवीर समर्थ !
||श्री राम||
सदाचाराची शिकवण देताना समर्थांनी माणसाने कसे बोलावे या कडे लक्ष वेधले आहे ..
भगवद गीतेमधील देखील कायिक, वाचिक आणि मानसिक तपाचे प्रकार सांगितले आहेत ,
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् | स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते || गीता १७-१५||
वाचिक तापामध्ये दुसर्याला दु: ख न देणारे, सत्य, प्रिय, आणि हितकारक बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास याला 'वाचिक तप'
म्हंटले आहे ..या नरदेहाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक सामर्थ्ये प्राप्त झाली आहेत त्यापैकी एक प्रभावी साधन म्हणजे वाणीचे सामर्थ्य!..यामधून त्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडत असते ..बोलणे ही प्रक्रिया सतत चालणारी आहे ...या माध्यमातून मनुष्याची सर्वाधिक शक्ती खर्च होत असते .. वाया जाणार्या या शक्तीवर नियंत्रण ठेवणे हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे ..आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तीचा योग्य वापर कसा करावा याविषयी समर्थ म्हणतात....
सकालांशी नम्र बोलणे | मनोगत राखून चालणे ||दास १९.४.१३||
नम्र वाणी आणि इतरांच्या अंत:करणाला समाधान देणारी, शांती देणारी अशी वाणी असावी असे त्यांचे सांगणे आहे ....
वाचिक तपामध्ये मृदू,सत्य, गोड आणि दुसर्याला हितकारक ठरेल असे बोलणे अपेक्षित आहे ..
जे आपल्या दैनंदिन वाचिक कर्मामध्ये या गुणाचा आदर करतात त्याच्या कडून वाचिक तप घडते .....
जय जय रघुवीर समर्थ !
SAMARTHANA, WANICHI 'shakti ani mulya ' YANCHA POORVA ABHYAS KELYASHIVAY BOLANE WYARTH
AHE, ASE SUCHAWAVAYACHE AHE; YEVDHECH NHAVE TAR,'namra vyaktimatva jeevan samajalyache dyotak watate.
SURESH NAWARE
||श्रीराम||
समर्थांनी सतत नम्रतेवर भर दिला आहे .. मग मनात असा प्रश्न उभा राहतो कि जी दुर्जन आहे , दुष्ट आहे त्यांना प्रतिकार करायचं नाही का ? अन्याय सहन करायचा का ?समर्थांनी अनेक ठिकाणी सतत सावधपणाने कसे वागायचे याचे मार्गदर्शन केले आहे ...दासबोधातील राजकारण निरुपण या १९व्या दशकातील ९व्या समासात समर्थ चतुरपणे , धूर्तपणे कसे वागावे याविषयी मार्गदर्शन करतात ... या समासात समर्थ स्पष्टपणे सांगतात की, दुष्ट आणि दुर्जनांच्या भयाने आपले कार्य विस्कळीत होऊ देऊ नये ...त्यांना योग्य पद्धतीने शह द्यावा ...लोक संग्रह करताना नाना प्रकारच्या व्यक्ती भेटतात ... त्यातील दुर्जन व्यक्ती आपल्या कार्यात कायम कटकटी करत राहतात ..म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात ..दुर्जन व्यक्तीला एकदम दूर न लोटता त्याला जवळ करून त्याच्या वाईट वृत्तीचा नाश करावा ... त्याचे दोष सतत न दाखवता क्षमाशील वृत्तीने त्याचे मन बदलावे ...परंतु अशाही काही व्यक्ती असतात ज्या समूळ बदलतच नाहीत अशा वेळी समर्थ म्हणतात,
हुम्ब्यासी हुंबा लाऊन द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद ||दास १९.९.२९ ||
धटासी आणावा धट | उद्धटसी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट |अगत्य करी ||दास १९.९.३० ||
...समाजातील गुंडगिरी साफ मोडून काढावी , अन्यायाचा प्रतिकार करावा ही समर्थांची शिकवण आहे. .. वाईट वृत्तीच्या नाशाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे ...
जय जय रघुवीर समर्थ !
| |श्रीराम समर्थ ||
कोणत्याही प्रकारचे काम , प्रपंचातील अथवा परमार्थातील, धैर्याशिवाय होत नाही .. ...धीर धरी रे धीर धरी, धीरापोटी फळे रसाळ गोमटी! धैर्यामुळे . धारीष्ट्यामुळे धाकाचा / भीतीचा नाश होतो !
छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या आयुष्यात उन्मळून पडावे असे अनेक प्रसंग आले, पण या कठीण प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी आपले ईप्सित साध्य केले आहे ते या असामान्य धैर्यामुळे!
मना बोलणे नीच सोशीत जावे - मानहानीकारक, अपमानास्पद. अवहेलना करणारे प्रसंग आजूबाजूला घडत असतात .. अशा
प्रसंगांनी एकतर नैराश्य येते किंवा प्रचंड संताप ! अशा वेळी प्रत्यक्ष त्या शब्दावर अथवा कृतीवर लगेचच प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता असत नाही. सारासार विचार करून आणि थोडा वेळ जाऊ दिल्यावर विषयावर प्रतिक्रिया द्यावी ! यालाच स्टीफन कोव्हे ( लेखक -Seven habits of highly effective people ) म्हणतो - तुम्हाला प्रतिक्रिया निवडण्याची संधी आहे .. विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या .. Reaction नको Response द्या ! मनुष्य हा प्रगत प्राणी आहे आणि आपली प्रतिक्रिया देताना तो खालील बाबींचा विचार करतो-
1. Self awareness
2. Imagination
3. Conscinces
4. Independant will
या चारी गोष्टी मिळूनच तर विवेक हा शब्द आहे ! विवेक या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत .. आणि वरील चारी बाबीं त्यात समाविष्ट आहेतच की ! विवेकाच्या शिवाय दिलेली प्रतिक्रिया ती Reaction !
सामान्यपणे प्राण्यांची जी प्रतिक्रिया -- जी भीतीपोटी अथवा स्व-संरक्षणार्थ आलेले असते ती Reaction ! नीच बोलणे सोसावे म्हणजे Reaction नको ! तर प्रगत मनुष्याप्रमाणे विवेकाचा अंगीकार करून Response द्यावा !
संतांच्या आयुष्यात तर कितीतरी अवहेलनेचे प्रसंग आले .. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि भावंडाना आळंदीच्या ग्रामस्थांनी अतोनात छळले .. पण तरीही माउलीनी मात्र त्याच आळंदीत समाधी घेतली आणि दुरितांचे तिमिर जाओ अशी आर्त हाक दिली ....!
नीच बोलणे म्हणजे नुसते कान पडून ऐकून घेणे नव्हे तर सर्व-समावेशकतेने सर्वांचे समाधान करणे .. सर्व लोकाशी नीववावे! यासाठी .. " मी नाही तू"ही अशी अहंकारविरहित दृष्टी असावी लागते .. आपल्या परे पहिल्या शिवाय असे सर्वांची समाधान कसे होणार ?
जय जय रघुवीर समर्थ !
As Stated by Lochan Kate ( Gwaliar)..श्लोक ७....
श्री रामदासजी कहते है कि हे मनुष्य ! मन मे विचारो मे सदैव श्रेष्ठ्ता एवं धैर्य रखना चाहिए|मनुष्य के बोलने मे ओछापन आये तो उसे तुरंत छोड देना[माफ़ कर देना] चाहिए| मनुष्य को सदैव नम्र भाषा मे बात करना चाहिए|नम्रता से बात कहने से दुसरो से भी सदैव नम्रता का व्यवहार मिलता है और मनुष्य को संतोष प्राप्त होता है| इसलिये हे मन ! सदैव नम्रता पूर्वक व्यवहार से दूसरो को संतुष्ट रखना चाहिए| जिससे हम भी संतुष्ट एवं शांत रहते है| .
[हिन्दी मे......]
अंतर के मन मे श्रेष्ठता जो हो|
दुसरे का बुरा बोलना तु सह जो||
स्वयं सर्वदा नम्र वाचा से बोलो|
नम्रता से सबको अपना बनाओ||७||
Post a Comment